झोपडपट्टीतले दिवस: भाग एक
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्या बाया, दोन-तीन बकर्या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला.
आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता.
वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.
परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले.
आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते.
ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस.
क्रमशः
(सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५)
झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन
वाचने
72109
वाचनखूण
प्रतिक्रिया
191
वाचते आहे, लिहा.
छान सुरुवात..
वाचतो आहे, पुलेशु.
परिस्थिती फिरते. जिथे फुले
In reply to परिस्थिती फिरते. जिथे फुले by भिंगरी
पुढे सगळं चांगलं झालं असणार.: +१
जुन्या आठवणी जाग्या केल्यात
छान लिहिलंय, जोकरभाऊ. आणखी
सुरेख प्रंजळ लेखन
In reply to सुरेख प्रंजळ लेखन by चित्रगुप्त
वासुनाका हे झोपडपट्टी वरचे
वाचतेय. पु भा प्र. छान
निराच झकास न हो!!,
छान लेख.
छान सुरुवात.
पुभाप्र
छान. आवडले लिखाण
वाचतोय
अपेक्षा वाढवल्या आहेत तुम्ही.
छान लिहिलय!
छान सुरवात
छान सुरुवात
मस्तच सुरुवात तजो!
छान सुरुवात.झाली आहे.
In reply to छान सुरुवात.झाली आहे. by रामदास
+१ हेच वाक्य टोचले!
In reply to +१ हेच वाक्य टोचले! by चतुरंग
+१
In reply to छान सुरुवात.झाली आहे. by रामदास
मी स्वत: बधवार पार्कच्या समोर
In reply to मी स्वत: बधवार पार्कच्या समोर by विलासराव
कोळीवाडा != झोपडपट्टी
अज्जुन ल्हिहा
छान लिहिताय.पुभाप्र.
खूप छान सुरवात. रामदास
सुंदर लिखाणशैली ! लेखन जरा
तजो भौ
मस्त जमलाय लेख...
मस्त जमलाय लेख...
पुभाप्र, पुलेशु...!
वास्तववादी लिहिलय
छान लिहिलय. पण शेवटी शेवटी
नंतर हळूहळू
In reply to नंतर हळूहळू by मार्मिक गोडसे
मला वाटते
In reply to मला वाटते by राही
सहमत.
सत्तरीच्या दशकात
छान लिहीत आहात.....
वा आवडलं लेखन . सरळ सोपी
वाचतेय!
दिस जातील दिस येतील
खुप छान जोकर साहेब. पुढचा भाग
In reply to खुप छान जोकर साहेब. पुढचा भाग by shvinayakruti
ज्याला आय नाय त्याला काय नाय
लेखन जबरा, वर म्हणतात
तितक्याश्या छान न वाटणा-या
+१
लिखाण बरं आहे
In reply to लिखाण बरं आहे by आदिजोशी
बळकावलेल्या जागेत बोरवेल
In reply to लिखाण बरं आहे by आदिजोशी
लेख आणि प्रांजळ निवेदन आवडलं
अॅड्या भावा लय फटकळ प्रतिसाद
तजो त्या वेळच्या गरिबीतुन आज
In reply to तजो त्या वेळच्या गरिबीतुन आज by मृत्युन्जय
+222
आदी जोशी. तुमचा प्रतिसाद
In reply to आदी जोशी. तुमचा प्रतिसाद by shvinayakruti
नो प्रॉब्लेम
In reply to आदी जोशी. तुमचा प्रतिसाद by shvinayakruti
तुम्हाला असहमत होण्याचा पुर्ण
गरिबीतून दिवस काढून वर आलात
क्लासिक आहे रे नाही रे
वरील काही झोपड़पट्टी म्हणजे
In reply to वरील काही झोपड़पट्टी म्हणजे by नाना स्कॉच
नाना स्कॉच! एक नंबर आयडी आहे!
In reply to नाना स्कॉच! एक नंबर आयडी आहे! by आदूबाळ
बबल्याssssssss
In reply to बबल्याssssssss by नाना स्कॉच
हायला झकासच स्वागत हाय!!!
In reply to हायला झकासच स्वागत हाय!!! by मांत्रिक
येक खुर्ची मही बी...
आधीचे तजोंचे लिखाण आणि मते
मला वाटते आपण तजो ह्यांच्या
In reply to मला वाटते आपण तजो ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पु- लोक वीज चोरुन विकणे
दी जोशी तुम्ही म्हणताय ते पण
In reply to दी जोशी तुम्ही म्हणताय ते पण by shvinayakruti
वीजचोरी
In reply to वीजचोरी by चित्रगुप्त
"त्याने गाय मारली म्हणून मी
ो. जोकर भाऊंचे आधीचे प्रतिसाद
सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
अॅब्सोल्यूटली.
In reply to अॅब्सोल्यूटली. by वेल्लाभट
+१
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
संयमित प्रतिसाद
कुणी काही म्हणो, तुम्ही लिहित
अतिशय सुरेख आणि प्रामाणिक
लिहा तुम्ही वाचु आम्ही.वेगळे
पुभाप्र
जागा फारशी नाही एकूण हजार
जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट.हजार बाराशे फुट आणि फारशी नाही? २३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते. शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा. वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात. असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.In reply to जागा फारशी नाही एकूण हजार by सुबोध खरे
हजार बाराशे फुट आणि फारशी
In reply to हजार बाराशे फुट आणि फारशी by तर्राट जोकर
२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित
In reply to २३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित by सुबोध खरे
खरेसाहेब, मला तुमच्या
आस्वादकाच्या भूमिकेतून
In reply to आस्वादकाच्या भूमिकेतून by चित्रगुप्त
"अमेरिकेत भारताच्या
In reply to "अमेरिकेत भारताच्या by चतुरंग
आवडले छान लीहता
In reply to आस्वादकाच्या भूमिकेतून by चित्रगुप्त
समीक्षकी चष्मा न चढवता निव्वळ
"बल्ल्या" झालाय धाग्याचा.....
च्यायला!
In reply to च्यायला! by प्यारे१
हा प्रतिसाद खूप आवडला. हसून