आयटीची गोष्ट
लेखनविषय:
काव्यरस
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II
पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII
पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II
वाढता डॉलर III दिसो लागे IIII
गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II
जीवनाची आस III विझवुनी IIII
मेल देती घेती I रिलीज भोवती II
सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII
नाही जात पात I सगळेच एक II
ढाळती पदर III युरो साठी IIII
लाल लाल ओठ I रंगविती सर्व II
गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII
मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II
चराचर जणू III रांड वाडा IIII
लेकुरवाळी माय I गेली परदेशा II
पान्ह्या वीना पोर III सुकलेले IIII
कशासाठी सर्व I उर फाटी धाव II
खोल गेले डोळे III जिवलगा IIII
पुरुषार्थ व्यर्थ I विझे बाईपण II
कित्येक प्रतिभा III वांझ झाल्या IIII
मागणेची एक I जोडूनिया हात II
असा जन्म देवा III पुन्हा नको IIII
वाचने
7021
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अभंग छान आहेत!
नमस्कार स्विकारां … आपण पोट भरण्यासाठी साठी काय करता? नै म्हणजे आयटीवाल्यांवर उगाळून झालंय आपलं बी सांगा …
काहीही हं य...
पण आयटीवर राग का?
बापरे बाप! खरच इतकी भयाण परीस्थिती असते का हो आयटित?
ते "पुण्ण्याची" आहे की। पुण्याची?
प्रॉब्लेम आहेत, पण इतके नाहीत राव.
नाही पण ऐटीत राहतो म्हून आप्ला पास.
आयटीतल्या लोकांना फसवून "कोलोनियल बाँडेड लेबरर" बनविले जात आहे असे चित्र यक्दम डॉळ्ञास्मोर उभे र्हाय्ले ना राव ! =)) जाग्तिक कोर्टास केस कर्राय्ला पाय्जे भाऊ ;) :)
In reply to आयटीतल्या लोकांना फसवून by डॉ सुहास म्हात्रे
आमी हौ बा तयार लेबर बनाय्ले. पण कुणी बन्वुनच नाय रायले . ;-) :'(
काही ही तारे तोडलेत. तुमचा पेशा काय आहे?
आज आपल्याच भावा मैत्रीणींची लाज या कवीतेत काढली असुनही एक सजग मराठीमन त्यावेरुध्द पेटुन उठले नाही हे बघुन एक मिपाकर म्हणून मला कमालीची शरम वाटली.... धिक्कार. धिक्कार. धिक्कार. त्रिवार धिक्कार कलेच्या या दुरुपयोगाचा.
सेम ओल्ड षिट.
In reply to सेम ओल्ड षिट. by बॅटमॅन
+१
In reply to सेम ओल्ड षिट. by बॅटमॅन
षिट श चे पोट फोडून बाहेर आले :)
माझा एक बँकेत म्यानेजर असलेला मित्र आहे. असलीच कविता तो त्याच्या ऑफिस बद्दल गात असतो.
आयटीची गोष्ट पॅकेज पॅकेज
रात्रभर झोपेची तळमळ तळमळ
तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड
सगळे आयटीप्रेमी नवलेखकाच्या मागे दगडचं घेऊन लागली की काय...?
असो काव्याचा अर्थ तसाही भयावह आहे.
येऊद्या एखादा फक्कड फर्मास...!
खरी परिस्थिती ठाऊक नाही, पण काव्य मस्त जमलंय!
In reply to खरी परिस्थिती ठाऊक नाही, पण by किसन शिंदे
च्यामारी किसना. तुला चक्क कविता आवडली?
कस्काय म्हणे?
सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे ….
धन्यवाद मंडळी . "same old shit " "तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड" पासून " पण काव्य मस्त जमलंय!" पर्यंत मिळालेल्या सर्व जाणकार ,दर्दी प्रतीकीयां बद्दल आभार .
