काजू/खजूर रोल

पियुशा's picture
पियुशा in दिवाळी अंक
30 Oct 2015 - 11:21 am

.
.
रामराम मंडळी,
सर्वप्रथम सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा :)

दिवाळी सण मोठा नाही रेसिपींना तोटा :)

नेहमीच्याच खमंग फराळासोबत हे रोल नक्की करून पाहा. सोपी अन कमी साहित्यातली चविष्ट मिठाई / रोल/ बर्फी हवं ते बारसं करा.
तर मंडळी, घ्या साहित्य लिहून.
साहित्य : -
१) ओले खजूर - २ वाटया (मी काळे वापरलेत.)
२) काजू - १ १/२ वाटी
३) तुप - २ चमचे
४) साखर- २ चमचे
५) मिल्क पावडर - ३ चमचे ( ऐच्छिक )

कृती : -
खजुराच्या बिया काढून घ्याव्यात. एका नॉनस्टिक पँनमध्ये २ चमचे तूप घालून बिया काढलेले खजूर घालावेत. मंद आचेवर परतत राहावेत. खजूर हा चिकट असल्यामुळे परतायला शक्यतो लाकडी चमचा घ्यावा अथवा स्टील चमच्याला थोडं तेल लावून मग परतावं. साधारण ५ मिनिटात खजुराचा गोळा व्हायला लागतो. ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावं. मऊसूत गोळा तयार झाला की हा गोळा पोळपाटाला / परातीला तुपाचा हात लावून त्यात काढून घ्यावा. आता लाटण्याला तेल लावून गरम असतानाच खजूर गोळ्याची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी.

आता काजूकडे वळू या..
मिक्सरमध्ये काजूची बारीक पूड करून घ्या . आपल्याला थोडासाच साखर पाक करायचाय, म्हणून पॅनमध्ये साधारण १ छोटी पळी पाणी घेऊन त्यात २ चमचे साखर घालून मंद आचेवर साखर वितळू द्या. साखर वितळली की किंचित सैल आणि चिकट पाक तयार होईल. त्यात काजूपूड घालून चमच्याने छान व्यवस्थित हलवून घ्या.
पाक आणि पूड एकजीव झाले की त्यात ३ चमचे मिल्क पावडर घाला. हे मिश्रण खजुरासारखं चिकट आणि घट्ट नसतं. थोडं सैल असतं. म्हणून लाटायची गरज नाही.
आता हे मिश्रण खजुराच्या पोळीवर चमच्याने व्यवस्थित पसरून घ्या आणि थोडं गार झालं की हाताने थापून गोल आकारात पसरून द्या.
झालं.....
आता ह्याचा हळूहळू रोल करून घ्या (अळूवडीची करतो तशी गुंडाळी.)
आता हा रोल फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. मी २० मिनिट ठेवला. मस्त सेट झाला होता.
आता हा बाहेर काढल्यावर सुरीला तेलाचा हात लावून रोल मस्त कापून घ्या.
आता त्यातला एक तुकडा खाउन बघा. तुमचा विश्वास बसणार नाही, मग एक स्वतःला एक चिमटा काढून खात्री करून घ्या ;) हे प्रकरण आपण बनवलंय - इतकं स्वादिष्ट अन तेही घरच्या घरी!
कमी वेळात कमी साहित्यात एक स्वादिष्ट प्रकार बनवल्याबद्द्ल तुमचं कौतुक होतं की नाही बघा :)

.
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

याचीच वाट पाहत होते... फार च सुरेख दिसतायेत ...__/\___ ऐकत नाय पिश्वी !!

करुन आता फोटो टाकते माझे तुला..

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 6:47 am | कविता१९७८

काय टेम्पटीन्ग दिसतायत ग रोल्स

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 9:29 am | नूतन सावंत

किती देखणं दिसतेय हे पक्वान्न.पियू माझा दंडवत.

वा! वा! पियु सुरेख दिसताहेत रोल.
चला सगळ येतय पोरीला.काळजी नाहि.

