माझं खोबार... भाग ६
इस्लामची दोन सगळ्यात मोठी श्रध्दास्थानं
इस्लाम हा जगातील तीन 'अब्राहामिक' धर्मांपैकी एक. अब्राहमिक म्हणजे ज्याची प्रेषितपरंपरा अब्राहम (इब्राहिम) पासून सुरू होते असा धर्म. सर्वशक्तिमान दयाळू इश्वराने धर्माचे ज्ञान पहिल्यांदा अब्राहमला करून दिले. त्याने ते त्याच्या मुलाबाळांना शिकवले. कालपरत्वे त्या धर्माचरणामधे विकृति येत गेल्या म्हणून इश्वराने वेळोवेळी त्याचे दूत (प्रेषित) त्या विकृति दूर करण्यासाठी पाठवले. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातली प्रेषित परंपरा जवळजवळ सारखीच आहे. ज्यूंची परंपरा मोझेस (मुसा) बरोबर संपते, ख्रिश्चनांची येशू (इसा) बरोबर संपते आणि मुस्लिम हे मानतात की मुहंमद हे शेवटचे आणि सगळ्यात परिपूर्ण प्रेषित. त्यांनी धर्म शुद्ध आणि परिपूर्ण स्वरूपात प्रस्थापित केला आणि म्हणूनच आता ह्या पुढे त्यांनी सांगितलेल्या धर्माचारात एवढीशीही ढवळाढवळ होऊ शकत नाही. त्यांच्या आधी आलेल्या सगळ्या प्रेषितांबद्दल (मुसा इसा सकट !!!) इस्लामला पूर्ण आदर आहे. पण मुहंमद ते मुहंमद. त्यामुळेच इस्लाम मधे धर्माची जी पाच व्यवच्छेदक लक्षणं (फाईव्ह पिलर्स ऑफ फेथ) सांगितली आहेत त्या पैकी पहिलं आहे 'शहादा'. (ह्याचा अर्थ विटनेसच्या जवळ जातो, आपण कबूल करणं म्हणू). शहादा म्हणजे 'ला इलाहा इल्लल्ला, मुहंमद रसूलल्लाह' (अल्लाशिवाय देव नाही आणी मुहंमद त्याचा प्रेषित आहे.... रसूल / पैगंबर = निरोप पोचवणारा, दूत) बाकीची चार लक्षणं म्हणजे 'नमाज (प्रार्थना)', 'उपवास (रमदान)', 'दान (झकात... ही प्रत्येक मुसलमान स्त्री पुरूषाला द्यावीच लागते. ती किती द्यायची हे ठरवायचे एक शास्त्र आहे, नियम आहेत. साधारण पणे मालमत्तेच्या २.५% असे प्रमाण आहे. मुस्लिम अंमलाखाली राहणारे मुस्लिमेतर झकात देत नाहीत त्यांच्ब्या साठी 'जिझिया' नावाचा कर असतो.)' आणि 'हाज'.
मुहंमद स्वतः मक्केमधे 'कुरेश' टोळीतल्या एका सधन कुटुंबात जन्मले. जरी ते सत्प्रवृत्त असले तरी वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत त्यांना आपल्या जीवनकार्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आज जो परिसर काबा म्हणून ओळखला जातो तो त्यावेळीही (आणि अनादीकालापासून) पवित्र मानला जात असे. अब्राहामचे घर तिथे होते असे मानले जाते. (ते घर इश्वरानेच अब्राहामला बांधायला सांगितले होते.) तत्कालिन धार्मिक समजुतिंप्रमाणे ती सर्वात पवित्र जागा होतीच. पण तिथे बजबजपुरी माजली होती. त्या जागेची देखभाल आणि रक्षण करण्याचे परंपरागत हक्क 'कुरेश' टोळीकडे होते. मक्केजवळ एका डोंगरात एक गुहा होती, पैगंबर नेहमी तिथे जाऊन ध्यान करत असत. वयाच्या साधारण ४०व्या वर्षापासून पैगंबरांना साक्षात्कार व्हायला सुरूवात झाली. आणि त्यांच्या जीवनाची पुढची २३ वर्षे ते होतच राहिले. ह्या साक्षात्कारांमधूनच त्यांना कुर'आन स्वतः इश्वराने सांगितले. आणि इस्लामचा उदय झाला. इस्लाम मधील खूपश्या प्रथा आधीपासूनच प्रचलित होत्या. उदाहरणार्थ हाज वगैरे. पैगंबरांनी त्यांना एक विशिष्ट स्वरूप दिले. सुरूवातीला त्यांना खूप त्रास झाला. सामाजिक छळ झाला. त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले. त्यांना मक्केतून बाहेर निघावे लागले. (हिजरा) त्यांना जवळ असलेल्या मदिनावासियांनी आसरा दिला आणि त्यांची शिकवण स्वीकारली. बर्याच संघर्षानंतर त्यांना मक्केवर विजय मिळाला.
