मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चायनीज अमेरिकन बोलतोय छान मराठीत !!

कौशिक लेले · · काथ्याकूट
एक चायनीज अमेरिकन तरुण ऑनलाईन मराठी शिकून किती छान मराठी बोलू शकतो ते पहा या यूट्यूब व्हिडिओ मध्ये. Matthew - a Chinese American- speaks Marathi Fluently : Success story of Learn Marathi माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला मराठी शिकवण्यात मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे. व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास जरूर शेअर करा. जेणेकरून इतरांना हे जाणवेल की कुठल्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय ऑनलाईन मराठी शिकणं थोडं कठीण वाटलं तरी अशक्य नक्की नाही. आणि या मुलापेक्षा महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला , भारतात इतरत्र राहणाऱ्या व्यक्तीला , भारतीय वंशाच्या अनिवासी व्यक्तीला तर बऱ्याच जास्त संधी आहेत - मराठी वाचायच्या/लिहायच्या/सराव करायच्या. त्यामुळे त्यांना मराठी शिकणं अजून सोपं आहे . या चायनीज अमेरिकन तरूणाचा माझ्या ब्लॉगबद्दलचा अभिप्राय इथे वाचू शकता. Detailed Testimonial from Matthew Chang अजून बऱ्याच जणांना माझा ब्लॉग आणि यूट्यूब व्हिडिओज मराठी शिकण्यासाठी उपयुक्त वाटले. आशांचे काही अभिप्राय इथे वाचू शकता Success stories of learning Marathi ... Testimonials

वाचने 16531 वाचनखूण प्रतिक्रिया 38

पद्मावति Sat, 11/28/2015 - 17:50
मस्तं! मॅथ्युचं प्रचंड कौतुक. मराठी आणि हिंदीसुद्धा बोलतोय हा मुलगा. तुमचं मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. खूप छान काम करताय.

मास्टरमाईन्ड Sat, 11/28/2015 - 20:27
अभिनंदन. मॅथ्यूचं तर आहेच पण तुमचं १०००००००००++ जास्त. तुमची शिकवण्याची पद्धत खरंच ग्रेट आहे. तुमच्या विद्यार्थ्याच्या बोलण्यातून जाणवतंय. कौतुकास्पद. _/\_

चतुरंग Sat, 11/28/2015 - 20:42
इतर भाषिकांना मराठी शिकवणे हा मराठीच्या प्रसाराचा आणि जतनाचा फारच उत्तम मार्ग आहे. तुमचे आणि मॅथ्यूचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत! :)

बॅटमॅन Sat, 11/28/2015 - 22:13
नमस्कार लेले सर, एक नंबर भारी वाटलं राव वाचून. आपला ब्लॉग असाच उत्तरोत्तर अनेक लोकांपर्यंत पोहोचावा ही शुभेच्छा.

अरुण मनोहर Sun, 11/29/2015 - 03:37
कौशिक, तुम्ही एक अभिमानाचे काम करत आहात! खूप अभिनंदन! असे आणखी लोक मराठी शिकायला पुढे आले तर मराठी सगळीकडे ऐकायला येईल. इथे सिंगापूरला मी देखील एका चायनीज तरुणाला गेले एक वर्ष मराठी शिकवत आहे.

In reply to by अरुण मनोहर

कौशिक लेले Sun, 11/29/2015 - 10:40
ग्रेट !! तुम्ही आणि तुमचा विद्यार्थी "Learn Marathi" या फेसबुक ग्रूप वर याल का ? तुमची शिकवण्याची पद्धत त्याची सरावाची पद्धत या बद्दल इतरांना सांगा. इतर नवशिक्यांना याचा फायदा होईल. त्याचं बघून बाकीच्यांनाही अजून प्रेरणा मिळेल. तुम्ही शिकणार्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन अनेकांना मदत करू शकता. जरूर दोघं या https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk - कौशिक

In reply to by दिपक.कुवेत

कौशिक लेले Mon, 11/30/2015 - 14:15
कुवेतमध्ये कोणी अनिवासी भारतीय किंवा त्यांचे परिचित मराठी/गुजराती शिकू इच्छित असतील तर माझ्या ब्लॉगबद्दल त्यांना सांगाल का !