एक वर्षानंतर . . .
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________In reply to भारतास प्रगतीपथावर नेण्यास by श्रीगुरुजी
In reply to नेहरू by माईसाहेब कुरसूंदीकर
नेहरूंसारखा दूरदर्शी नेता नसता तर आय.आय.टी.,आय आय एम. डी आर डी. ओ सारख्या संस्था उदयाला आल्या असत्या का ?बससेवा सुरु करणे म्हणजे मुत्सद्दीपणा नव्हे. परिवहन मंडळाचे अधिकारी ते करत असतातच.देवेगौडा नसते तर भारतात आंतरजाल सुरू झाले असते का किंवा गुजराल नसते तर भारतात भ्रमणभाष सेवा सुरू झाली असती का या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच इथे लागू आहे.
In reply to नेहरूंसारखा दूरदर्शी नेता by श्रीगुरुजी
In reply to नेहरू by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बस माई by dadadarekar
संस्था सुरू करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी बाळगणे नव्हेआंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू करणे ह्या गोष्टी भिन्न आहेत.वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२,आय.टी.अॅक्ट-२००० ह्या गोष्टी झाल्याच असत्या असेच समजायचे ना?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू करणे ह्या गोष्टी भिन्न आहेत.वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२,आय.टी.अॅक्ट-२००० ह्या गोष्टी झाल्याच असत्या असेच समजायचे ना?नरसिंहराव यांनी १९९५ मध्येच पोखरणची तयारी केली होती, परंतु अमेरिकेला त्याचा वास लागल्यावर त्यांच्यावर दडपण आणून अमेरिकेने ती चाचणी होऊन दिली नाही. हे लक्षात घेऊन वाजपेयींनी अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून ती चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२, आय टी अॅक्ट - २००० इ. गोष्टी नक्कीच झाल्या असत्या.
In reply to आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू by श्रीगुरुजी
In reply to कुठल्या प्रकारची धूळ होती by प्यारे१
In reply to यथेच्छ टर आणि टिंगळटवाळी by गॅरी ट्रुमन
In reply to श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं by प्यारे१
श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं भाजप सरकारची पाठराखण चालवली आहे त्यामुळे थोडी खेचावीशी वाटली. ;)पाहिजे तेवढी खेचा हो. मी एंजॉय करतो.
मुळात काँग्रेस सरकार असतं तर असं झालं नसतं का असा प्रश्न आहे. कारण देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण हे शक्यतो सरकार निरपेक्ष असतं ऐकलं आहे.मी आधीच्याच प्रतिसादात लिहिले आहे. काँग्रेस सरकार असते तरी पोखरण-२ झालेच असते.
आज निर्णय घेतला आणि उद्या अणुचाचण्या झाल्या असं होणं शक्य नाही. १९९५ साली नरसिंहराव सरकार वर चाचण्या न करण्यासाठी दबाव आणला होता म्हणजे तेव्हा सगळी यंत्रणा सज्ज होती. १९९८ साली अणुचाचण्या झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया नकारार्थी होती का?पोखरण-२ झाल्यावर कम्युनिस्टांनी तर जाहीर विरोधच केला होता. पाकिस्तानवादी पुरोगामी विचारवंतांनी (उदा. कुलदीप नय्यर) देखील विरोध केला होता. कॉन्ग्रेसचा विरोध वेगळ्या प्रकारचा होता. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना भाजपने ही चाचणी याचवेळी का घेतली असे अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीररित्या विचारले होते आणि त्याचे उत्तर देखील दिले होते. सरकारला जयललिता त्रस्त करीत होती व त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावत होती. आपली प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी पोखरण-२ केले गेले अशी टीका काँग्रेसवाले करीत होते.
In reply to श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं by श्रीगुरुजी
In reply to पोखरण -१ by कपिलमुनी
In reply to भारतास प्रगतीपथावर नेण्यास by प्यारे१
In reply to नेहरूंच्या इतका International by मालोजीराव
In reply to नेहरूंच्या इतका International by मालोजीराव
In reply to मोदी सरकारने 1 वर्षात काय by हेमंत लाटकर
In reply to .. by dadadarekar
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लै वेळा + by नाव आडनाव
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
In reply to मिल्च अॅनिमलात by dadadarekar
- मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही खात नाही.
- वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. जी सगळ्यांना समान लागू पडते. फक्त हिंदुंना नाही. त्यामुळे हे प्राणी सर्वधर्मीयांनी खाणे बंद करावे अथवा घटना बदलुन घ्यावी.
- वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. ते माझे मत असेलच असे नाही पण घटनेला सर्वोच्च प्राधान्य असते असे कायद्याचा अभ्यास करताना वाचले होते. खरे खोटे नेहरु जाणे.
- नेहरुंनी असले वाद घातले नाहित असे इनोदी वक्तव्य माईंनी केले (माई, नाना, हितेश, सचीन, जिनीयस, फिलोसॉफर वगैरे सगळे तुम्हीच असे काही म्हणतात. जे इथे विचारात घेतले गेलेले नाही त्यामुळे माईंचा सेपरेट उल्लेख केला) म्हणुन केवळ पुरावा दिला. स्वतः नेहरुंनी देखील असल्या गंमती केल्या आहेत.
In reply to मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही by मृत्युन्जय
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
वरील कलम पूर्वीपासूनच आहे तर गोहत्याबंदीच्या कायद्याचे सेप्रेट नाटक कशासाठी ?ओ दादा. हे घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधले कलम आहे. मार्गदर्शक तत्वे आणि घटनेतील इतर बंधनकारक तरतुदी यातला फरक समजतो ना? याच मार्गदर्शक तत्वांपैकी कलम ४४ आहे: "—The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India" म्हणजे समान नागरी कायदा असावा. सध्या तो आहे का? एक गोष्ट समजत नाही. राज्यघटनेतल्या एका मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करायचा प्रयत्न झाल्यावर हे सगळे बुध्दीवादी, विज्ञानवादी आणि आदर्श लिबरल लोक इतका गोंधळ घालत आहेत. मग कलम ४४ ची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केल्यास किती गदारोळ घालतील असली मंडळी काय माहित!!
In reply to मार्गदर्शक तत्व by गॅरी ट्रुमन
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
In reply to दादा तुम्ही मूळ मुद्दा बघितला by मृत्युन्जय
In reply to गोमांस बंदी घटनेने बंधनकारक by कपिलमुनी
In reply to छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना by मृत्युन्जय
In reply to छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना by मृत्युन्जय
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
In reply to endeavour to organise by कैलासवासी सोन्याबापु
In reply to endeavour to organise by कैलासवासी सोन्याबापु
In reply to भाजपा गैर भाजपा वाद बाजूला ठेवून......... by दत्ता जोशी
In reply to भाजपा गैर भाजपा वाद बाजूला ठेवून......... by दत्ता जोशी
In reply to तुमच्या भावना समजू शकतो पण by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कदाचित तुमचा मुद्दा मला नित समजला नसेल by दत्ता जोशी
In reply to . by dadadarekar
In reply to गणित काहीतरी झोल वाटतंय. by sagarpdy
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to असू द्या हो. उगा आता आक्रोश नको. by dadadarekar
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to हे घ्या संदर्भ by याॅर्कर