पैगंबरांच्या जीवनातील अजून एक महत्वपूर्ण घटना म्हणजे त्यांचे सदेह स्वर्गभ्रमण. एका रात्री त्यांच्या स्वप्नात गाब्रिएल नावाचा देवदूत आला. त्याने त्यांना बुराक नावच्या पंख असलेल्या घोड्यावर बसवून पूर्ण स्वर्गाची (सात मजली) सफर (अजून एक अरबोद्भव शब्द!!!) घडवली. त्या वेळी त्यांना साक्षात अल्लाहचे दर्शन झाले. तसेच आधीचे सगळे देवदूत पण भेटले. अल्लाने तेव्हाच त्यांना 'सर्व मुस्लिमांनी रोज ५० वेळा प्रार्थना करावी' असा आदेश दिला पण त्यांनी वरंवार विनंति करून ती संख्या हळूहळू ५ वर आणली असा उल्लेख आहे!!! ही घटना आजही मुस्लिमांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. आणि त्यांचा त्याच्या सत्यतेवर पूर्ण विश्वास आहे. 'जन्नत'च्या ज्या काही संकल्पना आहेत त्या बहुतेक इथूनच उगम पावलेल्या आहेत.
त्यांचा अंत मदिनेत झाला. पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस कोण ह्या बाबत मात्र खूप मोठे वादंग झाले. ज्यांनी पैगंबरांचे एक सहकारी अबू बकर ह्यांना पाठिंबा दिला ते सुन्नी आणि ज्यांनी पैगंबरांचा जावई 'अली' ह्याला पाठिंबा दिला ते शिया. हा झगडा आजतागायत संपलेला नाहिये.
साधरणपणे इस्लामची स्थापना पैगंबरांनी केली असे आपण वाचतो म्हणतो. पण कट्टरपंथियांमधे असा मतप्रवाह आहे की इस्लाम हा आधी पासून होताच. हा जगातील आदि आणि एकमेव धर्म आहे. तो विकृत झाला होता त्याची पैगंबरांनी फक्त शुध्दी केली. म्हणूनच हे लोक जेव्हा एखादी मुस्लिमेतर व्यक्ति इस्लामचा स्वीकार करते त्याला 'कन्व्हर्जन' म्हणत नाहीत. 'रिव्हर्जन' म्हणतात. (म्हणजे तो मूळ धर्मात परत आला, नविन धर्मात नव्हे). हेच लोक कुराणाला 'फायनल टेस्टामेंट' असेही म्हणतात (ओल्ड आणि न्यू टेस्टामेंटच्या धर्तीवर).
इस्लामची सुरूवातीची वर्षे अशी संघर्षात गेली. आणि तत्कालिन अरबस्तानातल्या अनेक रूढी समजुती धर्माचा भाग होऊन बसल्या. तत्कालिन अरब हे बव्हंशी भटके होते. जगातल्या अतिशय वैराण अश्या प्रदेशात ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असे भटकत असत. साहजिकच त्यांच्या सामाजिक आचारविचारांमधे आणि त्यांना चिकटून राहण्याच्या वृत्ति मधे एक प्रकारचा चिवटपणा कडवेपणा होता. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज एखादा सर्वसाधारण मुस्लिमही धर्माच्या बाबतीत अतिशय हळवा आणि कडवा असतो. सुरूवातीला इस्लाम खरंच 'खतरे मे' होता. त्या वेळी पैगंबरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या जिकिरीने हा धर्म तगवला त्या आठवणी इतक्या घट्ट आहेत की आजही 'इस्लाम खतरेमे' म्हणले की सामान्य मुस्लिम कुठेतरी आतून व्यथित होत असावा. धर्म टिकवताना कडक शिस्त आवश्यक असेल तीच अजून चालू राहिली असेल. इस्लाम मधल्या बहुतेक सगळ्या प्रथा स्वतः पैगंबरांनी चालू केलेल्या आहेत आणी म्हणूनच त्यात काहीही ढवळाढवळ होऊ शकत नाही आणि त्या प्राणापलिकडे जपल्या पाहिजेत असे बहुतेकांना मनापासून वाटते.
अर्थात हे सगळं माझं मत आहे. मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे...
