माझा बसप्रवास
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”
तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो.
हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्याच लोकांना संशय होता.
गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?”
मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो.
म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं.
पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्या गावाहून येणार्या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज!
मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंडक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!
वाचने
45498
वाचनखूण
प्रतिक्रिया
99
काय हा कामचुकारपणा ड्युटीवर
In reply to काय हा कामचुकारपणा ड्युटीवर by शुचि
खेकडे
हा हा हा! मस्तच! बाकी त्या
In reply to हा हा हा! मस्तच! बाकी त्या by मेघवेडा
बसेसची नावे आणि दिशा
छान...म्हणजे आम्हाला वाचायला
In reply to छान...म्हणजे आम्हाला वाचायला by शिल्पा ब
सहनशक्ती
हसलो
In reply to हसलो by यशवंतकुलकर्णी
धन्यवाद
चांगला लेख आहे! (अधुन मधुन
In reply to चांगला लेख आहे! (अधुन मधुन by इंटरनेटस्नेही
धन्यवाद
छान!
छान लिहीलय.
टू व्हीलर सर्व्हीसेस इन पणजी
In reply to टू व्हीलर सर्व्हीसेस इन पणजी by इन्द्र्राज पवार
टू व्हीलर सर्व्हिसेस
गैरसमज !
In reply to गैरसमज ! by इन्द्र्राज पवार
गैरसमज
In reply to गैरसमज by पैसा
>>गोव्यात प्रवाशाला "घुमविणे"
In reply to गैरसमज by पैसा
सुंदर लिखाण.
चांगला आहे हो लेख.. मस्त शैली
पणजीतील कला अकादमी
वाचायला मजा आली... लिखाणाची
हा हा! मजेदार लेखन! गोव्यातील
मी कधी
ग्रेट कीप गोईंग...
मस्तच!
मस्त
मस्त
मस्त लेखन. गोव्यातली बस
ह ह पु वा
झकास!
मागच्या पावसाळ्यात गोव्याला
In reply to मागच्या पावसाळ्यात गोव्याला by किचेन
कोकण किणारा का? गोव्यात
In reply to कोकण किणारा का? गोव्यात by शैलेन्द्र
कोकण म्हण्जे हॉटेल कोकण! बाईक
In reply to कोकण म्हण्जे हॉटेल कोकण! बाईक by किचेन
कोकण किणारा नावाचं हॉटेलच
छान मनस्वी लेखन.
ये तो वाच्याच नय.
झकास. हा धागा कसा काय नजरेतून
In reply to झकास. हा धागा कसा काय नजरेतून by प्रचेतस
+१ हेच बोल्तो...
अॅक!!बरी पिशि गो तू
व्वा!!
मन्या फेणे यांचे आभार
भारी लेख हो पैसातै! कंडक्टर
अरेच्या
सुंदर.
. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी
ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्याच लोकांना संशय होता.ख्या ख्या ख्या.मस्त लेख
अचानक.
वाह, मस्तं खुसखुशीत लेख.
In reply to वाह, मस्तं खुसखुशीत लेख. by पद्मावति
+१
वा
धमाल!
In reply to धमाल! by बोका-ए-आझम
पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस
In reply to पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस by प्रीत-मोहर
>>> कानपिटिसन
In reply to >>> कानपिटिसन by प्यारे१
+१
भन्नाट लिहिलय!
In reply to भन्नाट लिहिलय! by चांदणे संदीप
हॅप्पी गो लकीच की!
डारे डारे
In reply to डारे डारे by नमकिन
??
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
डायरेक्ट!
In reply to डायरेक्ट! by पैसा
आले लक्षात...
छान
पैसाताई, अगदी चकलीसारखा
:)
लेख आवडला. आमच्या गावापासून
सफर होत केलेली सफर.
In reply to सफर होत केलेली सफर. by शिव कन्या
लेख आवडला आणि हा प्रतिसादपण !
लॆख आवडला पण थोडी काळजी वाटते
In reply to लॆख आवडला पण थोडी काळजी वाटते by मीउमेश
मंदिरे
In reply to मंदिरे by नमकिन
अवघड आहे माझ
In reply to अवघड आहे माझ by मीउमेश
काही प्रॉब्लेम नाही
In reply to काही प्रॉब्लेम नाही by पैसा
+१०००
In reply to काही प्रॉब्लेम नाही by पैसा
केला इशारा
कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा
एकदम खुसखूशीत लेख...
हही हही ह्ह्ह्हह्हाआ
बिचारी पै तै!!!
महाराष्ट्रात बस ने प्रवास केल्यानंतर गोव्यामधील ..
In reply to महाराष्ट्रात बस ने प्रवास केल्यानंतर गोव्यामधील .. by अक्षया
गोव्याचं माहिती नाय पण
In reply to गोव्याचं माहिती नाय पण by बॅटमॅन
+ १
नुकताच गोव्याला जाउन आलो
सुंदर लेख. प्रत्यक्ष अनुभव
लै भारी!
In reply to लै भारी! by चतुरंग
=))
\मुद्दाम हा लेख वर आणतेय =))
कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी
In reply to कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी by कंजूस
प्रीमो कोचिंग क्लास
मस्त लेख
मिपावर कानडी, तमिळ,गोय याचे
खुप छान लेख, आवडला.
दिवाळीतला चटकमटक चिवडा आजच ........