माणसांना पालवी नाही ..
लेखनविषय:
काव्यरस
चेहर्यावर टवटवी नाही
वाटते,माझी छवी नाही
दूरवर नुसतेच रण आहे
माणसांना पालवी नाही
बालकांचे अर्भकांचेही
हास्य आता लाघवी नाही
हाक देवाला नका मारु
भाव त्याचा वाजवी नाही
तू कधी येशील तेव्हा ये
ही प्रतिक्षाही नवी नाही
हा कुणाचा चेहरा आहे
आज काही चौदवी नाही
डॉ.सुनील अहिरराव
वाचने
4096
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
डॉ. साहेब!
In reply to डॉ. साहेब! by चांदणे संदीप
आभार संदीपजी !
+१११
In reply to +१११ by एकजटा अघोरी
खूप खूप धन्यवाद.
आवडली
In reply to आवडली by पैसा
हो, ही गझल आहे. खूप खूप आभार.
मस्त!!!
In reply to मस्त!!! by मांत्रिक
खूप खूप आभार मांत्रिकजी!
चांगली कविता, आवडली.
In reply to चांगली कविता, आवडली. by सौन्दर्य
धन्यवाद सौंदर्य!
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्रIn reply to छान... by मदनबाण
खूप खूप आभार !
In reply to खूप खूप आभार ! by drsunilahirrao
एक सूचना.
क्लास! मस्त जमलीय.
In reply to क्लास! मस्त जमलीय. by वेल्लाभट
हेच नि असेच म्हणायचेय.
@एस, आपल्या सुचनेचे मनापासून
In reply to @एस, आपल्या सुचनेचे मनापासून by drsunilahirrao
छवी नाही; पण छबी ऐकलाय मी