क्रमशःIn reply to बिपिनदा, by यशोधरा
In reply to सुरेख by आजानुकर्ण
In reply to बिपिनदा.. by प्राजु
In reply to बिपिनदा.. by प्राजु
In reply to धन्यवाद... by बिपिन कार्यकर्ते
In reply to अतिशय ओघवत्या शैलीतले लिखाण! by चतुरंग
In reply to भाग आवडला. by रेवती
In reply to उत्तम लेख by धनंजय
In reply to +१ by चित्रा
In reply to छान लिहीलय by लवंगी
In reply to +४ by सहज
In reply to सुरेख!! by पिवळा डांबिस
In reply to सुरेख by भिंगरि
In reply to फार सुंदर लेख! by संजय अभ्यंकर
In reply to आवडला रे ... by संदीप चित्रे
In reply to भाग आवडला by प्रियाली
इतर अरबी राष्ट्रांच्या मानाने युएई आणि बाहरिन हे देश खूपच सुधारलेले आहेत.ओमान विसरलीस!!! ओमानी तर ना सुन्नी ना शिया... त्यांचा 'इबाधी' हा तिसराच पंथ आहे!!! बिपिन कार्यकर्ते
In reply to लगे रहो.... by अनिल हटेला
In reply to बिपीनदा ब्याक इन ऍक्शन.. by धमाल मुलगा
बरेच दिवस तोच तो काथ्याकुटाचा चोथा चावून तोंड बेचव होऊन गेलं होतं बॉ!अरे माझी अवस्था पण अगदी अशीच झाली होती. खरं तर लिहायला मूड लागत नव्हता आणि सध्या अजिबातच वेळ मिळत नव्हता. पण मिपा एकदम थंड झाले आणि मलाच काहितरी विचित्र वाटायला लागले. वाईटही वाटत होते. मग बसलो स्वतःच आणि लिहिलं!!! :) बिपिन कार्यकर्ते
In reply to ला- जवाब ! by वाहीदा
आई असती तर तुझा ले़ख वाचुन नक्की तुला एकदा तरी भेट्ली असतीते राहूनच गेलं बघ!!! :( बिपिन कार्यकर्ते
In reply to मस्त रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to Original Quran has never been Disturbed by वाहीदा
In reply to इश्वराचे संदेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इश्वराचे संदेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दादुस आज by ब्रिटिश
आपन लई खूश हाय तुज्यावरचला एखादी चपटी भेटू शकते मला आता. ;) बिपिन कार्यकर्ते
In reply to अरब्युद्भव मराठी/हिंदी शब्द by गामा पैलवान
त्या बद्दल (हा पण अरबी?)हो. बद्दल हा शब्द 'बदल' या अरबी शब्दावरून आलेला आहे. त्या शब्दाच्या सर्व अर्थच्छटा इथे बघता येतील. https://www.google.co.in/search?q=arabic+to+english&ie=utf-8&oe=utf-8&gws_rd=cr&ei=fLcrVoG-K8S20gSto5qQCg
अरबीतल्या द चा फारसी/हिंदी/उर्दूत ज होतो, हे नव्याने कळले. मला वाटायचं की अरबीत द हा उच्चार लिहून दाखवता येत नाही. मराठीतही अरबीतल्या द चा ज करण्याचा काही नियम आहे का? कागद हा जसाच्या तसा उचललेला वाटतो. मात्र फारसीत ज करत असावेत बहुतेक. त्यावरून हिंदीत कागज शब्द आलेला दिसतो. 'रमजानके दिनोंमें इंतजार करना तुम्हारा फर्ज है, ऐसा इस कागज पे लिखा है' हे वाक्य 'रमदानके दिनोंमें इंतधार करना तुम्हारा फर्द है, ऐसा इस कागद पे लिखा है' असं मुळातून असावं. :-)मी ज्या मूळाक्षराबद्दल बोलत आहे ते थेट द असे नाही. ते आहे بض त्याचा नेमका उच्चार कसा लिहावा ते कळत नाहीये, पण अरबीत तो द व ध च्या मध्ये कुठे तरी येतो. फारसीसाठी अरबी लिपी वापरताना त्याचा उच्चार झ असा ठरवला गेला. नीट व्यवस्थित झ ला अरबीत ز (झाय) असे मूळाक्षर आहे. म्हणून, फारसी ब ऊर्दूत तो झ झाला. रियाध = रियाझ, करध = कर्ज, रमादान = रमझान, इंतधार = इंतझार असे उच्चार आपल्यापर्यंत येताना बदलले. कागद ज्या कागझ वरून आला तो मात्र फारसी शब्द आहे. कागदाला अरबी वरका / वरगा असे म्हणतात. या ق क/ग चा उच्चारही जरा न लिहिता येणाराच आहे. या वरका / वरगा वरूनच आपल्याकडचा वर्ख हा शब्द आला आहे. वर्ख लावतात तो चांदीच्या तलम कागदावरूनच.