पण पशुवध व्हायचे हे मात्र नक्की.पशुवध व्हायचे हे कोणीच नाकारत नाही. प्रश्न इतकाच की गोमांसभक्षण व्हायचे की नाही. बाकी तुम्ही दिलेले संदर्भ मी स्वतः तपासायला गेलेलो नाही.कारण एकतर दहावीनंतर संस्कृत एकदाही वापरलेले नाही त्यामुळे त्या संदर्भांचा योग्य तो अर्थ काढता येईल इतके संस्कृत मला येत नाही. पण जितके कितके संस्कृत मी बघितलेले आहे त्यावरून एक गोष्ट नक्कीच सांगतो की संस्कृत भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. आपण 'गो' म्हणजे गाय या अर्थी वापरतो त्याच शब्दाचे संस्कृतमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ होतात-- त्या अर्थांमध्ये गायीबरोबरच बैल, चंद्र, सूर्य, सरस्वती (देवी) असे अनेकविध अर्थ होतात हे http://www.spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=%E0%A4%97%E0%A5%8B&trans=Translate&direction=AU या संस्कृत डिक्शनरीवरून समजले. एकाच शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ होत असतील तर नक्की कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो शब्द वापरला आहे हे समजून घेतले नाही तर नक्कीच जो अर्थ अभिप्रेत आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा अर्थ काढला जाईल. हे सगळे कॉन्टेक्स्ट समजून जो अर्थ अभिप्रेत आहे तो काढण्याइतके संस्कृत मला नक्कीच येत नाही तेव्हा यावर अधिक भाष्य टाळतो. पण हे सगळे आदर्श लिबरल लोक छतांवरून बोंबलत आहेत की वेदांमध्ये असे उल्लेख आहेत तेव्हा ते अभ्यास करून बोलतात की या खाचाखोचा लक्षात न घेता काहीतरी लिहिलेले वाचून (बहुतांश इंग्लिश पुस्तके) काहीतरी पोपटपंची करत असतात? म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांचे असते का? आणि दुसरे म्हणजे क्षणभर मान्य केले की त्यावेळी गायी कापून खात होते. सो व्हॉट? कोणत्याही पुस्तकात काहीही लिहिले असेल तर त्यावर स्वतःचा विचार न करता ते जसेच्या तसे अंमलात आणणे यापेक्षा मोठा मूर्खपणा नसेल. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असल्यामुळे गरजा वेगळ्या असतील. एक उदाहरण द्यायचे झाले तर शाळेत असताना मला नेहमी वाटायचे की चिनी लोक झुरळे खातात-- म्हणजे घरी एखादे झुरळ आले की त्याला पकडून ते तोंडात टाकतात. असाच समज माझा बनविण्यात आला होता. १९४० च्या दशकात दुसरे महायुध्द आणि दुष्काळ या कठिण काळात काही ठिकाणी लोकांवर ही वेळ आलीही होती.पण म्हणजे चिनी लोक सरसकट झुरळे खातात असा अर्थ थोडीच होतो? हेच आदर्श लिबरल लोक हिंदू परंपरेतल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख जरी आला तरी त्यांची प्रतिक्रिया रस्त्यावरून जात असताना चुकून शेणात पाय गेल्यानंतर जसे तोंड होईल त्यापेक्षा वाईट असते. आणि हेच लोक कुठल्याकुठल्या वेदांमध्ये गोमांसभक्षणाचे उल्लेख आहेत म्हणून आताही तसे करावे हे म्हणतात याचेच आश्चर्य वाटते. समजा वेदांमध्ये अगदी म्हटले असले की माणूस कापून खावा तर ते माणूसही कापावा असे मानणार का?तेव्हा माझ्या मते वेदांमध्ये काय लिहिले आहे हे अगदी गौण आहे. आपल्या राज्यघटनेत जर ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून असेल तर त्याची अंमलबजावणी केली जात असेल तर त्यात चुकीचे काही नाही. आणि जर का हे मार्गदर्शक तत्व बहुसंख्य लोकांना मान्य नसेल तर राज्यघटनेतून ते कलम वगळून टाकावे. आपल्या (किंवा कुठल्याही) परंपरांमध्ये जे काही सध्याच्या काळाला उपयोगी आहे ते घ्यावे आणि बाकीचे टाकून पुढे व्हावे हे भान हिंदू परंपरा आणि संस्कृती इत्यादी इत्यादींचा जाज्वल्य अभिमान बाळवणार्यांना तर नसतेच. आणि आदर्श लिबरल लोक मात्र केवळ टिका करण्यापुरते आपल्या सोयीप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा वापर करतात. मला वाटते की ते जाज्वल्य अभिमानवाले तर नकोतच आणि आदर्श लिबरल तर त्याहून नकोत. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य आपल्याला काढता येतच नाही का?
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख by बॅटमॅन
In reply to +1 by याॅर्कर
In reply to बॅटमॅन बना बैट्समन!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to अश्वमेधात अजुनही बरेच उल्लेख by मृत्युन्जय
In reply to गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख by बॅटमॅन
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल-डुकरं खातात त्यांना गोहत्येसाठी दोषी ठरवण्याचं आपण सोयिस्कर विसरतो. इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही. दिसते फक्त एका गरिबाच्या घरच्या फ्रीजमधलं तथाकथि गोमांस.जोकराशी पूर्ण सहमत. (बॅटमॅन असून)
In reply to समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल by बॅटमॅन
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत.आई शपथ एक एक शब्दाशी सहमत! मला असेच काहीसे म्हणायचे होते. मुजरा घ्या ह्या तर्काला!
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
त्यांना काय खायचं, नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे एवढे सरळ
इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही.
कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटना नाही. उपलब्ध परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असावे असा त्याचा अर्थ असावा. गोहत्याबंदी हा शब्द घटनेत यायला तसा इतिहासही आहे. चर्चा करणारे हवेत तीर मारतात, सोयिस्कर तेवढंच उचलतात असे निरिक्षण आहे. भारतीय घटना भूतदयावादी-प्राणिपक्षी प्रेमी अशी काही नाहीये. राज्यघटनेचा अर्थ प्रथम, कायदेशीर नागरिकांना जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to लाडक्या नेहरूंचे लाडके वाक्य.. by dadadarekar
In reply to लाडक्या नेहरूंचे लाडके वाक्य.. by dadadarekar
In reply to लाडक्या नेहरु मामांचे आणखी by चिनार
In reply to चिनार सेठ, by प्यारे१
In reply to नाय हो…. म्हनल थोडी व्हेरायटी by चिनार
In reply to माझ्या माहितीनुसार ते वाक्य त्यागींचे नाही. by dadadarekar
In reply to हे वाक्य by बॅटमॅन
In reply to हे वाक्य by बॅटमॅन
In reply to तसं नै कै ब्याट्या.. by चिनार
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच प्रोब्लेम आहे असे ह्यांचे मत.नेहेरूंनीच बोस ह्यांचा अपघात घडवला, नेहेरूंना पटेल नको होते,नेहरू मराठी द्वेषक होते..असल्या पुड्या पूर्वीपासून सोडल्या जायच्या ह्या लोकांकडून.नेहरूंच्या राजकारणाला विरोध करता येईल पण देशोदेशीच्या लोकांन भेटून्,शेकडो कोटींची मदत घेउन ह्या संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला हे वास्तव आहे. गाय खावी की खाउ नये,शाकाहार की मांसाहार,वंदे मातरम म्हणावे की म्हणू नये हा वाद नेहरू घालत बसले नाहीत.बोस यांच्या कुटुंबियांवर ते बेपत्ता झाल्यावर पुढील २० वर्षे का पाळत ठेवली जात होती? त्यांच्या कुटुंबियांची पत्रे का फोडून वाचली जात होती? नेहरू सातत्याने संयुक्त महाराष्ट्राच्या का विरोधात होते? या प्रश्नांची उत्तरे सापडली की या पुड्या होत्या का वस्तुस्थिती होती ते तुमच्या 'ह्यां'ना समजेल. गाय खावी का नाही याविषयी घटनेतच उल्लेख आहे. वंदेमातरमचे म्हणाल तर 'तुम्हाला वंदेमातरम म्हणायचं नसेल तर तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण सगळ्यांनीच ते म्हणायला नको' असा निर्णय घेऊन नेहरू मोकळे झाले होते.
In reply to संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच by श्रीगुरुजी
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हा प्रतिसाद आठवला by श्रीरंग_जोशी
In reply to हा प्रतिसाद आठवला by श्रीरंग_जोशी
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
In reply to अगागागा by dadadarekar
In reply to अगागागा by dadadarekar
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
मोदींना राजकीय इच्छाशक्ती असल्याने मोदी शासनाचं मूल्यमापन काँग्रेसी सरकारपेक्षा वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. आणि नेमकं तिथेच घोडं अडतं. सुस्पष्ट धोरण असणे ही इतकी दुर्मिळ चीज होती की मोदींची पहिली काही वर्षे जनतेच्या अपेक्षांची निश्चिती (पूर्ती नव्हे) करण्यातच जातील. एकदा का अपेक्षांची निश्चिती झाली की मगच मूल्यमापन करता येईल.एवढा हास्यास्पद प्रतिसाद आजवर कुणा भक्ताने लिहिला नसेल....? तुम्ही काय लिहिताय हे तुम्हाला तरी कळत असेल अशी अपेक्षा आहे. माझ्या ह्या अपेक्षेची निश्चिती करण्यातच तुमचा किती वेळ जाइल कुणास ठाउक...
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
श्रीरंग_जोशी, तुमच्याशी सहमत आहे. शासनाच्या धोरणांतले कच्चे दुवे आणि अंमलबजावणीतल्या चुका दाखवून देणे श्रीगुरुजींना अवघड जाऊ नये. यासाठी शासनाला धोरण आणि अंमलबजावणीची इच्छा असणे अत्यावश्यक आहे.मोदी राजवटीतील चुका, चुकीचे निर्णय इ. वर लेख लिहायचा विचार आहे. केव्हा लिहावा हाच प्रश्न आहे. २ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली तर अजून किमान ७ महिने थांबावे लागेल. त्याऐवजी बिहार निवडणुक निकालानंतर (८ नोव्हेंबर नंतर) लिहिणे योग्य ठरेल. तसेही पुढील महिन्यात मोदी सरकारला दीड वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच लिहायचा प्रयत्न करीन.
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नेहरूंचं योगदान by गामा पैलवान
In reply to नेहरूंचं योगदान by गामा पैलवान
आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही म्हणताय तर तो मुद्दा मान्य आहे. हे योगदान फक्त प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित आहे. पण काँग्रेसकडून चित्रं असं रंगवलं जातंय की नेहरू सर्वेसर्वा होते. केवळ त्यांच्यामुळे भारतात आज तंत्रज्ञानाची क्रांतीबिंती दिसून येते, वगैरे, वगैरे.प्रशासनाचा मुद्दा सुद्धा मला मान्य नाही. लाल फितीचा कारभार, अवाढव्य आणि नुकसानीतले सरकारी उद्योग, डावीकडे झुकलेले भोंगळ समाजवादी आर्थिक धोरण, संरक्षणव्यवस्था दुर्बल ठेवणे इ. गोष्टी नेहरूंच्याच काळात झाल्या. नेहरू लोकशाहीवादी होते असे सांगितले जाते. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेले केरळमधील साम्यवादी सरकार १९५७ मध्ये बरखास्त करताना लोकशाहीची कोणती मूल्ये पाळली गेली होती? बाकी संयुक्त राष्ट्रसंघात नेलेला काश्मिर प्रश्न, कलम ३७०, चीनने केलेला दारूण पराभव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याची शक्यता असताना आपल्याऐवजी चीनचे नाव पुढे करणे इ. चुका काढल्या तर इथे तुंबळ युद्ध पेटेल.
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
गुरूजी तुमची विचारसरणी आत्यंतिक उजवी दिसते, अम्हांस काहीच आत्यंतिक पचत नाही देवानु, मग तो दादु असो का गुरूजीमी तथाकथित उजव्या विचारांचा आहे, पण आत्यंतिक विचारसरणी वगैरे अजिबात नाही.
