मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"हाय"कू

नाखु · · जे न देखे रवी...

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही. आमच्या भीडस्त आणि कोकरू मनाने तो प्रोत्साहन "थम्स अप" या अर्थाने घेऊन समजूत घातली.) शेवटी बॅटोबांशी संपर्क केला तर ते गारव्या यांच्या "गीतेतील ऊकार आणि मिपातील टुकार एक अन्योन्य कार्यकारण भाव” या शोधनिबंधासाठी मार्गदर्शक म्हणून व्यग्र आहेत असे समजले. आम्ही खट्टू मनाने गुरुजी प्रतीमा डोळ्यासमोर आणून पुढील काव्य-जिलेबी पीठ लावायला घेतले आणि...... खास मिपाकरांसाठी ताट सजवले. ****** ब्लॉग रद्दी थोपु सद्दी वाचक रिता सुना सुना ================= धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ================= भाव विभोर हाव छचोर साद घालीसी पुन्हा पुन्हा ================== हळूच कट्टा मिटवू बट्टा भांड्याची आठवण गुन्हा गुन्हा ====================== खफ जोगवा लेख नागवा किंचाळे मनगटी चुना चुना ===================
अखिल मिपा "हाय"खालेल्या कुप्रसीद्ध चिमण हटेला मित्र परीवार आणि सत्कार मूर्ती जेपी संचालीत ट का मिपा साक्षर ते सु(र्)शिक्षीत योजना यांचे सहकार्याने आणि प्रोत्साहनाने.

वाचने 27105 वाचनखूण प्रतिक्रिया 50

दमामि 07/10/2015 - 09:47
भारी कविता तुम्ही लिहिता आठवे ब्रम्हेंची लुना लुना ( तेवढं एकच यमक शिल्लक होतं)

अत्रुप्त आत्मा 07/10/2015 - 10:21
हहा हहा हहा हहा!!! :-D गळका नळ फाटकं टमरेल थेंब थेंब पाणी पुन्हा पुन्हा आगोबा रांगेत डब्डे टांगेत घूसखोर आहे जुना जुना :-D

टवाळ कार्टा 07/10/2015 - 11:59
सिंव्हाचा गड चोहिकडे हिरवळ उत्कटतेस साक्षी कोना कोना ;)

सतिश गावडे 07/10/2015 - 13:11
लेखातील हायकू प्रचंड आवडले. प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे *(माझ्या बायकोचा) सांगू किती मी चांगुलपणा असल्यावरती टनाटना नसल्यावर मग कणाकणा *ही ओळ नेमकी आठवत नाही.

तर्राट जोकर 07/10/2015 - 13:36
ढळला पदर, बाजारी गदर, वेड लावी कुणा कुणा कुजकट जळला राखेत कळला देह संपतो जुना जुना काचेवर टकटक बघतो एकटक सिग्नलवर विकतो चणा चणा आरती इथे लक्ष तिथे दूध जातंय का उतू क्षणा क्षणा

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 07/10/2015 - 13:46
दुसरा आवडला. पहिल्यामध्ये "गदर" काही अर्थाने वापरला आहे की नुसताच यमकी फिलर आहे? :)

सूड 07/10/2015 - 14:37
जमलंय!
यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.

बॅटमॅन 07/10/2015 - 16:38
नाखुन काका काव्य सपाटा काढि पिसांना पटा पटा!

दिवाकर कुलकर्णी 07/10/2015 - 18:19
गद्य लेखन पद्य लेखन सर्व लेखन वंद्य लेखन ष्टाईल्च भारी है भाई

पैसा 07/10/2015 - 18:34
=)) नाख़ुनचे हायकु भिताय कायकु नवलेखकाना जुने म्हणा!

In reply to by पैसा

अन्या दातार 07/10/2015 - 18:42
नवलेखकांना 'आपले' म्हणा हे जास्त चांगलं वाटतय

In reply to by अन्या दातार

पैसा 07/10/2015 - 18:57
ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!

दिवाकर कुलकर्णी 07/10/2015 - 19:34
चारोलीचे हायकु भितोय कायकु भ्यायास्नी आमाय हाय कि घरा याक बायकु ( तिस इचारूण शाण लिवल्याल हाय )

मित्रहो 07/10/2015 - 20:04
एकापेक्षा हायकू सांगती नाखु बाकी सारे मम म्हणा

रातराणी 07/10/2015 - 23:53
कालचीच स्क्रिप्ट कालचाच बग लंचटाइम झाला पळा पळा. हे गुर्जीन्साठी गुर्जी नाराज कुणाचा आवाज धोतर तुमचे सांभाळा सांभाळा. रुसू नका बरे! :)

मदनबाण 08/10/2015 - 03:27
मस्त... @ आत्मास्तु हॅहॅहॅ... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

dadadarekar 08/10/2015 - 06:40
शेतकरी मरतो मोदी फिरतो नवा देश पुन्हा पुन्हा

In reply to by dadadarekar

अत्रुप्त आत्मा 08/10/2015 - 08:49
तेच पीठ तीच जिल्बि मती मंद तू रे जुना जुना

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 08/10/2015 - 12:04
कधी हि तेस कधी जीनी यस येती पुन्हा माई-नाना :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 08/10/2015 - 14:09
कंचाबी इश्श्यू धरता टिश्श्यू लावी जनां तो चुना चुना खमके उत्तर यमकी लक्तर "बुवा मस्त!" म्हणा म्हणा

कोमल 08/10/2015 - 08:30
लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली. हैकूदाता सुखी भव| @दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??

चौकटराजा 10/10/2015 - 16:59
बुवा रॉक्स खवट फॉक्स करतो टॉक्स अगोबाच्या नावाने ठणा ठणा

प्यारे१ 19/10/2015 - 16:37
झाला खून एक पडती मुडदे अनेक मरते लोकशाही पुन्हा पुन्हा असू दे की हिंदू असो मुसलमान वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा हाती असो तलवार असो ती कृपाण चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा खाऊ आम्ही शाक किंवा खाऊ पाव जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा नकोच ती नीती नको मज पंथ जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा