बंगालच्या वाघिणी
तिच्याच नेतृत्वाखाली शांती धोष व सुनिती चौधरी यांनी स्वत:ला झोकुन दिले. शांतीचे वडील कोमिल्ला विद्यापिठात तत्त्वद्न्यानाचे शिक्षक होते, आई एक गृहिणी होती. शांतीला आपल्या पित्याकडुनच देशभक्तिचे बाळकडु मिळाले होते. सरोजिनी नायडु यांचे १९२६ साली जेव्हा कोमिल्ला येथे भाषण झाले तेव्हा प्रारंभीचे स्तवन गीत शांतीने म्हटले होते. शाळेत तिची ओळख सुनिती चौधरी हिच्याशी झाली व पुढे दोघीही प्रफुल्लनलिनीबरोबर युगांतर मध्ये सामिल झाल्या जिथे त्यांची भेट प्रख्यात क्रांतिकारक अखिल नंदी याच्याशी झाली. सुनिती चौधरी ही इब्राहिमपूरची, घरची गरीबी. हिच्या प्रमाणेच हीचे दोन भाऊ देखिल क्रांतिकार्यात शिरले होते. मात्र हे पुढे जेव्हा तिला व भावांना सरकारने पकडले तेव्हा उघड झाले, त्याआधी तिला आपले भाउ क्रांतिकार्यात उतरल्याचे व भावांना आपली बहिण क्रांतिकारक असल्याचे माहित नव्हते. क्रांतिकारक संघटनांमध्ये गोपनियतेची शपथ देत असल्याने ते स्वाभाविक होते.
कोमिल्ल्यात युगांतरचे कार्यकर्ते होते शांती, सुनिती, प्रफुल्लनलिनी, बिरेन भट्टाचार्य, अखिल नंदी, ललित बर्मन, क्षितिज रॉय आणि त्यांना मार्गदर्शन करीत होते सुपती रॉय. ५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली. क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता. साधरणत: स्त्री क्रांतिकारक तोपर्यंत थेट हल्ल्यात सहभागी न होता मदत कार्य, प्रचार कार्य व साधारण क्रंतिकारकांच्या सहायिकांचे कार्य करीत होत्या. मात्र स्टिव्हन्सला घरात शिरुन मारायचा तर मुलींना प्रवेश मिळणे त्यातल्या त्यात शक्य होते तेव्हा या कामासाठे मुलींना निवडायचे का आणि त्या हे करु शकतील का असा विचारविनिमय सुरू झाला.
या कामसाठी आपण तयार आहोत आणि ही कामगिरी आपल्यालाच मिळावी अशी मागणी शांती घोष आणि सुनिती चौधरी यांनी केली आणि सगळे चकित झाले. या दोघींचे वय होते फक्त चौदा वर्षे! ईयत्ता आठवीची परिक्षा नुकत्याच दिलेल्या या विद्यार्थिनी. सगळेच स्तिमित झाले. सहा फूट उंचीचा तो आडदांड गोरा समोर उभा राहिला तर या थरथर कापतील, या त्याला काय मारणार अशी शंका व्यक्त होताच त्या वाघिणींनी ठासून सांगितले की त्या ही कामगिरी पार पाडतीलच असा त्यांना ठाम आत्मविश्वास आहे. मग त्या दोघिंनी उलट आपल्या प्रमुखांना सवाल केल की कधी कधी पुरुष क्रांतिकारकांचे हल्लेही यशस्वी ठरले होतेच की, मग आता या दोघींना संधी का मिळु नये? अखेर ज्येष्ठ नेत्यांनी परवानगी दिली.
सर्वांना निरुत्तर करीत त्या अवघ्या १४ वर्षांच्या विरांगनांनी ती जबाबदारी उचलली. गोळ्या झाडण्यासाठी गावाबाहेरील कोटबारीच्या जंगलात सराव झाला. या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या.