In reply to भाजप हिंदुत्वाच्या नावाने इतरांची गळचेपी करत आहे. by dadadarekar
In reply to भाजप हिंदुत्वाच्या नावाने इतरांची गळचेपी करत आहे. by dadadarekar
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
In reply to केरळमध्ये २-३ वर्षांपूर्वी by श्रीगुरुजी
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
In reply to कशाला बिचार्याचा जीव घ्या? by गामा पैलवान
In reply to . by dadadarekar
चित्र : लोकसत्तामधून साभारIn reply to एक वर्षानंतर by कपिलमुनी
In reply to ६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to काय तुमी बापुसायेब, कसं कर्ता by तर्राट जोकर
In reply to बापा बापा!! ८ जणांचा जानोसा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्याबापू… एक डाव या घरी by चिनार
In reply to पण तुमाले कायचा तरास होऊ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to का राजेहो तुम्हाले म्या 'तूर by चिनार
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक वर्षानंतर by कपिलमुनी
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
In reply to निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to महागाई by कपिलमुनी
In reply to अहो पण डाळ तूटवडा हा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो पण डाळ तूटवडा हा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to . by dadadarekar
In reply to लेडीज बार by कपिलमुनी
In reply to लेडीज बार by कपिलमुनी
In reply to युक्तिवाद करायला सरकार नव्हते का ? by dadadarekar
(चित्र इथे दिसत नसल्यास आपणांस वरती स्क्रोल करुन पहावे लागेल , त्या तसदी बद्दल आगाऊ क्षमस्व)जर "हे निसर्गनिर्मित नाही तर कसे?" हा प्रश्न विचारात घेतला तर मला पुढील काही उपप्रश्न पडले आहेत एकट्या तुरीचा भाव एका आठवड्यात इतका चढ़ा कसा झाला? कारण ऐकवेळ तुरीचे 2014 मधले भाव जरी सोडले (65 रु किलो) सोडल्यास दिनांक 07 ऑक्टोबर 2015 ला किंमत होती 115-155 ₹/किलो ह्यातले ह्यातली उच्च बजुकडली किंमत पकड़ता 155₹/किलो ते 210₹/किलो अर्थात 55 रुपयांची वाढ ही एका आठवड्यात झाली आहे, उडीद डाळ ह्याच प्रकारे एका आठवड्यात 25 रूपये वाढली आहे, मुग 2 रुपये वाढली आहे मसूर 3 रुपये अन चणा डाळ 3 रुपये कमी झाली आहे, मग नक्की काय झोल आहे? तुर अन उडीद डाळी ला एकदम एका आठड्यात एका वर्षाच्या बरोबरी ची भाववाढ का झाली? अन चण्याची कमी का झाली? दुष्काळ सुद्धा सेलेक्टिव होता असे म्हणता की काय आता? का एक आठवड्या पासुन जनता तुर सप्ताह साजरा करते आहे ?(ह्या आठवड्यात इंधन दरवाढ झालेली ही दिसत नाहीये) तो भाई मामला क्या है? हे साठेबाजी वाढीला लागल्याचे इंडिकेटर नाहीये का? दूसरे, ठीक एकवेळ कोणी म्हणेल की तुर अन उडीद ह्यांचा खप सर्वाधिक असतो अन दुष्काळ ही आहे (जे अगदी बरोबर आहेच म्हणा) म्हणून एका आठवड्यात जीएसएलव्ही मधे बसली आहे तुर तर मी थोडक्यात "तुर : पेरा ते डाळ" मांडायचा प्रयत्न करतो प्रथम तुर पिक (विषयाला धरून जितके आहे तितकेच मांडतोय आत्ता) -पिक म्हणुन जबरदस्त दुष्काळ रेसिस्टेंट