झोपडपट्टीतले दिवस: भाग एक
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्या बाया, दोन-तीन बकर्या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला.
आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता.
वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.
परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले.
आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते.
ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस.
क्रमशः
(सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५)
झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन
वाचने
72109
वाचनखूण
प्रतिक्रिया
191
धागा झोपडपट्टी पासून ते
खुप छान
वाचतोय
हजार बाराशे फुटांवर मी पण
In reply to हजार बाराशे फुटांवर मी पण by पिलीयन रायडर
सहमत आहे
In reply to हजार बाराशे फुटांवर मी पण by पिलीयन रायडर
तुम्ही नक्की कुठल्या
In reply to हजार बाराशे फुटांवर मी पण by पिलीयन रायडर
एखाद्या गोष्टीबद्दल किंवा
वाचतोय...
लिहिते राहा...
बाराशे वर्गफूट म्हणजे किती ?
In reply to बाराशे वर्गफूट म्हणजे किती ? by चित्रगुप्त
अजिबात नाही
In reply to अजिबात नाही by आदिजोशी
(ज्या टेबलवरचं बिल त्या
In reply to (ज्या टेबलवरचं बिल त्या by तर्राट जोकर
झैरातीसह सहमती.
In reply to झैरातीसह सहमती. by नगरीनिरंजन
कविता आवडली. माझ्या
In reply to (ज्या टेबलवरचं बिल त्या by तर्राट जोकर
असंघटित असणं हाच आत्मघात
In reply to असंघटित असणं हाच आत्मघात by मराठी कथालेखक
सेवेचे दर
In reply to सेवेचे दर by स्वधर्म
केस कापायला शिकायला किमान सहा
In reply to बाराशे वर्गफूट म्हणजे किती ? by चित्रगुप्त
1200 चौरस फुटामध्ये 10बाय10
In reply to 1200 चौरस फुटामध्ये 10बाय10 by प्यारे१
१२०० वर्गफूट
In reply to 1200 चौरस फुटामध्ये 10बाय10 by प्यारे१
असं कसं असं कसं? पत्रावळी,
लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न
In reply to लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न by नगरीनिरंजन
ह्म्म्म
In reply to लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न by नगरीनिरंजन
या धाग्याचा गाडा बाराशे
फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफ
In reply to फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफ by सुबोध खरे
काय त्रास आहे भेंडी,
In reply to फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफ by सुबोध खरे
बरोबर आहे. पण म्हणून
In reply to फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफ by सुबोध खरे
खरेसाहेब, तुमच्या समजूतीतच
उदाहरण
In reply to उदाहरण by चित्रगुप्त
ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः
In reply to उदाहरण by चित्रगुप्त
पाहून सांगतो. एकच शब्द
In reply to उदाहरण by चित्रगुप्त
भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात
In reply to भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात by बॅटमॅन
उदाहरणे
In reply to भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात by बॅटमॅन
माझं आवडतं आणि एकंदरीत प्रतिसाद तित्तिरी रौति असल्याने ....
In reply to माझं आवडतं आणि एकंदरीत प्रतिसाद तित्तिरी रौति असल्याने .... by सूड
कवितेच्या नशेत तर्राट होऊन
लोकशाही मधे प्रमाणिकपणा वगैरे
In reply to लोकशाही मधे प्रमाणिकपणा वगैरे by नाना स्कॉच
प्रमाणिकपणा वगैरे नुसत्या गफ्फा असतात असे वाटते
कालच्याच बातमीत रिक्षा
In reply to कालच्याच बातमीत रिक्षा by नाना स्कॉच
प्रश्न ९९ टक्क्यांबद्दल नसून
In reply to प्रश्न ९९ टक्क्यांबद्दल नसून by सुबोध खरे
डॉक, उरलेले कीतीही ट्क्के
जरा धिराने घ्या , लेख पुर्ण
लेखन मनाला भिडले.