आणि प्रत्यक्ष कृतिचा दिवस उजाडला - दिनांक १४ डिसेंबर १९३१. कडक्याची थंडी पडली होती. अखिलदांनी पडदे लावलेल्या घोडागाडीतून त्या दोघींना बंगल्याच्या जवळ पास नेउन सोडले. त्या काळी मुसलमान स्त्रिया पडद्याच्या गाडीतुन जा ये करीत असल्याने कुणी शंका घेतली नाही. फाटकापाशी उतरल्यावर या दोघींनी नोंदपुस्तिकेत आपली नावे मीरा व इला अशी लिहिली व आपण ढाक्यात मुलिंसाठी पोहण्याच्या स्पर्धा अयोजित होत असून त्या संदर्भात परवानगीसाठी साहेबाला भेटाला आल्याचे सांगितले. कुणाला संशय आला नाही. दोघी थेट बंगल्यात गेल्या. स्टिव्हन्स बाहेर वरांड्यात येताच दोघींनी आपण ढाका येथुन आलो असुन पोहण्याच्या स्पर्धांमध्ये कोमिल्लच्या मुलींना भाग घेण्यास परवनगी द्यावी यासाठी आपण अर्ज आणला असल्याचे त्यांनी सांगत अर्ज काढुन दिला. हा अर्ज घेउन स्टिव्हन्सने वाचला व त्याने सांगितले की याबाबत मुलींनी मुख्याध्यापिकेला भेटावे. तो तसा शेरा लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाताच या दोघींनी शाली दूर सारुन आत लोकरी पोलक्याच्या आंत लपविलेली पिस्तुले बाहेर काढुन सज्ज केली व अर्ज घेउन स्टिव्हन्स बाहेर येताच सुनितीने थेट त्याच्यावर अवघ्या ५-६ फूट अंतरावरुन नेम धरीत धडाधड चार गोळ्या झाडल्या. काय होताय हे समजायच्या आंतच स्टिव्हन्सला गोळ्या बसल्या. त्याने सावरुन पळायचाअ प्रयत्न केला पण सुनितीच्या गोळ्यांनी आपले काम चोख बजावले होते. तो जागीच कोसळला व गतप्राण झाला. आवाज व किंकाळ्या ऐकताच आंत धावलेल्या नेपाळ सेन या सहायक अधिकाऱ्यावर शांतीने गोळ्या झाडल्या पण त्या मधे आलेल्या एका शिपायाला लागल्या. शिपायांनी वेढल्यावरही प्रतिकार करणऱ्या या वाघिणिंना शिपायांनी हाती येताच बेदम मारहाण केली. अवघ्या चौदा वर्षाच्या मुलींनी एका क्रूरकर्म्याला कंठस्नान घालुन नवा ईतिहास लिहिला, त्यांचा पराक्रम सर्वतोमुखी झाला. कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला.
अवघ्या नऊ दिवसात त्यांच्यावर अभियोग उभा केला गेला व त्यांना ’दयाळुपणे’ फक्त जन्मठेपेची’ शिक्षा फर्मावण्यात आली. शांती घोषने निकाल ऐकताच न्यायधिशाला सुनावले की ’दावणीला बांधलेल्या जनावराप्रमाणे सडण्यापेक्षा आम्हाला फासावर लटकायला आवडेल’. या दोघींनी आपला झुंझार बाणा तुरुंगातही सोडला नाही. अंधारकोठडीला न जुमानत त्या दोघींनी आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. एकदा तुरुंगपर्यवेक्षिकेशी अनैतिक संबंध असलेला एक तुरुंगद्वारपाल जेव्हा वारंवार स्त्री विभागात चकरा मारु लागला तेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या व आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली.
१९३९ साली आयुष्याची कोवळी वर्षे तुरुंगात करपून गेल्यानंतर अनेक राजबंद्यांबरोबर त्यांचीही सुटका झाली. दरम्यान दोघींच्याही घरची वाताहात झाली होती. मात्र त्यांनी न डगमगता नव्या आयुष्याला सुरुवात केली. सुनिती चौधरी १९४८ मध्ये डॉक्टर झाल्या व त्यांनी वैद्यकिय पेशा स्विकारुन गरीबांची सेवा केली. त्यांनी प्रद्योतकुमार घोष या क्रांतिकरकाशी विवाह केला. शांती घोष यांनी मात्र स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणात सक्रिय भाग घेतला.
अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन.In reply to सुनिती आणि by विसोबा खेचर
In reply to तात्या, by बगाराम
In reply to एन्.सी.सी. by विनायक प्रभू
In reply to चूकीची तुलना by बगाराम
In reply to जीव by विनायक प्रभू
In reply to चुकीचा अर्थ by आजानुकर्ण
In reply to लॉग आउट by विनायक प्रभू
In reply to लॉग आउट by विनायक प्रभू
In reply to जाऊ द्या by बगाराम
In reply to तात्या, by बगाराम
काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?ब्रेनवॉशिंगचे एक वेळ जाऊ द्या, पण...
५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली.यह बात कुछ हज़्म नहीं हुई| अर्थात, डेस्परेट (मराठी?) परिस्थितीत, जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे म्हटल्यावर मनुष्य काहीही करू शकतो, पण म्हणून अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकते काय? प्रस्तुत जिल्हाधिकारी मग्रूर होता, अत्याचारी होता, अमानुष होता आणि म्हणून त्याचा वध करणे गरजेचे / योग्य होते असे जरी (व्यक्तिशः मला जरी पटत नसले तरी) वादाच्या सोयीकरिता मानले, तरी त्याच्या वधाकरिता शस्त्रास्त्रसामग्री आणण्याकरिता पैसे नाहीत म्हणून टपालकचेरी लुटणे हे समर्थनीय होते काय? एकदा "क्रांतीसाठी"म्हटले की काय वाटेल त्याची भलावण होऊ शकते काय? (ही बातमी "टपालकचेरीवर दरोडा" या मथळ्याखाली फिट्ट बसावी. "क्रांतीसाठी" हे लेबल लावल्याने हा दरोडा क्षम्य होतो काय?) मग "शोले"मधला गब्बरसिंग गाववाल्यांना म्हणतो की मी तुमचे संरक्षण करतो आणि त्याच्या बदल्यात जर का मी तुमच्याकडून काही पोती धान्य (जबरदस्तीने) घेतले, तर कोणताही जुलूम करत नाही म्हणून, तर त्याचे लॉजिक नेमके कोठे चुकले? (टपालकचेरीत तरी पैसे येतात ते कोठून? जनतेकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ना?) आणि हे क्रांतिकारक जर देशासाठी, जनतेसाठी हे सर्व करत होते (म्हणजेच जनतेचे प्रतिनिधित्व करत होते आणि जनतेची त्यांना मान्यता होती), तर जनतेकडून वर्गणी गोळा करून शस्त्रास्त्रांसाठी पैसे गोळा करता आले नसते काय? जनतेने ते दिले नसते काय? (स्वखुशीने की कसे तो नंतरचा प्रश्न.) त्यासाठी दरोडा घालण्याची काय गरज होती आणि दरोडा घालणे हे योग्य होते काय?
क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता.आपल्या हत्येची कारस्थाने रचली जाताहेत, आपला जीव धोक्यात आहे याबद्दल खात्रीलायक कुणकुण लागल्यावर सदर सद्गृहस्थ स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणार नाही काय? आणि सदर सद्गृहस्थ हा सरकारी अधिकारी आहे म्हटल्यावर खुद्द सरकार तशी व्यवस्था करणार नाही काय? स्वातंत्र्योत्तर कालात आजसुद्धा महत्त्वाच्या पदांवरील विविध अधिकारी व्यक्तींना, मंत्र्यांना वगैरे ती काय म्हणतात ती झेड सिक्युरिटी वगैरे देत नाहीत काय? आपल्या सुरक्षिततेला असलेल्या धोक्याबद्दल माहिती असूनही सदर महोदयांनी क्रांतीच्या / क्रांतिकारकांच्या सोयीसाठी आपल्या सुरक्षेची किमान खबरदारीसुद्धा घेऊ नये अशी अपेक्षा होती काय? ("शूरवीर" या शब्दावरून तरी तसे वाटले.) तशी अपेक्षा असेल तर या मुलींना कोणत्याही