बहिर्वक्र म्हणा हवे तर , विडंबन हा आरसा
देखणे वा कुरुप तुम्ही, फरक नाही फारसा...
पाडती जिलब्या इथे , वर वापरुनी डालडा
रंग नाही स्वाद नाही , जाहला अतिसारसा..
ट्रोलभैरवांचे जथे मुक्त फिरती हिंस्रसे
हरून पडला नवमिपाकर त्यापुढे गपगारसा..
आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला
जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा...
सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे
"मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
17533
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरण्यरुदन नाही हे
दमामी, आपण विडंबकारांचे
आवडले!
+१
In reply to आवडले! by अजया
"खरा मिपाकर विडंबनाने वैतागत (त्रागा) करत नाही, तसाच वाहव्वा केल्याने शेफारूनही जात नाही"
मुवी बाबांची प्रवचने भाग ५ "माझ्यात घुसुनी अजून उरलो मी" प्रकरण ८.कुणाच्या खांद्यावर कुणाची दंबूक या प्रकरणातून साभार. मुवींनी या अप्रकाशीत+आगामी पुस्तकाचे हस्तलिखित दाखविल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. नितवाचक्विडंबक्डुबुक्डुबुक्डरोअॅव्दुर्लक्ष्यक्संघकुणाच्या खांद्यावर कुणाची
आम्ही ज्यांचे
In reply to कुणाच्या खांद्यावर कुणाची by दमामि
हे म्हंजे म्युच्युअल फंडखालील
In reply to आम्ही ज्यांचे by नाखु
अप्रतिम! :-D
कोणते वृत्त म्हणायचे हे ?
वृत्त नव्हे वृत्ती म्हणायची.:
In reply to कोणते वृत्त म्हणायचे हे ? by उगा काहितरीच
मस्त लिहिलंय!
कुणीही किती घेतला जरी ट्रोलरू
सुंदर !!
विडंबन नको असे नाही पण.....
सहमत आहे. विडंबनाला ना नाही,
In reply to विडंबन नको असे नाही पण..... by माम्लेदारचा पन्खा
किमान मुळ कवि दुखावला जवू नये
In reply to सहमत आहे. विडंबनाला ना नाही, by विशाल कुलकर्णी
किमान मुळ कवि दुखावला जवू नयेहे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ? मिपासारख्या मुक्त व्यासपिठावरील मूळ लेखकाने आपल्या लेखाचे चांगले विडंबन झाले तर ते खेळीमेळीने घ्यावे हेच समंजसपणाचे आहे. यामुळे मूळ लेखाला प्रसिद्धीच तर मिळतेच पण मूळ लेखकाचा रक्तदाबही ताब्यात राहतो :) विडंबन वाईट / रुचीहीन झाले तर चोखंदळ मिपावाचकच चपला घेऊन पुढे सरसावतात... मूळ लेखकाला काही तसदी घेण्याची गरज पडत नाही... त्याने फक्त विडंबनकाराची मांडलेली पूजा पाहून मजा घ्यावी. याचाही मूळ लेखकाच्या रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो ;)हे विडंबन/विडंबनकारापेक्षा
In reply to किमान मुळ कवि दुखावला जवू नये by डॉ सुहास म्हात्रे
हे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ?नाही. हे सर्वस्वी विडंबनकारावर अवलंबून असते. मिपावर होणारी विडंबने कुणाला दुखावणारी नसतात हे मान्य आहे. पण बर्याचदा एखाद्याला दुखवायचे म्हणूनच विडंबन केले जाते. (मिपावर हा प्रकार होत नाही ही बाब अलाहिदा) त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि असेल. आणि विडंबन करतानासुद्धा दर्जा पाळणे, टिकवणे गरजेचे असते हे माझे मत आहे. मी केलेले विधान फक्त मिपावरच्या किंवा कुठल्याही संस्थळावरच्या विडंबनासाठी नसून एक सरसकट अपेक्षा आहे. विडंबन जर खेळीमेळीचे असेल तर ते खेळीमेळीने किंवा समंजसपणानेच घेतले जाते किंवा जावे. पण जर ते केवळ एखाद्याची टर उडवायची म्हणून केले गेलेले असेल तर त्या व्यक्तीने ते का समंजसपणे घ्यावे. अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे.आपला आनंद...
In reply to हे विडंबन/विडंबनकारापेक्षा by विशाल कुलकर्णी
१. आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.
