हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
"गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले.
" ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा."
गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे.
.................................................................................
वर्गीकरण
वाचने
108265
प्रतिक्रिया
421
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहले आहे. _/\_
:)
In reply to छान लिहले आहे. _/\_ by लालगरूड
हे बाकी जबरी हो!
In reply to :) by पगला गजोधर
आपले विचार पटतात
पण लक्षात कोण घेतो.....
जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू
सहमत.
In reply to जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू by आदूबाळ
येवढं सोपं जमलं असतं तर लेख
In reply to जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू by आदूबाळ
प्रधानमास्तर
In reply to येवढं सोपं जमलं असतं तर लेख by llपुण्याचे पेशवेll
शरद जोशी उत्तरायुष्यात
In reply to येवढं सोपं जमलं असतं तर लेख by llपुण्याचे पेशवेll
खूप आवडले....
नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला.
प्रचंड सहमत
In reply to नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला. by प्रचेतस
@सतिश गावडे १+++
In reply to प्रचंड सहमत by सतिश गावडे
लेख छानच!
सुधारणा
In reply to लेख छानच! by नगरीनिरंजन
छान अनुभववर्णन!
लेख आवडला!
लेख आवडला...
लेख आवडला
प्रतिसाद एक नंबर... कोणीही
In reply to लेख आवडला by पैसा
अशीही एक शक्यता आहे पैतै की
In reply to लेख आवडला by पैसा
हाहाहा!
In reply to अशीही एक शक्यता आहे पैतै की by बोका-ए-आझम
नास्तिक असूनही तो लाडू
प्रसादाचा लाडू
In reply to नास्तिक असूनही तो लाडू by यशोधरा
तुमच्या विचारसरणीवर ठाम
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
लाडूचे काही मूल्य (किंमत)
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
तेच तर म्हणणं आहे ना त्यांचं.
In reply to लाडूचे काही मूल्य (किंमत) by यशोधरा
आपण एखाद्या वस्तूचं मूल्य
In reply to तेच तर म्हणणं आहे ना त्यांचं. by बोका-ए-आझम
असहमत!
In reply to आपण एखाद्या वस्तूचं मूल्य by आदूबाळ
त्यांना नास्तिकता जपायची असेल
In reply to लाडूचे काही मूल्य (किंमत) by यशोधरा
बाकी मी माणसांनाही नमस्कार
In reply to त्यांना नास्तिकता जपायची असेल by मराठी कथालेखक
एक शंका
In reply to बाकी मी माणसांनाही नमस्कार by आदूबाळ
दुसर्यांच्या अहंकाराची चिंता
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
वा़कून नमस्कार केल्याने
In reply to दुसर्यांच्या अहंकाराची चिंता by हतोळकरांचा प्रसाद
आमच्या घरात कोणीही (अगदी २
In reply to वा़कून नमस्कार केल्याने by मराठी कथालेखक
"एकमेका लागतील पायी रे" ही तर
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by बिपिन कार्यकर्ते
आमच्या घरात कोणीही (अगदी २
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by बिपिन कार्यकर्ते
विनम्रता आणी अहंकार याची
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by मराठी कथालेखक
नमस्कार करणं (किंवा कोणतीही
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
हे आठवलेhttp://www.maayboli
In reply to नमस्कार करणं (किंवा कोणतीही by आदूबाळ
छान लिहिलेत!
यनावाला असे पहा
काका
In reply to यनावाला असे पहा by चौकटराजा
देवानेदेवाच्या ठेकेदारांनी/व्यावसायीकांनी मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्यांचा मी आभारी आहे.(माझा दर्शनाच्या रांगेत उभे राहण्याचा आणि प्रवास खर्च वाचवला) आजतगायत तिरूपती/मथुरा आणि गेल्या १० वर्षात शिर्डी येथे न गेलेला पण घरच्या देवाला नियमीत नमस्कार करणारा नाखु देव देवळात नाही हे या अतिश्रीमंत संस्थानांनी मला शिकविले,देव उत्स्वात नाही हे मला नवरात्र्/गणेश उत्सवाने शिकवले. परंतु देव आहे याबाबतचा संभ्रम होता. तो अगदी शालेय वयापासून वेळोवेळी मदत करणार्या ज्ञात अज्ञात हितचिंतकांकडून, शिक्षकांकडून मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने आणि सध्या बहुआयामी + बहुरंगी मित्रांच्या धीराने प्रोत्साहनाने अगदी दूर झाला आणि देव फक्त माणसातच आहे याबद्दल नि:शंक झालोखाली एक गल्लत आणखी पहा
In reply to काका by नाखु
पट्वुनी सांगा आम्हाला
In reply to काका by नाखु
>> ज्या देवाने मला त्याचे
In reply to यनावाला असे पहा by चौकटराजा
अप्रतिम लेख.