प्रकारची झडती न घेता लपवलेल्या पिस्तुलांसह जिल्हाधिकार्यापर्यंत जाऊ देण्यात आले यातून ती अपेक्षा पूर्णच केली गेली, असे म्हणावे लागेल. (किंवा सुरक्षेच्या खबरदारीमध्ये हलगर्जीपणा झाला असे म्हणावे लागेल - टेक युअर पिक.) एखादी कृती (विशेषतः 'वध' वगैरे) ही क्रांतिकारी कृती कधी होते आणि दहशतवादी/अतिरेकी/गुन्हेगारी कृती कधी होते ही मला कधीही न समजलेली गोष्ट आहे. वरील घटनेची इतर दोन घटनांशी तुलना करू या. १. सदर जिल्हाधिकारी हा मग्रूर असून त्याने सत्याग्रहींवर लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना बेदम मारहाण केली म्हणून युगांतरसारख्या क्रांतिकारी संघटनांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला / ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काही शिखांनी इंदिरा गांधींची हत्या करण्याचा विडा उचलला / फाळणीनंतर गांधीजी मुसलमानांचा अनुनय करतात असे वाटल्याने आणि विशेषतः गांधीजींच्या पाकिस्तानला पाकिस्तानचेच पंचावन्न कोटी देण्याच्या आग्रहावर नाराज होऊन नथुराम गोडसे प्रभृतींनी गांधीजींचा वध करण्याचा विडा उचलला. २. जिल्हाधिकार्याच्या जिवाला धोका आहे याची कुणकुण असूनही या मुलींना कोणतीही झडती न घेता जिल्हाधिकार्यापर्यंत शालीत लपवलेल्या पिस्तुलांसह जाऊ देण्यात आले / आपल्या जिवाला धोका आहे याची पूर्ण माहिती असूनही इंदिरा गांधींनी आपल्या (सशस्त्र) अंगरक्षकांमधून शिखांना वगळण्यास नकार दिला / महात्मा गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल कल्पना नाही, बहुधा तेवढी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे शक्यही नसावे आणि गांधीजींचे आपल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलचे नेमके विचार काय होते याची कल्पना नाही, परंतु नथुराम गोडसे पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचू शकला. ३. पिस्तुलासह जिल्हाधिकार्यापर्यंत पोहोचलेल्या मुलींनी जिल्हाधिकार्यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला / इंदिरा गांधींच्या शिख सशस्त्र अंगरक्षकांनी इंदिरा गांधींचा वध केला / पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचलेल्या नथुरामने गांधीजींचा वध केला. या तीन घटनांमध्ये नेमका फरक काय? कोणाला तरी आपल्यावर, आपल्या "राष्ट्रा"वर अन्याय आणि जुलूम होतोय असे वाटले, त्याने/तिने त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार वाटली तिच्या वधाचा पण केला, जिचा वध करायचा त्या व्यक्तीने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे या व्यक्ती आपापल्या लक्ष्यांपरंत शस्त्रांसह पोहोचू शकल्या आणि त्यांनी आपापल्या लक्ष्यांचा पॉइंट ब्लँक रेंजवर (मराठी?) गोळ्या झाडून वध केला. यातले कोठले कृत्य समर्थनीय आणि कोठले नाही आणि का? यातले "क्रांतिकारक" कोण आणि "दहशतवादी/अतिरेकी/खुनी" कोण आणि कोणत्या निकषांवर? "क्रांतिकारक" म्हणून जेव्हा आपण कोणाचा गौरव करतो, तो पूर्णपणे विचार करून, समजूनउमजून करतो, की केवळ आपल्याला तसे करायला शिकवले गेले आहे म्हणून करतो, हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही.