मी स्वतः IT मध्ये १५ वर्ष काम करतोय.
खरं तर हे अभंग जेंव्हा एक आई तीन महिन्यांच्या पोराला भारतात ठेवून "on site " गेलेली पाहिलं तेंव्हा सुचले .
"वेदना चेतना विश्व जागवते " ची अनुभूती आली .
अर्थात बाकी व्यवसायात ह्याच्या हून प्रचंड खडतर परिस्थिती असेलच .
प्रतिकूल परिस्थितीत लढणारे सैनीक ;एखाद्या नकाशा वर अस्तित्व नसलेल्या खेड्यात आयुष्य झिजवणारे शिक्षक ह्यांच्या पुढे जीवन सुखासीन आहेच.
पण इथेही परिस्थिती चिघळतेय.
त्यामुळे हे अनुभव "तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड" कसे ? ह्याच्या विचारात मी सध्या आहे .
असो.
धन्यवाद पुन्हा एकदा .
In reply to सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे …. by यमन
जर १५ वर्षे इथ काढली आहेत तर दोष आयटीचा नसुन भारतियांच्या हावरट वृत्तीचा आहे. कुठे थांबावे हे न समजणार्या व्यक्तींचा आहे हे लक्षात आले नाही का ?
In reply to सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे …. by यमन
आई पोराला सोडून बाहेर देशी गेली त्यामागे काय हेतू आहे याला महत्व आहे. जर फक्त ऑन साईट जायचे म्हणून असेल तर नक्कीच वाईट आहे पण जर घराला हात भार लावण्याच्या उद्देशाने गेली तर मग हिरकणीचे पोवाडे कशाला गायचे?
हि गोष्ट खरी आहे कि आय टी कंपन्यांमध्ये हावरटपणा अगदी उठून दिसतो. या क्षेत्रात येण्या अगोदर इलेक्ट्रोनिक्स आणि मान्युफाकचरिंग मधल्या नोकर्या अगदी जवळून बघितल्या आहेत. कामात एक प्रकारचे समाधान असायचे आणि आजू बाजूच्या लोकांशी एक 'संवाद' असायचा. आय टी मध्ये त्या गोष्टीचा अभाव जाणवतो. आहे टी फक्त स्पर्धा. आणि मग ससेहोलपट होणारच.
In reply to सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे …. by यमन
तुमच्या लिखाणाचा आशय समजला. तुमच्या प्रकटनाने त्यामागची तळमळही लक्षात आली. लिहिण्याचा प्रयत्नही चांगला होता.
फक्त वृत्त, छंद, लय यांकडे जरा लक्ष दिलंत तर रचना आधिक प्रभावी होईल असे वाटते. प्रतिभा तर आहेच तुमच्याकडे!
(IT चा नसणारा पण का कोण जाणे IT चा समजला जाणारा)
Sandy
आपल्या पेशा ला कधीच नाव ठेवु नये, लोकांस नोकऱ्या मिळत नाहीत आपल्याला आहे तर आपण त्रासु नये असे मनापासून वाटते
(रेजिमेंटेड) बाप्या
मला तर हे आयटी च्या कोणा एकाचे आरश्यात स्वतःला पाहणे वाटलं. सोन्याबापू, मला माफ करा पण जर आपल्या पेशातील वाईट गोष्टी जर आपणच लक्षात घेतल्या नाहीत तर चांगले बदल कसे होतील? ( मी सध्या कोण्त्याही पेशा वा नोकरीत नाही.)
In reply to अभंग आवडले. by प्रियाजी
मान्य आहेच !!
फ़क्त आपण आपल्या वैयक्तिक करियर मधे घेतलेले पाहिलेले अनुभव हे generalize करुन सुद्धा उपयोग नाही न ताई?
Vishay gambhir aahe. Arthaat, bhaavna vyakt zhalya aahet hya kavitetoon. Pu le shu.
छान..!