मजाच म्हणायची
देवांचे वसतिस्थान
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
लाडु
किती तो तर्कशास्त्र
सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर
In reply to किती तो तर्कशास्त्र by कंजूस
एक नंबर प्रतिसाद !
In reply to किती तो तर्कशास्त्र by कंजूस
+१ =))
In reply to एक नंबर प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
=)))अगदी!असेच डोळ्यासमोर आले!
In reply to +१ =)) by संदीप डांगे
आधन्यवाद !
हिमालयीन टास्क.....
In reply to आधन्यवाद ! by यनावाला
बाकी ते सत्यनारायनाच्या
आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं
In reply to बाकी ते सत्यनारायनाच्या by सतिश गावडे
म्हणजे परंपरागत पुरोहीत
In reply to आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं by अत्रुप्त आत्मा
होय..होय..
In reply to म्हणजे परंपरागत पुरोहीत by सतिश गावडे
तुम्ही सांगा ना प्लीज..
In reply to होय..होय.. by अत्रुप्त आत्मा
मला म्हायती नाही... धन्यवाद.
In reply to तुम्ही सांगा ना प्लीज.. by प्रचेतस
होय..होय..
In reply to होय..होय.. by अत्रुप्त आत्मा
अगदी भरपूर टाकीन. व्हॉट्सप
In reply to होय..होय.. by सतिश गावडे
इथे सांगितलेत तर उत्तम होईल.
In reply to अगदी भरपूर टाकीन. व्हॉट्सप by अत्रुप्त आत्मा
इथे भरपूरवेळा सांगून झालेलं
In reply to इथे सांगितलेत तर उत्तम होईल. by सतिश गावडे
ठीक आहे :)
In reply to इथे भरपूरवेळा सांगून झालेलं by अत्रुप्त आत्मा
तुम्ही म्हणता ते शंभर टक्के
खोटा बागुलबुवा
In reply to तुम्ही म्हणता ते शंभर टक्के by काळा पहाड
+१.
In reply to खोटा बागुलबुवा by हुप्प्या
शिवाय गुन्ह्यांचं स्वरुपही
In reply to +१. by राजेश घासकडवी
तस्मात समाजात जगण्याकरता जी
In reply to खोटा बागुलबुवा by हुप्प्या
याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक
In reply to तस्मात समाजात जगण्याकरता जी by मार्मिक गोडसे
देव,धर्म, आणि नीतिमत्ता
In reply to याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक by बोका-ए-आझम
जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली
In reply to तस्मात समाजात जगण्याकरता जी by मार्मिक गोडसे
जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली
In reply to जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली by प्रसाद१९७१
कम्युनिस्ट फक्त म्हणतात
In reply to जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली by प्रसाद१९७१
विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात
In reply to कम्युनिस्ट फक्त म्हणतात by बोका-ए-आझम
हे बरोबर आहे!
In reply to विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात by प्रसाद१९७१
असहमत. बर्याच टोळ्या देवाची
In reply to तुम्ही म्हणता ते शंभर टक्के by काळा पहाड
छान लेख!
देव आणि कर्मकांड यात गल्लत होते आहे.
प्रसादाची किंमत कशाला ठरवायची
In reply to देव आणि कर्मकांड यात गल्लत होते आहे. by ट्रेड मार्क
प्रसादाची किंमत कशाला ठरवायची
In reply to देव आणि कर्मकांड यात गल्लत होते आहे. by ट्रेड मार्क
लेख आवडला.
मानवी मनाची जडणघडण अशी आहे की
दोन कानांच्यामधे असलेला अवयवय
नाहि पटलं बुवा
In reply to दोन कानांच्यामधे असलेला अवयवय by मार्मिक गोडसे
मस्त
अास्तिकांना पाव नास्तिकांना चाव.काॅम
In reply to मस्त by स्पा
सगळ्या
In reply to अास्तिकांना पाव नास्तिकांना चाव.काॅम by बोका-ए-आझम
देव मंदिरात असता तर
खरे भिकारी
बर्याच विचारांशी सहमत आहे
@ यनावाला - तुम्ही जर स्वताचे
यनावाला काही तुमच्या
In reply to @ यनावाला - तुम्ही जर स्वताचे by प्रसाद१९७१
यनावाला,
अतिशय आवडला.
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
प्रसाद म्हणुन कशाला, लाडु
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
अहो हे यनावाला स्वता चालत
In reply to प्रसाद म्हणुन कशाला, लाडु by विजुभाऊ
लोकांना त्रास दिला की लोकांनी
In reply to अहो हे यनावाला स्वता चालत by प्रसाद१९७१
ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन
In reply to लोकांना त्रास दिला की लोकांनी by पिलीयन रायडर
अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे
In reply to ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन by प्रसाद१९७१
काय
In reply to अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे by पिलीयन रायडर
जर हा प्रतिसाद गांभिर्याने
In reply to अहो हे यनावाला स्वता चालत by प्रसाद१९७१
पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच.