In reply to ब्रेनवॉशिंगचे जाऊ द्या, पण... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे.मुक्तसुनित ह्यंच्या ह्या विधानाचे विस्तृत विवेचन वरील प्रतिसादात वाचायला मिळाले. एकदा का 'क्रांतीकारक' 'जाज्वल्य भक्ति' 'देशासाठी बलिदान' वगैरे उल्लेख केले की बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहुन जातात. आणि भावनिक झाले की तर्कबुद्धी वापरणे अशक्य होउन बसते, त्यामुळे वरील (कडू) व्यापक सत्ये दुर्लक्षली जाऊन त्यावर फक्त विखारी टीका करण्याचे प्रयत्न होतात. 'किव येते', 'हलकट विचार' इ.इ. शेरेबाजी त्यातुनच होते असे वाटते. गांधीवादी असो वा क्रांतीकारक सगळ्यांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्यच होते, पण म्हणून आंधळेपणाने त्यांच्या कुठल्याही कृतीचे समर्थन वा अभिवादन करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीने त्यातले अनुकरणीय तेवढेच वेचुन काढणे अधिक योग्य. (टग्याजींचा पंखा) कोलबेर
In reply to वा by कोलबेर
In reply to ब्रेनवॉशिंगचे जाऊ द्या, पण... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मूळ मुद्दा by llपुण्याचे पेशवेll
मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी.इंदिरा गांधींच्या शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली, सामान्य जनतेवर गोळीबार नाही केला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, जमलेल्या इतर उपस्थितांवर गोळ्या झाडल्या नाहीत.
आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे.जनतेने माफ केले म्हणजे नेमके कोणी माफ केले? खंडोबाचे देवस्थान त्या काळी ज्यांच्या मालकीचे होते (किंवा ट्रस्टखाली असेल तर ज्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली होते) त्यांच्या किंवा खंडोबाच्या देवस्थानात त्या काळात दर्शनासाठी किंवा श्रद्धेपोटी नित्याने जा-ये करणार्या भक्तांच्या मतांची किंवा भावनांची चाचपणी (सर्व्हे वगैरे) कोणी केली होती काय? आणि माफ केले म्हणजे नेमके काय केले? दुसरा काही पर्याय होता काय? की 'पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट' याचे हे उदाहरण आहे? क्रांतिकारकांचा हेतू स्वतःचे गल्ले भरण्याचा नव्हता हे शतशः मान्य. पण तरीही देवस्थानाची संपत्ती देवस्थानाच्या परवानगीशिवाय वापरणे - ज्या कार्यासाठी वापरायचे ते कितीही उदात्त असले तरी - समर्थनीय होते काय? देवस्थानाच्या मालकांना / विश्वस्तांना ते कार्य रास्त आणि उदात्त वाटून त्यांनी स्वखुशीने ती संपत्ती क्रांतिकारकांना दान दिली असती तर गोष्ट वेगळी. गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन "आपण आपल्या गल्लीसाठी करतो आहोत", "ही आपल्या गल्लीसाठी अभिमानाची गोष्ट आहे", "त्याने आपल्या गल्लीची एकी वाढते" वगैरे कितीही उदात्त हेतूंनी करायचे म्हटले, तरी त्यासाठी वर्गणीची जबरदस्ती करणे किंवा एखाद्याने स्वेच्छेने वर्गणी द्यायचे नाकारले तर "नाही देत काय वर्गणी? गल्लीत ये, मग घेतोच बघून!" असे म्हणणे हे समर्थनीय होते काय? त्याने मूळ कार्याची उदात्तता टिकून राहते काय? हे उदाहरण आणि क्रांतीसाठी देवस्थान लुटणे यात नेमका फरक काय?
पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला.संबंधित ब्रिटिश अधिकार्याबाबत कल्पना नाही, परंतु इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या!) इंदिरा गांधींना त्यांच्या जिवावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना आणि अंगरक्षकांमध्ये शिखांची नेमणूक न करण्याचा सल्ला गुप्तचरांकडून मिळाला होता, परंतु "हे खरे असले तरीही मी माझ्या अंगरक्षकांच्या नेमणुकीत भेदभाव करू शकत नाही" म्हणून त्यांनी तो नाकारला होता. आधी म्हटल्याप्रमाणे ही ऐकीव माहिती आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची मला कल्पना नाही, स्वतंत्र वाचनातून याची मी अद्याप खात्री करून घेतलेली नाही, परंतु यात तथ्य असल्यास त्याला अतिरेकी आत्मविश्वास म्हणावा की तत्त्वनिष्ठा की आणखी काही, याचा निर्णय मी करू शकलेलो नाही. अवांतर:
" हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या"हा फरक लक्षात घ्यावा.लंकेत गरीब नव्हते का? लंकेतल्या झोपड्यांत राहणार्या गरिबांनी सीतेचे हरण केले होते का?
