मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसांना पालवी नाही ..

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चेहर्यावर टवटवी नाही वाटते,माझी छवी नाही दूरवर नुसतेच रण आहे माणसांना पालवी नाही बालकांचे अर्भकांचेही हास्य आता लाघवी नाही हाक देवाला नका मारु भाव त्याचा वाजवी नाही तू कधी येशील तेव्हा ये ही प्रतिक्षाही नवी नाही हा कुणाचा चेहरा आहे आज काही चौदवी नाही डॉ.सुनील अहिरराव

वाचने 4097 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by drsunilahirrao

एस Wed, 10/14/2015 - 13:43
डॉक्टरसाहेब, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन आभार मानण्यापेक्षा एकच प्रतिसाद लिहून त्यात सर्वच वाचकांचे व प्रतिसादकांचे एकत्रितच आभार मानले तर ते जास्त योग्य वाटते. तसा नियम नाहीये, पण आंतरजालावरील एक संकेत आहे असे म्हणणे योग्य ठरेल. बाकी कविता छान आहे.

वेल्लाभट Wed, 10/14/2015 - 15:35
क्लास! मस्त जमलीय. वैयक्तिक मला मराठी रचनेत हिंदी/उर्दू शब्द रुचत नाहीत त्यामुळे छवी, चौदवी... सोडून बाकी ग़ज़ल छान

drsunilahirrao गुरुवार, 10/15/2015 - 10:49
@एस, आपल्या सुचनेचे मनापासून स्वागत आहे :) धन्यवाद वेल्लभट जी, छवी हा शब्द मराठीत बर्यापैकी प्रस्थापित आहे.मात्र चौदवी हा शब्द नक्कीच खटकणारा वाटू शकतो. खूप खूप धन्यवाद. शिव कन्या, आभार !