धरसोड
लेखनप्रकार
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात.
आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते.
आजोबा आले की आई मला काम सांगणार.
पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची.
हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत.
“आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं.
“ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले.
भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल.
कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा.
आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग?
असंल कायतरी. जौंदे.
हेंनी चा सोडला, कापी पकाडली.
येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं.
म्या असं काय केलं की आज्जी म्हन्ते “धरसोड”.
---
(अवांतर - शशक स्पर्धेतल्या कथा आता वाचणार आहे.)
वाचने
17790
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
खूप दिवसांनी आली आन्जी. नेहमीप्रमाणेच गोड, निरागस आन्जीची कथा आवडली.
In reply to खूप दिवसांनी आली आन्जी. by मधुरा देशपांडे
+१
:)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
चांगली आहे.
पुर्वीची कापी आठवली.
ही शशकही आवडली.
आज्जीची गोष्ट बऱ्याच दिवसानंतर आली
:)
मस्त :)
आन्जी आली आन्जी आली.
कुडं गेलती बे हुम्ब????
:)
छान आहे,आवडली.
:) नेहमीप्रमाणेच मस्तं !
आंजी म्होट्टी झाली की समजंल तिला. उलटसुलट करून त्याचं समर्थन करता आलं की त्याला “धरसोड” म्हणत नाहीत :)
In reply to :) नेहमीप्रमाणेच मस्तं ! by डॉ सुहास म्हात्रे
आंजी परतल्याचं पाहून आनंद झाला.
In reply to :) नेहमीप्रमाणेच मस्तं ! by डॉ सुहास म्हात्रे
+१०.
छान स्टाइल
बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले!
अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत!
आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा!
धन्यवाद!
Sandy
बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले!
अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत!
आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा!
धन्यवाद!
Sandy
मस्त! आंजी स्मार्टए!
आन्जी आली, आन्जी रॉक्स !
आजोबा बहुतेक बकरीचं दुध पीत असावेत, तेही काळ्या !
मस्त शतशब्द कथा हो.. :)
लय मस्त...
येक नमुना ऐसा भी: बाप मेल्यावर काहीतरी सोडायचे, म्हणून येका कारट्याने त्याला अजिबात आवडत नसलेली वांग्याची भाजी खायची सोडली....
कथा छान लिहिलेय. आवडली.
आंजी पुन्हा एकदा अवखळपणा करु लागली! :)
अंजी स्मार्ट आहे ,
तिचा प्रश्नं योग्यं आहे.
अवांतर : कॉफीवाल्यांचं चहाशी इतकं काय वाकडं अस्तं देव जाणे.
In reply to अंजी स्मार्ट आहे , by मनीषा
अवांतराशी सहमत. "मी कॉफी घेत नाही" असं चहा पिणारी व्यक्ती म्हणताना मी कधी ऐकलं नाही हे लक्षात आलं. पण कॉफीवाले मात्र अनेकदा चहा न घेणारे असतात.
आन्जी रॉक्स....
आंजी इज ब्याक!!!
अांजी आली का! भारी लक्ष हिचं.डोक्यात चक्र सुरूच असतंय बयेच्या!
छोट्याशा आंजीच्या इवल्याशा कथा !
...फार दिवसांनी वाचायला मिळाली.
कापी
माझे आजोबा आठवले. ते काफी म्हणायचे. तेंव्हा काफीची वडी मिळायची. आजोबा घरी आले तर काफी दुकानातून मी आणायचो.
मस्त लिहिता तुम्ही.
आंजीला भारी बाई उचापती.. चक्रं आपली चालू डोक्यात.. :D
आणि समाजात
उलटसुलट करून त्याचं समर्थन करता आलं की त्याला “धरसोड” म्हणत नाहीतच एकच नाव आहे पॉलीसी ( जी स्थलकाल सापेक्ष बदलता येते). उदा विवाहीतांना लग्नागोदर अगदी नजरेसमोर नको असलेली वांग्याची भाजी लग्नानंतर प्रिय(?) वाटू शकते. कथा आवडली. पुलेप्र
ही ही ही...आंजी खूप आवडली. क्यूट आहे एकदम.
अंजी रॉक्स
पैजाराबुवा,
:)
:) मार्मीक. बाकी जे आंजीला कळतं ते आज्ज्याला कळलं नाही... ह्या आज्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांनीच आपल्या देशाची खरी वाट लावली.
लहान मुलीचं निरागस भावविश्व तुम्ही अगदी नेमक्या शब्दांत मांडता.खूप छान!!
:)
ए आंजाक्का!!!!!!!!!!!! :)
भारी शशक. आंजी नेहमीप्रमाणेच गोड आहे.
क्या बात ! एकदम आवडेश !
जादा दौलत होतं असल्यास
सोडलेला बार धरलाच धरलाच पाहिजे
सोडलेला गुटका आणून पुन्हा
कैफासाठी बार भरलाच पाहिजे
मस्त आहे!
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.
चांगलीय
चांगली आहे.
खूप दिवसांनी आली आन्जी.