In reply to मूळ मुद्द्याला धरून आणखी मुद्दे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

In reply to ब्रेनवॉशिंगचे जाऊ द्या, पण... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
- शिवाजी महाराजांनी लाल महालावर रात्री घातलेली धाड आणि अफजलने केलेला पार्लमेन्टवरील हल्लाबोल
- मराठ्यांनी फोडलेले दिल्लीचे तख्त आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महाबुद्धाचा केलेला ध्वंस
- भगतसिंगाने झाडलेल्या गोळ्या आणि जनरल डायरने दिलेला गोळीबाराचा आदेश
- सुभाषबाबूंनी इशान्य भारतावर केलेले आक्रमण आणि हिटलरने इंग्रजांवर म्हणून भारताशी पत्करलेले वैर
- बांगला मुक्तिसंघर्ष आणि डायरेक्ट ऍक्शन फॉर पाकिस्तान
- ...
In reply to भलतेच ब्रेनवॉशिंग by एकलव्य
In reply to मराठ्यांनी फोडलेले तख्त? by आजानुकर्ण
In reply to +१ by कोलबेर
In reply to वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात by एकलव्य
ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात.टगोबांची उदाहरणे खोडून काढायला (त्यातील फोलपणा दाखवायला) तुम्ही मुद्दामच ही उदाहरणे दिलीत ह्याची कल्पना आहे, पण तरिही सगळ्याच तुलना वगळायच्या म्हंटलं तर हे चिकित्सा करुनच ठरवावे (भगतसिंगांच्या उदाहरणा सारखी) असे वाटते. चीअर्स - कोलबेर
In reply to मराठ्यांनी फोडलेले तख्त? by आजानुकर्ण
In reply to मराठ्यांनी फोडलेले तख्त? by आजानुकर्ण
दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.अगदी असेच म्हणतो ... मी जो काही अभ्यास केला आहे त्यातुन हीच परिस्थीती स्पष्ट होतो. मराठ्यांना तख्त फोडले खरे पण ते बहादूरी वगैरे नाही तर "गरज" म्हणुन फोडले हे सत्य आहे. आजानुकर्णाशी सहमत ...! ------ छोटा डॉन
In reply to भलतेच ब्रेनवॉशिंग by एकलव्य
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे.स्वतःच्या हातांनी धुवून जितके स्वच्छ करायला जमले तितके केलेय बुवा. आता लाँड्रीत धुतल्यासारखे एकसारखे पांढरेशुभ्र झाले नसेल, एखाददुसरा डाग राहिलाही असेल - चालायचेच. शेवटी स्वावलंबनाचा मार्ग खरा.
सांगा बरे - फरक तो काय?तेच तर विचारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय - समजून घ्यायला आवडेल. मला कळलेला नाही. तुम्हाला कळला असेल तर जरा तुम्हीच समजावून सांगा की!
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही.फरक आहे असे सतत सांगण्यात, ठसवण्यात आले आहे. फक्त नेमका काय फरक आहे ते कोणी स्पष्ट केलेले नाही. आता इतके जण सांगतात म्हणजे कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. पण नेमके काय ते स्वतःला नीट समजल्याशिवाय केवळ सगळे सांगतात, सांगत आले आहेत म्हणून मानायचे काय? म्हणून तर म्हणतोय की फरक नीट समजावून सांगा; समजला तर मानायला काहीच हरकत नाही. पण न समजता केवळ 'बाबा वाक्यं प्रमाणम्' (किंवा 'संघं शरणं गच्छामि') म्हणून विश्वास ठेवणे माझ्यापुरते मला तरी योग्य वाटत नाही.
