।। बरे झाले स्वातंत्र्य मिळाले ।।
लेखनविषय:
बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले
ते गोरे साले रस्त्यामध्ये
थूंकू देत नव्हते
वेड्यासारखे रोज पाण्याने...
रस्ते धूत होते.
आपण किती भाग्यवान
गुटका पान तंबाकू खाऊन
रस्त्यात कुठेही थूंकू शकतो.
छान झाले स्वातंत्र्य मिळाले
ते इंग्रज साले धान्यामध्ये
भेसळ करू देत नव्हते
मूर्खासारखे रेशनवर
सकस धान्य देत होते.
आपण किती पुण्यवान
दूध अन्न औषधामध्ये
बेमालूम भेसळ करू शकतो.
बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले
ते ब्रिटीश साले शिक्षणाचा
धंदा करू देत नव्हते अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण
फुकटामध्ये देत होते
आपण किती विद्वान
शिक्षणाचा बाजार मांडून
पिढ्या बरबाद करू शकतो
चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले
ते जुलमी साले अनाथ मुलांना
भीक मागू देत नव्हते
दरिद्र्यासारखे त्यांच्याकरिता
अनाथाश्रम चालवित होते
आपण किती दयावान
अनाथ मुलांना पांगळे करून
भीक मागावयास लावू शकतो
झकास झाले स्वातंत्र्य मिळाले
ते मिशनरी साले गरिब रूग्णांस
हलाखीत मरू देत नव्हते
ईश्वरसेवा समजून त्यांची
सेवाशुश्रुषा करीत होते
आपण किती करूणावान
डाॅक्टरांचा संप घडवून
रूग्णांचे हाल करू शकतो
उत्तम झाले स्वातंत्र्य मिळाले
ते फिरंगी साले आपणाला
लाच खाऊ देत नव्हते
गाढवासारखे लाचखोरांस
बूटांच्या लाथा घालीत होते
आपण किती सचोटीवान
लाचखोरांच्या मिळकतीमध्ये
आपला वाटा ठरवू शकतो
छान झाले स्वातंत्र्य मिळाले
बरे झाले ते इंग्रज गेले
पण जाता जाता साले आपले
देशप्रेमही घेऊन गेले .
वाचने
2174
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
कविता उत्तम, थोडे संस्कार
तुमची का ही कविता?
In reply to तुमची का ही कविता? by चिगो
छान प्रतिसाद.
In reply to तुमची का ही कविता? by चिगो
छान प्रतिसाद.
In reply to तुमची का ही कविता? by चिगो
कवितेचा चांगला प्रयत्न आहे
In reply to कवितेचा चांगला प्रयत्न आहे by पगला गजोधर
तेही मुर्खच..
In reply to तेही मुर्खच.. by चिगो
बरोबर बोललात प्रगोजी …
In reply to तुमची का ही कविता? by चिगो
तुमची का हो ही कविता? नाही
In reply to तुमची का हो ही कविता? नाही by असंका
अवांतरः
In reply to तुमची का ही कविता? by चिगो
जबरा प्रतिसाद चिगो ! व्हॉट्सअ
चिगोंचा प्रतिसाद