मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक माणूस बनेल काढून..................

पगला गजोधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला. छंद जीवाला एकच लागे खुर्ची वरीला हक्क हा गाजे शिव्याशाप तो भाषणामधूनी आकांड तांडव ते दैनंदिनी किन्तु हातचा राखून गणित चुकले नजर चकवून बहुमत हुकले तरी उसने आवसान काउंटरवरुनी परी हळूच पाही मान वळवूनी इकडे तिकडे बघून झाले निकाल सगळे येऊन गेले भान आले, बाहेर आला.... लोकांनी विचारल्यावरी म्हणाला … आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते …… सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते … एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

वाचने 4401 वाचनखूण प्रतिक्रिया 15

एस Wed, 11/04/2015 - 16:09
पेर्ना द्या की. मिशीचं बनेल चांगलं जमलं आहे! आवडेश...!

In reply to by शिव कन्या

पगला गजोधर गुरुवार, 11/05/2015 - 09:16
अहो खरंच, या वगनाट्याची प्रेर्ना, कल्याण डोंबिवली जनता आहे… कळावे, दादू वांद्रेकर, सदु नाशिककर, बंटीशेट झुग्गीकर, नानाजीपंत सावजी (नागपूरकर) आणि त्यांचे तमाम चाहते …

बबन ताम्बे Wed, 11/04/2015 - 17:26
दुसरा माणूस काय काढून गेला असेल? कल्याण, डोंबीवली बागांचे शहर आता बनणार का ? :-)

शिव कन्या Wed, 11/04/2015 - 17:30
बनेलवरच थांबूनही चांगले विडंबन पाडता येते हे समकालीन विडंबकांच्या निदर्शनास आणून दिलेत, मिशी आभारी आहे.:)(कुणाच्या निदर्शनास काही आणून देण्याचा आपला हेतू नसेलही. तरी आभाराचा स्वीकार असावा.)