परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.)
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्यांत विष्णुभट हेही एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
वाचने
142506
प्रतिक्रिया
233
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैज्ञानिक सत्य
सहमत आहे.
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
दिव्य दृष्टीने तो क्रमांक
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
धन्य ते वनारसे आणि त्या
In reply to दिव्य दृष्टीने तो क्रमांक by विजुभाऊ
हात्तिचा, यालाच का चमत्कार म्हणतात !
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
तुमच्या घरी दूरचित्रक असेल. तो सुरू करा
In reply to हात्तिचा, यालाच का चमत्कार म्हणतात ! by गामा पैलवान
क्या बात है यानावाला-जी. तुम्ही योग्य दिशेने चर्चा करत आहात.
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
खिक्क! बाहुबली, ते उत्तर
In reply to क्या बात है यानावाला-जी. तुम्ही योग्य दिशेने चर्चा करत आहात. by भाऊंचे भाऊ
बाकी मला कशावरही बोलायचे नाही
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
हाच प्रॉब्लेम आहे.
In reply to बाकी मला कशावरही बोलायचे नाही by आनन्दा
अजून एक पिंक टाकतो
In reply to बाकी मला कशावरही बोलायचे नाही by आनन्दा
हे हे, :-) आफ्रिकेच्या जंगलात
In reply to अजून एक पिंक टाकतो by प्रकाश घाटपांडे
यनावाला जी एक प्रश्न होता
हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यासकंदुक हा मुळ संस्कृत शब्द आहे का ? कुठे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे एक मराठी शब्दही बनतो का या शब्दाच्या च मुळापासुन ?मारवाजी
In reply to यनावाला जी एक प्रश्न होता by मारवा
ओहो धन्यवाद बोकोबा
In reply to मारवाजी by बोका-ए-आझम
रत्नकंदुक
In reply to ओहो धन्यवाद बोकोबा by मारवा
शिर्षक वाचून हे काहीतरी
लेखाचा उद्देश जरी चांगला असला
वन ऑफ द राईट पर्तिसाद
In reply to लेखाचा उद्देश जरी चांगला असला by शब्दबम्बाळ
ओक्के!
..खवचट वैट्ट वैट्ट प्रतिसाद.
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा धन्यवाद.
In reply to ..खवचट वैट्ट वैट्ट प्रतिसाद. by गवि
अशा माणसांची नास्तिकता ही
In reply to हा हा हा धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
७८६' आणि 'होली वॉटर'
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
जोर फक्त प्रतिकार न करणार्
In reply to ७८६' आणि 'होली वॉटर' by स्पा
शिवाय
In reply to जोर फक्त प्रतिकार न करणार् by परिकथेतील राजकुमार
बॅट्या
In reply to शिवाय by बॅटमॅन
नाखुकाका, नेहमीप्रमाणे अगदी
In reply to बॅट्या by नाखु
+१
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
पण महामांत्रिकांचे काय?
:)
In reply to पण महामांत्रिकांचे काय? by सर्वसाक्षी
लेखक विषयाबद्दल अनभिज्ञ आहेत आणि
+११११११११११११११११११११११११११११
माझा हा वरील प्रतिसाद विवेक
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by मांत्रिक
फुटकळ लेख आहे.
....
In reply to फुटकळ लेख आहे. by pacificready
तुम्हास मुद्दा समजलेला नाही.
In reply to .... by स्वप्नांची राणी
अरे वा!
देव अध्यात्म , देश , भाषा अन्क ई
प्लासिबो म्हणजे नक्की काय?
In reply to देव अध्यात्म , देश , भाषा अन्क ई by चौकटराजा
http://misalpav.com/node/3973
In reply to प्लासिबो म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
बद्धमूलासन
बद्धमूलासन नावाचे कुठलेच आसन
In reply to बद्धमूलासन by यनावाला
अर्थ एकच
In reply to बद्धमूलासन नावाचे कुठलेच आसन by मांत्रिक
तीन वेगवेगळे बंध आहेतः १)
In reply to अर्थ एकच by यनावाला
अहो कोणाला आणि कशाला सांगताय.
In reply to तीन वेगवेगळे बंध आहेतः १) by मांत्रिक
ज्ञानेश्वरी: आत्मसंयमयोग
In reply to तीन वेगवेगळे बंध आहेतः १) by मांत्रिक
आसन, प्राणायाम व बंध या अगदी
In reply to ज्ञानेश्वरी: आत्मसंयमयोग by यनावाला
अगदी अगदी....सोडीयम क्लोराईड
In reply to अर्थ एकच by यनावाला
+१
In reply to अगदी अगदी....सोडीयम क्लोराईड by बिपिन कार्यकर्ते
वज्रासन वेगळे, मूलबंध वेगळा
जागा चुकली
आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास
मंदार जी
In reply to आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास by मंदार कात्रे
मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतोसुक्ष्मदेहांवर ? कृपया आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे विस्तार करावाम्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेतउदा. कुठले दिव्य अनुभव कसे कोणाला ? कृपया अधिक विस्तार करावा.मी ही उत्सुक आहे
In reply to मंदार जी by मारवा
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा
In reply to मी ही उत्सुक आहे by चौकटराजा
काका
In reply to एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा by संदीप डांगे
ट्यारपी
परवा एका कार्यक्रमात एक
ये जो डर है अच्छा है जरुरी है !
In reply to परवा एका कार्यक्रमात एक by संदीप डांगे
लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतोया अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे. डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असातुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheistये जो डर है अच्छा है जरुरी है !
In reply to परवा एका कार्यक्रमात एक by संदीप डांगे
लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतोया अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे. डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असातुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheistवरील विधान क्र.१ मध्ये जे
In reply to ये जो डर है अच्छा है जरुरी है ! by मारवा
अजून २०० पण नाय?
एक
In reply to अजून २०० पण नाय? by घाटावरचे भट
(No subject)
In reply to एक by नाखु
पुर्णपणे सहमत। मंत्रात
झाले
यनावाला, मारवा व इतर,
संदीप जी
In reply to यनावाला, मारवा व इतर, by संदीप डांगे
http://misalpav.com/comment
In reply to संदीप जी by मारवा
सदीप जी
In reply to http://misalpav.com/comment by संदीप डांगे
काळजीपूर्वक वाचूनही, तुमच्या
In reply to सदीप जी by मारवा
जाऊ देत हो संदीप भाऊ, मीच
In reply to http://misalpav.com/comment by संदीप डांगे
ह्यॅ, आपण वाद घालतच नाही बॉ.
In reply to जाऊ देत हो संदीप भाऊ, मीच by मांत्रिक
मूर्त आणि अमूर्त
अहो कुणाला सांगताय? स्वमतांध
In reply to मूर्त आणि अमूर्त by ट्रेड मार्क
(No subject)
Our ancient texts should not
चांगला दुवा दिलात. चेक करतो.
In reply to Our ancient texts should not by अभिजित - १
वाद घालण्यात अर्थ नाही. मी एक
इथे फारच गहन - गंभीर चर्चा
अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर
:)