अजया's picture

10 Nov 2015 - 10:27 am | अजया

गृहकृत्यदक्ष आहे हो मुलगी.तेवढा कान पिळून बघितला की झालं.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2015 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ :ड
सुखी भव !

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2015 - 2:54 pm | दिपक.कुवेत

मानलं बुवा. सिंपली ग्रेट. सोपी आणि तितकीच चविष्ट पाकॄ.

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 3:08 pm | मधुरा देशपांडे

मस्त पाकृ. करुन बघणार नक्की.

सुगरण आहे हो मुलगी!

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 8:39 pm | स्वाती दिनेश

अगदी टेम्टिंग रोल्स.. खूप छान!
स्वाती

खुप छान पियुशा.. पाकृ आवडली.

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 2:36 pm | प्रीत-मोहर

__/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2015 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पियूशा , काजू खजूर रोल आवडले. ग्रेट.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Nov 2015 - 7:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पाकृ आवडली :)!!!

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 11:21 pm | अभ्या..

भारी ग पिवशे. कायतरी अचाट प्रयोग करत असती ही. आजकाल सुधारणा आहे बरीच. ;)
@ हे डिझाईन मस्त आलेय रोलमध्ये. @रोल म्हणून च नाव दे ह्याला.

चिंतामणी's picture

11 Nov 2015 - 11:34 pm | चिंतामणी

दिवाळीच्या मेजवानीत एक भर.

पण फटुचे काय?

एक बारीकशी सुचना. पोलपाटाला तूप लावले तर लाटण्याला सुद्धा तूपच लाव. तेल लावल्याने स्वादात फरक पडेल असे माझे मत आहे.

चिंतामणी's picture

11 Nov 2015 - 11:36 pm | चिंतामणी

तु म्हणशिल हा काय प्रश्ण आहे?
माझे म्हणणे एकच फटु का? असे आहे.

प्रचेतस's picture

12 Nov 2015 - 12:02 am | प्रचेतस

सुगरण गो पिवशे.

वा पियुशाताई जियो! नक्की करून बघणार. किचनदेव प्रसन्न आहे की तुमच्यावर!

भिंगरी's picture

12 Nov 2015 - 12:43 am | भिंगरी

काय मस्त दिसताहेत गं....
आणि पाकृ फारशी जिकीरीची वाटत नाही.
करून पहायला हवे.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:53 pm | पैसा

मस्तच!

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 5:20 pm | सानिकास्वप्निल

मस्त दिसतायेत रोल्स, पाकृ आवडली.

मदनबाण's picture

12 Nov 2015 - 8:23 pm | मदनबाण

वाह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 8:52 pm | यशोधरा

वा गो वा! मस्त अगदी!! कधी करून पाठवतेस म्हणे? ;)

हासिनी's picture

19 Nov 2015 - 10:47 am | हासिनी

सुरेख दिसतायेत ग वड्या!!
पाठव डबा भरून ;)

स्पा's picture

19 Nov 2015 - 11:40 am | स्पा

खमंग झालीये पाक्रु एकदम

अवांतर : फोटो क्वालिटी बरीच सुधारलेली आहे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2015 - 12:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सोपं आणि छान प्रकरण दिसतंय. मलाही जमेलसं वाटतंय. जमलं तर कळवेनच.

किसन शिंदे's picture

23 Nov 2015 - 1:34 am | किसन शिंदे

दिसायला मस्त दिसताहेत रोल. मस्त आणि सोपी पाककृती हो नगरकर.

पियुशा's picture

23 Nov 2015 - 10:49 am | पियुशा

सग्ळ्या वाचकाचे आभार्स :)

आजच बघतोय. कौतुक करुन घ्यायचे असेल, तर पार्सल पाठवून द्या. तोंडभरुन कौतुक केले जाईल..

एक नंबर रेशिपी. जमल्यास अवश्य प्रेत्न केल्या जाईल. अनेक धन्यवाद.

विशाखा राऊत's picture

24 Nov 2015 - 1:59 am | विशाखा राऊत

पिवशे मस्तच.

आSहा! झोप उडाली आमची! कुनी काढला ओ- ह्यो धागा वर?
Smiley