पीक -झाडांची मुळे "टॅप रुट सिस्टम" ची म्हणजे वाढ होताना विशिष्ठ काळ सोडता (40-45 दिवस) पोषण हिवाळ्यातले दव पडले तरी अन मातीच्या ओली वर सुद्धा भागते (अर्थात ऊँटा सारखी असते ही वनस्पती पहिले 45 दिवस दाब्बुन पाणी पिते), ह्या वनस्पती मधे सुद्धा आता बारीक दांडी चे "एचपीए 90" नामक वाण आले आहे जे ओलीत ला सूटेबल आहे (खुरटे असते झाड़ अन दाणा टापोर असतो पण एकंदरित लाग कमी) -कोरडवाहु साठी परंपरागत लांब पिक चक्र असलेली वाणेच बरी पडतात कारण ती अवर्षण परिस्थिती मधे टिकून राहतात, मिश्र पिक म्हणून लावली तरी उत्तम लाग देतात अन प्रचण्ड वाढतात जेणे करून मिश्रपद्धतीत अंतरपिकांस छाया अन ओल दोन्ही मिळते -ह्या परंपरागत तुरीचे झाड़ पुर्ण वाढल्या नंतर तोडायला कुर्हाड़ लागते इतपत त्याचा बूंधा होतो आमच्या विदर्भात,अन असे हे पिक मिश्र पद्धतीत असल्या कारणे मधल्या ओळीत 3 3 महिन्याची 3 पिके सहज निघतात -विदर्भात बहुसंख्य पेरा हा कोरडवाहु चा असतो कारण सिंचन शष्प नाही, हे पिक 270 दिवसांचे वगैरे असते म्हणजे पुर्ण वाढचक्र तश्या शेंगा 190 दिवसा नंतर सुरु होतात, साधारण 45 ते 90 मधे फुले धरणे वगैरे (पॉइंट टु बी नोटेड मी लॉर्ड) -आता 2013 चे पर्जन्यमान पाहता ते "नॉर्मल टु एक्सेसिव" गटात होते, म्हणजे 2013 च्या जून मधे खरिपात जी तुर पेरली होती तिला 45 दिवस (वाढीचे) जे अगदी स्लो असतात तेव्हा पुरेसे मुबलक पाणी मिळाले होते -190 दिवसा नंतर शेंगा म्हणजे सरासरी जानेवारी 2014 चा पहिला आठवडा ह्या काळात शेंग फुटवे फुटायला सुरुवात झाली होती, दाणे भरणे अंदाजे मार्च मिड पर्यंत नंतर मे पहिला आठवडा मधे शेंग काळी पडणे अन कापणी असे एकंदरित क्रॉप टेन्योर असते, -(आता आपण वळु डाळ उद्योगाकडे) तर अशी ही तुर आपण 10 मे 2014 च्या दरम्यान सोंगली (तोड़नी केली) तरीही तुरीचे पिक हे काही लगेच सोंगली-थ्रेशर मधे घातली-मिल ला पाठवली अन डाळ केली इतकी सोपी नसते तर लगेच जमीन पुढल्या पिकासाठी तयार करावी लागते (मशागत करणे जुनी तुर उपटणे इत्यादी) त्याच दरम्यान वळीव पाऊस कचरा करू शकतो म्हणून सेफ साइड ही तुर गोठ्यात शेड मधे वगैरे दाबून ठेवली जाते, तुर थेट मिल ला न धाडने अन दाबून ठेवणे ह्याचे एक अजून फायदेशीर कारण म्हणजे "क्युरिंग" करणे डाळीचे , तुर ही नीट वाळवली नाही तर डाळ काढ़ताना खुप नुकसान होते (छिलका नीट न उतरणे ते गर भागाचा घसारा वाढने पर्यायाने डाळ लो क्वालिटी होणे अन नफा कमी होणे) तस्मात् नवी पेरणे होईपर्यंत अन पावसाळा सरे पर्यंत तुर दाबणे अन नंतर ऑक्टोबर हीट मधे ती कड़कड़ीत वाळवली की भाव वाढीव मिळतो, अश्याप्रकारे 2015 मधे आपण जो डाळ साठा खातो आहोत तो 2013 च्या पेर्याचा आहे. -आता खरी ज्ञानबाची मेख पॉइंट, एक एक वर्षाची गॅप म्हणजे 2014 चा डाळ साठा 2016 मधे मार्केट ला येणार असता नॉर्मली, पण आता 2014 पासुन पाण्याने हात दिलाय एकंदरित तस्मात् तुरीच्या "फ्यूचर्स" ला तेजी आली कारण 2016 मधे तुटवड़ा असणार हे 2014 च्या पर्जन्यमानाने जवळपास फिक्स केले आहे, ही साठेबाजी नुसती डाळ नाही तर कच्ची तुर ह्याची ही सुरु आहे, अन आत्तापासुन भाव वाढायचे कारण