In reply to लेखन मनाला भिडले. by विवेकपटाईत
@विवेकपटाईत -
>>>>> आदिजोशी ताई
In reply to >>>>> आदिजोशी ताई by प्यारे१
लोळ
In reply to >>>>> आदिजोशी ताई by प्यारे१
अगागगगगगग!!! ह्या नविन तै कोण
In reply to अगागगगगगग!!! ह्या नविन तै कोण by कॅप्टन जॅक स्पॅरो
अख्ख्या
In reply to अख्ख्या by नाखु
खरंच, 1200 वर्गफुटाच्या टीचभर
In reply to खरंच, 1200 वर्गफुटाच्या टीचभर by चित्रगुप्त
पुन्हा तेच.1200 वर्गफुट
तर्राट जोकर ह्यांनी सर्व
लेखकाच्या बालपणीच्या
पुढील भाग केंव्हा ?
In reply to पुढील भाग केंव्हा ? by चित्रगुप्त
ओ काका! इथेच इतकी शाळा झाली
लेखक महाशय सध्या
In reply to लेखक महाशय सध्या by मार्मिक गोडसे
गोडसे साहेब, सीआयडी साठी
In reply to लेखक महाशय सध्या by मार्मिक गोडसे
इति शेकट्री की श्यायडी ?! ;)
लिहीत रहा..
तुम्ही त्या काळच्या
In reply to तुम्ही त्या काळच्या by सूड
सूडभाऊंच्या प्रतिसादाशी सहमत.
चर्चा तर होणारच....... लेख
झोपडपट्टी ही मानसिकता आहे
In reply to झोपडपट्टी ही मानसिकता आहे by आदिजोशी
+१११११
In reply to +१११११ by ट्रेड मार्क
+१११११मानसिकता बदलणे मात्र
आता मात्र धागाकर्त्याने
In reply to आता मात्र धागाकर्त्याने by चित्रगुप्त
>>
In reply to >> by दत्ता जोशी
फाय्जे तेवळी मस्ती कर बाळा
In reply to फाय्जे तेवळी मस्ती कर बाळा by तर्राट जोकर
काही समजत नाही बुवा..तुमचा वय
In reply to काही समजत नाही बुवा..तुमचा वय by दत्ता जोशी
त्याचं असंय भाऊसाहेब,
लवकर येऊ द्या
छान लिहिलंय, मला तरी चुकीच्या
आपण आपला संयम सोडून एकही
सर्व सदस्यांचे पुनश्च आभार.
पुढच्या भागाच्या तयारीला लागतो.
अतिक्रमण केलेल्या जागेत लाईट
In reply to अतिक्रमण केलेल्या जागेत लाईट by हेमंत लाटकर
फुकटचे म्हणायचं राहिलं
hold your horses, boys. there
छान पुढचा भाग आहे का ?
झोपडपट्टीत राहणे ही मानसिकता
सुंदर लेखन व संयत प्रतिसाद
अतिक्रमित घर विकून दुसरे घर
तटस्थ लिखाण आवडले.
पुढला भाग?
पुढील भाग येण्यास उशीर होणार
In reply to पुढील भाग येण्यास उशीर होणार by आरोह
असं का वाटलं तुम्हाला?
In reply to असं का वाटलं तुम्हाला? by तर्राट जोकर
जे आहे ते मांडायला आधीही
In reply to जे आहे ते मांडायला आधीही by शलभ
हां ना राव. काही दिवस शांतपणे
In reply to हां ना राव. काही दिवस शांतपणे by तर्राट जोकर
:):):)
In reply to असं का वाटलं तुम्हाला? by तर्राट जोकर
स्वगत
In reply to स्वगत by ट्रेड मार्क
स्वगतः
In reply to स्वगतः by तर्राट जोकर
थोडी सुधारणा
In reply to थोडी सुधारणा by ट्रेड मार्क
तुम्हाला कसं कळलं ही जागा