काही अरबी शब्द संस्कृतसारखे दिसतात. नजर हाही अरबी शब्द आहे का? तसं असेल तर तो नदर असेल का? तसं असेल तर तो संस्कृतमधल्या नेत्र वरून आलेला वाटतो. खराब = क्षाराप = खारं पाणी ? अस् धातूवरून अस्सल? बद्ध वरून बद्दल (म्हणजे संबंधित)? अल् = अलम् ? जखम = यक्ष्म ?नजर हा शब्द अरबीतूनच आलेला आहे. अरबीत तो نظر असा आहे. 'नदर'. बाकी संस्कृत ते अरबी वगैरेबद्दल माझा काहीच अभ्यास नाही त्यामुळे काही बोलू शकत नाही. अरबीतले ث (था) हे असेच अजून एक मूळाक्षर. उस्मान हे अरबीत उथमान असे आहे. किंवा ओथमान. (अरबीत उ आणि ओ साठी एकच मूळाक्षर و (वाव) आहे.) हा थ फारसी / ऊर्दूत येताना स झाला. उथमानचा उस्मान झाला.
अवांतर : काही लोकप्रिय युरोपीय नावं मुळातून अरबी आहेत. त्याला म्हंटलं की जॉन, जोसेफ, डेनिस, डेरेक, डॅनियल, मोझेस, एब्राहम, जोनास, बेन (=बेन्जामिन) ही पुरुषांची नावं थेट अरबी वा त्यावर बेतलेली आहेत. तर बायांमध्ये रेचेल, रिबेका, मेरी, जेनेट ही नावं मिडल ईस्टातली आहेत.सर्व अब्राहमिक धर्म एकाच परंपरेतून आलेले आहेत. त्यामुळे, प्रेषित परंपरा तीच आहे. हिब्रू आणि अरबी भाषेतील काही शब्दही सारखेच आहेत. बेन - बिन ... चा मुलगा. बेन हे हिब्रू आणि बिन हे अरबी. काही काही भागातल्या अरबीतसुद्धा बिन चा उच्चार बेन असा होतो. विशेषत: उत्तर आफ़्रिकेत (मघरीब मध्ये). ज आणि य ही एकमेकांऐवजी वापरले जातात. युसुफ़ = जोसेफ़, इब्राहिम = अब्राहम, आयुब = जॉब (हा एक प्रेषित होता), याकुब = जेकब, सुलेमान = सॉलोमन, मुसा = मोझेस, इसा = येशू (जीझस), मेरी = मरियम (येशूला इस्लाममध्ये इब्ने मरियम असेही म्हणतात) इ. यातील प्रेषित असलेल्या व्यक्ती (मोझेस आणि येशूसकट) किंवा मरियमसारखी स्त्री मुस्लिमांना आदरणियच वाटतात. मात्र, पूज्य अथवा वंदनीय मात्र नाहीत. पूज्य किंवा वंदनीय फक्त अल्ला, अगदी मुहम्मदही नाही. एका व्यक्तीला, केवळ नाव 'अब्दुल नबी' असल्यामुळे सौदी अरेबियाचा व्हिसा मिळायला अडचण आली होती, हे मी स्वतः पाहिले आहे. अब्दुल म्हणजे 'चा दास' ... आणि दास तुम्ही केवळ अल्लाचेच असू शकता, नबी म्हणजे प्रेषितांचे नव्हे.
In reply to अरबी मूळाक्षरे by बिपिन कार्यकर्ते
In reply to माहितीबद्दल धन्यवाद ! by गामा पैलवान
फारसीत स हा उच्चार नाही हे ऐकून नवल वाटले.मी कधी असं म्हणलं? त्या मूळाक्षराचा उच्चार फारसीत येताना स असा झाला. इतकंच.
In reply to !! by बिपिन कार्यकर्ते
In reply to अर्रर्र...! by गामा पैलवान
In reply to बादवे ते 'थ' देखील मराठी थ by बॅटमॅन
In reply to आयमीन ते अरबी थ. फारसी by बॅटमॅन
In reply to रैट्ट सारे! by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to हो हो! अगदी सहमत. टंकाळा केला by बिपिन कार्यकर्ते
In reply to धन्यवाद, अता हा शीन पाहणे आले by बॅटमॅन
बिपिनदा,