२. दुसर्याच्या करणीवर आपला ताबा असतोच असे नाही (बहुदा नसतोच) पण त्या करणीवर कसे व्यक्त व्हावे हे मात्र आपल्या नक्कीच ताब्यात असते. ३. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारला जात असला तर आपली चप्पल झिजवून घेणे शहाणपणाचे नाही. ४. मुक्त संस्थळावर आपले लिखाण टाकून त्यानंतर फार हळवेपण दाखवणे व्यवहारी नाही. मला वाटते माझे वरचे मत यावरून पुरेसे स्पष्ट होत आहे :)आपला आनंद १०% आपल्या करणीवर
In reply to आपला आनंद... by डॉ सुहास म्हात्रे
आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.हे मान्यच आहे हो. मी त्याबद्दल काही आक्षेप घेत नाहीये. मी विडंबनकाराने विडंबन करताना कुठल्या मर्यादेचे भान ठेवायला हवे ते सांगतोय. उद्या कोणीही उठून "काहीही" विडंबन पाडले तर मिपाचे संपादक मंडळ ते मिपावर ठेवील काय ? *काहीही : हा शब्द आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर या अर्थाने घेणे .विनाशुल्क मुक्त संस्थळांवर
In reply to आपला आनंद १०% आपल्या करणीवर by विशाल कुलकर्णी
हे सर्व मुळ लेखकासाठी,
In reply to विनाशुल्क मुक्त संस्थळांवर by डॉ सुहास म्हात्रे
आपण चर्चा करत असलेल्या
In reply to हे सर्व मुळ लेखकासाठी, by विशाल कुलकर्णी
डॉक्टरसाहेब माझा मुद्दा
In reply to आपण चर्चा करत असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
@ विशाल कुलकर्णी
In reply to आपला आनंद १०% आपल्या करणीवर by विशाल कुलकर्णी
आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर
In reply to @ विशाल कुलकर्णी by माहितगार
विकु,
In reply to हे विडंबन/विडंबनकारापेक्षा by विशाल कुलकर्णी
करावं करू नये असं काहीच ठरवता
In reply to विकु, by दमामि
अती झालं की मजा जाते हे मात्र
In reply to करावं करू नये असं काहीच ठरवता by वेल्लाभट
अती झालं की मजा जाते हे मात्र समजावं सगळ्यांना असं वाटतं.हेच मलाही म्हणायचय. विडंबनाला माझी ना नाहीये. जुन्या मिपावर मी केलेली विडंबनेही सापडतील. फक्त त्याचा अतिरेक होवू नये आणि विडंबनाचा वापर एखाद्याला भक्ष्य बनवण्यासाठी होवू नये असे माझे म्हणणे आहे. वैयक्तिक टीका आणि विडंबन या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत हे मी सुद्धा जाणतो. माझे म्हणणे इतकेच आहे की वैयक्तीक टीका करण्यासाठी विडंबनाचा आधार घेतल्या जावु नये.तसेच चांगल्या कलाकृतीचे करु
In reply to विकु, by दमामि
तसेच चांगल्या कलाकृतीचे करु नये , सुमार लेखनाचे करावे हे देखिल पटत नाही.मेी चांगल्या कृतीचे विडंबन करु नये असे म्हणत नाहीये दमामि, तर ते विडंबनदेखील तितक्याच चांगल्या दर्जाचे असावे. असे म्हणतोय.अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे."एखाद्या अतिसुमार लेखन करणार्
In reply to तसेच चांगल्या कलाकृतीचे करु by विशाल कुलकर्णी
ण विडंबने वाढत आहेत म्हणून
In reply to "एखाद्या अतिसुमार लेखन करणार् by दमामि
ण विडंबने वाढत आहेत म्हणून मिपामध्ये राम उरला नाही असे सरसकटीकरण करणे किंवा चांगल्या(?) लेखनाच्या वाईट(?) विडंबनास अक्षम्य मानणे मला अयोग्य वाटते.सहमत !+१ .....मिपामालकांना एक विनंती.
In reply to सहमत आहे. विडंबनाला ना नाही, by विशाल कुलकर्णी
विडंबन हा वेगळा विभाग करावा
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
+२
In reply to +१ by एस
आता लाटकरसाहेबांच्या मूळ
In reply to +२ by एस
विडंबन स्पर्धा..
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
आक्रंदती मिपात आता राम नाही
अगदी!
In reply to आक्रंदती मिपात आता राम नाही by सस्नेह
मस्तं विडंबन !
पोच
छान कविता
ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास
In reply to छान कविता by मित्रहो
धन्यवाद
In reply to ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास by दमामि
विडंबन ही हवीच म्हणजे हवीच.
In reply to धन्यवाद by मित्रहो
विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. चांगली वाइट वाचक ठरविनार१००% सहमत. याचबरोबर मिपा आपले संस्थळ आहे. त्याचा दर्जा टिकून राहावा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे हे ही लक्षात ठेवायला आहे.मिपा आपले संस्थळ
In reply to विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. by विशाल कुलकर्णी
मित्रहो, इकदम पटेश!
In reply to मिपा आपले संस्थळ by मित्रहो
धन्यवाद धन्यवाद धमामि साहेब्
In reply to ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास by दमामि
जेवणाच्या ताटात कडू, गोड,
पन्नाशी निमीत्त श्री.दमामि
कसचं कसचं!
तुम्ही वापरता का? :p
In reply to कसचं कसचं! by दमामि
विडंबनं येवुद्यात हो . पण