ही तेच आहे, कारण 2016 मधला दाम दुप्पट नफ़ा खुणावतो आहे, नसता एका आठवड्यात किंमत 55-60 रु कसे उडी मारली असेल विचार करा आता स्वतःच! थोडक्यात एक वर्ष साइकिल लैप्स झाल्याने ह्यावर्षी चे भाव वाढणार नाहीत तर पुढल्या वर्षीच्या लोभात वाढणार आहेत. आता सांगा ह्यावर्षी चा भाव निसर्गनियांत्रित कसा (तरीही मी ह्यात दलाल अड़ते ह्यांची हरामखोरी , भारतातल्या सर्वात मोठ्या तुर मार्केट (अकोला-अमरावती-यवतमाळ) मधल्या मारवाड़ीलोकांची बीजेपी मधली उठबस वगैरे राजकीय अन सेंसिटिव विषय टाळतोच आहे)
In reply to डाळ भाव गणित करताना by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुमच्या वरील by श्रीगुरुजी
In reply to २०१६ मधे म्हणा की नैसर्गिक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
In reply to परत तेच! अहो तुम्ही २०१६ by कैलासवासी सोन्याबापु
परत तेच! अहो तुम्ही २०१६ बद्दल बोलत असाल तर मान्य आहेच की पण सद्धयाची भाववाढ ही नैसर्गिक लारणास्तव नाही शुद्ध नफेखोरी मधुन आलेली आहे असे मी म्हणतो आहे! आता २०१५ किंवा साध्यस्थिति अन २०१६ ह्याच्यातले नेमके काय समजले नाही आपणांस?भारतात तूरडाळीची वार्षिक मागणी अंदाजे २ कोटी ३० लाख टनांच्या आसपास आहे. भारतात २०१४ मध्ये तूर डाळीचे एकूण उत्पादन १ कोटी ७३ लाख टनांच्या आसपास झाले. म्हणजे मागणीच्या अंदाजे ७५% टक्केच उत्पादन झाले व एकूण तूट ५५ लाख टनांच्या आसपास आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे हे उत्पादन अजून कमी होऊ शकते. तुमच्या कोष्टकाप्रमाणे २०१५ मध्ये कमी उत्पादन होणार असल्याने त्याचा भावावर परीणाम २०१६ मध्ये दिसायला हवा. त्याच गणिताप्रमाणे २०१४ मधील कमी झालेल्या उत्पादनाचा भावावर होणारा परीणाम २०१५ मध्येच दिसणार ना.
In reply to परत तेच! अहो तुम्ही २०१६ by श्रीगुरुजी
In reply to काय गुरूजी, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा by तर्राट जोकर
In reply to गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा by तर्राट जोकर
गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा कॅमेरावरच बॉल दाणकन आदळलाय. बेल्स उडून ग्राउंडच्या बाहेर आहेत. तरीही गल्ली क्रिकेटमधल्या ब्याटमालक पोरासारखं "मी आउट नाहीच" असं म्हणणं कसं जमतं हो तुम्हाला? जावा घरी. क्लीन्बोल्ड झाला आहात.हा प्रतिसाद वाचून करमणूक झाली. इथे मला सोन्याबापू गोलंदाजी करीत नाहीत किंवा ते माझी गोलंदाजी खेळत नाहीय्येत. त्यामुळे त्यांनी मला किंवा मी त्यांना बाद करण्याचा किंवा आम्ही एकमेकांची गोलंदाजी फोडून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तरीसुद्धा माझा त्रिफळा उडालाय अशी तुम्ही स्वतःची समजूत करून घेत असल्यास माझी अजिबात हरकत नाही.
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
In reply to त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि by नाव आडनाव
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
In reply to आणि चतुर व्यापारी याचा फायदा by मृत्युन्जय
In reply to कोणी केला बाप्पा! ;) by कैलासवासी सोन्याबापु
नेहरू