In reply to पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे by प्रसाद१९७१
पुरुष जर नास्तिक असेल आणि
In reply to बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच. by पिलीयन रायडर
हो.. आणि मला पटलय ते.. खरंच
In reply to पुरुष जर नास्तिक असेल आणि by प्रसाद१९७१
नमस्कार कर आणि लाडु खा
In reply to हो.. आणि मला पटलय ते.. खरंच by पिलीयन रायडर
अहो तोच माझा मुद्दा आहे..
In reply to नमस्कार कर आणि लाडु खा by प्रसाद१९७१
कुणी तरी बुद्धिवादाची कास
In reply to अहो तोच माझा मुद्दा आहे.. by पिलीयन रायडर
सहमत
In reply to कुणी तरी बुद्धिवादाची कास by प्रसाद१९७१
प्रतिसाद पटला.
In reply to सहमत by ट्रेड मार्क
हम्म
In reply to सहमत by ट्रेड मार्क
ज्जे बात!!!! क्लासच!!!
In reply to हम्म by स्पा
@ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध
In reply to हम्म by स्पा
पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला.
In reply to @ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध by अत्रुप्त आत्मा
ते स्वतः नक्की
In reply to पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. by प्रचेतस
@पांडूचं जाऊ द्या. :- ते
In reply to पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. by प्रचेतस
पिरा - आपल्या कोणाचे मन
In reply to नमस्कार कर आणि लाडु खा by प्रसाद१९७१
पण पुरुषांनाही अनेकदा असं
In reply to हो.. आणि मला पटलय ते.. खरंच by पिलीयन रायडर
एकूण काय प्रसादराव.
In reply to पण पुरुषांनाही अनेकदा असं by प्रसाद१९७१
मुद्दा भरकटतोय किनई...?!!
In reply to पण पुरुषांनाही अनेकदा असं by प्रसाद१९७१
तुमच्यात गावगुंडाना उलट परत
In reply to मुद्दा भरकटतोय किनई...?!! by पिलीयन रायडर
परत तेच.. जौ द्या. हा मुद्दाच
In reply to तुमच्यात गावगुंडाना उलट परत by प्रसाद१९७१
अत्यंत आवडला!
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
प्रसादाचा लाडू
देणगीसाठी लाडू?
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
पिरे,प्रतिसादातल्या विचारांशी
यनावालांच्या मतांबद्दल मी
अगदी अगदी
In reply to यनावालांच्या मतांबद्दल मी by बिपिन कार्यकर्ते
नास्तीक आपली नास्तीकता दुसर्
नास्तीक आपली नास्तीकता दुसर्
In reply to नास्तीक आपली नास्तीकता दुसर् by विजुभाऊ
यनावाला बाकीच्या लेखांमध्ये
In reply to नास्तीक आपली नास्तीकता दुसर् by प्रसाद१९७१
@निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो
In reply to यनावाला बाकीच्या लेखांमध्ये by पिलीयन रायडर
पिराताई - मी नास्तिक च आहे.
In reply to यनावाला बाकीच्या लेखांमध्ये by पिलीयन रायडर
मला नाही कुठे कुणी धार्मिक
In reply to पिराताई - मी नास्तिक च आहे. by प्रसाद१९७१
पिरा...अतिशय छान प्रतिसाद!!
In reply to मला नाही कुठे कुणी धार्मिक by पिलीयन रायडर
मुद्रीत शोधन
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,यात वरील प्रतिसादातील कुळधर्म कुळाचार्,चालीरीती+प्रथा हे शब्द घालंण्याची चौराकाकांनी परवानगी द्यावी.. डांगे सर या धाग्यावर दिसेनात ते. प्रगोही दिसत नाही.'मला भीती वाटते'
बहुधा इथे कोणीच येणार नाही.
तुमचे अनुभव वाचले. त्यातून
In reply to बहुधा इथे कोणीच येणार नाही. by आनन्दा
तो प्राणघातक आजार नव्हता आणि
In reply to तुमचे अनुभव वाचले. त्यातून by नगरीनिरंजन
बाकी माझे असे मत आहे की
In reply to तो प्राणघातक आजार नव्हता आणि by आनन्दा
+११११११
In reply to बाकी माझे असे मत आहे की by आनन्दा
ते सगळं ठीके हो. एक वैश्विक
In reply to +११११११ by ट्रेड मार्क
माझाही कर्मकांडांना विरोध आहेच
In reply to ते सगळं ठीके हो. एक वैश्विक by नगरीनिरंजन