मराठी अंताक्षरी

आजानुकर्ण जनातलं, मनातलं
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.
वर्गीकरण

317 टिप्पण्या 171,968 दृश्ये

Comments

ज्ञानोबाचे पैजार नवीन

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे पैजारबुवा

Gayatri Muley नवीन

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही... ह

Gayatri Muley नवीन

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे -दिलीप बिरुटे

Gayatri Muley नवीन

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

Gayatri Muley नवीन

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू

ज्ञानोबाचे पैजार नवीन

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा गे माये पैजारबुवा,

Gayatri Muley नवीन

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

दुर्गविहारी नवीन

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे

दुर्गविहारी नवीन

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे

ज्ञानोबाचे पैजार नवीन

रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय, बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय पैजारबुवा,

भिंगरी नवीन

या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया. ऐकू न येते हळू हळू अशी माझी छबी बोलते.

ज्ञानोबाचे पैजार नवीन

तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार नवीन

डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी पैजारबुवा,

भिंगरी नवीन

ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥

ज्ञानोबाचे पैजार नवीन

लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लायेकरनी पोरी लायेकरनी वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परकर्या मुंबईकरनी भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही. पैजारबुवा,

भिंगरी नवीन

द्रौपदी नाटकातली आहे. एव्हढीच दिसते आहे. (कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील) संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी'

ज्ञानोबाचे पैजार नवीन

चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटं वरचं गानं पैजारबुवा,

ज्योति अळवणी नवीन

रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला