मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेवर केलेली कविता (विडंबन)

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ही कविता वाचून , फार पूर्वी म्हणजे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाआमच्या शेजारी रहाणाऱ्या कविता नावाच्या एका तरुणीची आठवण आली. *****कविता***** कविता म्हणजे माझ्या प्रेमजीवनाचे पहिले पान कविता म्हणजे पिंजारलेल्या केसांचे सोनेरी रान कविता म्हणजे ममता कुलकर्णीचे प्रतिबींब कविता म्हणजे वाढणारे टिंब टिंब टिंब कविता म्हणजे हलवत झोपवणारी खाट (विदा सरकाईलो खटिया) कविता म्हणजे भल्याभल्यांची लागलेली वाट कविता म्हणजे सग्गळ्ळीकडून ब्युटीफुल्ल कविता म्हणजे नेहमी हरवणारा सोनेरी डूल (विदा बुगडी माझी सांडली ग, झुमका गिरा रे) कविता म्हणजे ओष्ठद्वयीचा मधुर मेवा कविता म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा...

वाचने 9787 वाचनखूण प्रतिक्रिया 46

चांदणे संदीप Tue, 11/03/2015 - 11:13
पार धुरळाच!
कविता म्हणजे ओष्ठद्वयीचा मधुर मेवा कविता म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा...
हा शेवट म्हणजे सेफ Landing (अर्धचंद्र देता येईना राव!)

In reply to by टवाळ कार्टा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/05/2015 - 11:32
हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति न दिसता नुसत्या नावावरून ओळ खायची (तूझी) पद्धत सांग.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पगला गजोधर गुरुवार, 11/05/2015 - 12:45
शिवाय त्याच बरोबर, व्यक्ति न दिसता, नुसत्या नावावरून, ती एक व्यक्ती आहे, का समूह/कंपू आहे, हेही ओळखण्याची खुण, जाणकारांनी सांगावी