In reply to सुनिती आणि by विसोबा खेचर
In reply to अवांतर प्रतिक्रिया. by कलंत्री
In reply to अवांतर प्रतिक्रिया. by कलंत्री
In reply to या लहान by बगाराम
In reply to ध्येय जेव्हा स्वातंत्र्य by केदार
In reply to माझ्या by बगाराम
In reply to या लहान by बगाराम
In reply to या लहान by बगाराम
In reply to आपली कीव येते by सर्वसाक्षी
In reply to सर्वसाक्षी by विनायक प्रभू
In reply to सर्वसाक्षी by विनायक प्रभू
In reply to हास्यास्पद का? by आजानुकर्ण
In reply to फरक by विनायक प्रभू
In reply to स्वतंत्र by बगाराम
In reply to स्वतंत्र by बगाराम
In reply to कश्मिर by सर्वसाक्षी
In reply to हिंदुस्था by बगाराम
In reply to हिंदुस्था by बगाराम
In reply to विषयांतर by भास्कर केन्डे
In reply to स्वतंत्र by बगाराम
In reply to आपली कीव येते by सर्वसाक्षी
In reply to गांधीवाद्यांना आवाहन. by कलंत्री
In reply to विषयांतर नको by सर्वसाक्षी
आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.












In reply to आपली कीव येते by सर्वसाक्षी
In reply to आपली कीव येते by सर्वसाक्षी
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.यामुळे माझी उत्सुकता चाळवली. जालावर बरेच शोधले. "पोट्टी श्रीरामुलु" ही एकमेव भारतीय गांधीवादी उपोषणाने हुतात्मा झाली आहे या निष्कर्षाप्रत येणार तो पर्यंत अजून दोघे नि:शस्त्र क्रांतीकारी मिळाले... मात्र ते गांधीवाअदी होते की नाहि कल्पना नाहि. (अनेक परदेशी गांधीवादी मात्र हुतात्मा झालेले आढळतात)
- पोट्टी श्रीरामुलु (एकत्र आंध्र प्रदेशसाठी सत्याग्रह, उपोषण आणि त्यातच मृत्यू. कट्टर गांधीवादी)
- मोहन किशोर नामो दास
- मोहीत मोईत्रा
In reply to हुतात्मे by ऋषिकेश
In reply to हुतात्मे by सर्वसाक्षी
इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया,जरूर. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका साईटवर या तिघांनी उपोषण केले व त्यांचा मृत्यू झाला. हे कोणालाहि कळू नये म्हणून जेलरने त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली होती :( अशी माहिती मिळाली आहे. -(गोंधळलेला) ऋषिकेश
In reply to हुतात्मे by सर्वसाक्षी
पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजीभाईंच्या गोळीबाराला बळी पडलेल्या १०५ (की ८०? मोरारजीभाईंच्या मते ८०.) जणांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून 'हुतात्मा चौक' केले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतात घडली, इंग्रजांविरुद्ध नव्हे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. (तसेही मारले गेलेले नि:शस्त्र होते अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.) आता हे १०५ (किंवा ८०) हे केवळ स्वातंत्र्योत्तर काळात मारले गेले म्हणजे ते हुतात्मे होत नाहीत काय? मग 'हुतात्मा चौक' हे नामकरण चुकीचे आहे काय? हुतात्मा चौकाचे नाव बदलून पुन्हा 'फ्लोरा फाउंटन' असे (किंवा 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे) करण्यासाठी आंदोलन करण्यास शिवसेनेस सांगावे काय?
In reply to फ्लोरा फाउंटन by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to जयचंद टग्या by आजानुकर्ण
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to या लहान by बगाराम
In reply to इथल्या by बगाराम
In reply to वय by एकलव्य
In reply to आपलेही नाव असावे. by कलंत्री
In reply to वय by एकलव्य
In reply to वय by एकलव्य
In reply to वय by एकलव्य
In reply to चुकीची तुलना by आजानुकर्ण
In reply to तुलना by एकलव्य
In reply to तुलना by बगाराम
In reply to महाराजांन by यशोधरा
In reply to होय by बगाराम
In reply to तुलना by बगाराम
In reply to आपली विचारसरणी by सर्वसाक्षी
In reply to वय by एकलव्य
In reply to या दोन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to या दोन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वाईट वाटले by बगाराम
In reply to मुद्दे by मुक्तसुनीत
सुनिती आणि