आयटीची गोष्ट
लेखनविषय:
काव्यरस
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II
पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII
पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II
वाढता डॉलर III दिसो लागे IIII
गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II
जीवनाची आस III विझवुनी IIII
मेल देती घेती I रिलीज भोवती II
सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII
नाही जात पात I सगळेच एक II
ढाळती पदर III युरो साठी IIII
लाल लाल ओठ I रंगविती सर्व II
गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII
मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II
चराचर जणू III रांड वाडा IIII
लेकुरवाळी माय I गेली परदेशा II
पान्ह्या वीना पोर III सुकलेले IIII
कशासाठी सर्व I उर फाटी धाव II
खोल गेले डोळे III जिवलगा IIII
पुरुषार्थ व्यर्थ I विझे बाईपण II
कित्येक प्रतिभा III वांझ झाल्या IIII
मागणेची एक I जोडूनिया हात II
असा जन्म देवा III पुन्हा नको IIII
वाचन
7019
प्रतिक्रिया
0