माज आलाय म्हशीला सालीला.
लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते. शिवी देण्याचा उद्देश मुळी समोरच्या व्यक्तीला "प्रोवोक" करणे हा असतो.
परंतू म्हशीला खरोखरीच माज येणे हा मात्र वैतागवाणा प्रकार होता.
दिडेकशे उंबरठयाचं गाव आमचं. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीला जोड म्हणून शेकडा नव्वद घरांमध्ये गुरं पाळली जायची. गुरं म्हणजे प्रामुख्याने म्हशीच. म्हशीच्या दुधाचा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जायचा. तीन चार म्हशींच्या जोडीला गोठयात एक बैल जोडी आणि एखाद दुसरी गायही असायची. म्हशींच्या दोन जाती असायच्या. एक गावठी आणी दुसरी गुजरी. म्हणजे तशा म्हशींच्या बर्याच जाती असतात, जाफराबादी, मेहसाणा ईत्यादी. परंतू या सार्या बाहेरच्या जाती गुजरी मानल्या जायच्या. गावठी म्हशीला दुध कमी असायचे. म्हणून गावठी म्हशींच्या जोडीला गुजरी म्हशीही पाळल्या जायच्या. गायींच्याही अशाच दोन जाती. एक गावठी आणि दुसरी जर्सी. जर्सी गायी खुपच महाग असल्याने आख्ख्या गावात जेमतेम दोन तीन जर्सी गायी असायच्या. गावठी गायीही तशा कमीच असायच्या. गावठी गाय एका वेळेला जेमतेम अर्धा लिटर दुध देते. म्हशीचं दुध पचायला जड असा एक समज असल्यामुळे लहान मुलांना गायीचं दुध दिलं जायचं. तसेच शेतीला बैलही हवे असायचे. म्हणून गायींना फारसं दुध नसतानाही गायी पाळल्या जायच्या.
म्हशी बहुधा जोडीने पाळल्या जायच्या. म्हणजे दोन, चार अशा. या जोडयांमधील एक म्हैस दुभती असायची जिला तानी म्हैस म्हटले जायचे. दुसरी म्हैस दुध न देणारी किंवा दुध देणं नुकतंच बंद केलेलं असायची जिला पाडशी म्हैस म्हटलं जायचं. दुध देणं बंद करुन एखाद दुसरा महिना निघून गेला की ही पाडशी म्हैस माजावर यायची. तिला रेडा लावला की गाभण राहायची. म्हशींची अशी जोडी पाळायचे कारण असायचे. म्हैस व्याली की जवळपास दहा महिने दुध देते. या दुध देणार्या तान्या म्हशीने पाडशी होऊन दुध देणं बंद करेपर्यंत दुसरी दुध न देणारी पाडशी म्हैस गाभण राहून व्यायल्यानंतर दुध देउ लागायची. या तानी पाडशीच्या चक्रामुळे दर वेळी नविन म्हैस घ्यायची गरज नसायची. त्यामुळे पंधरा वीस हजार वाचायचे. अर्थात या चक्रात कधी कधी खंडही पडायचा. कधी म्हैस चरायला गेली असताना हरवायची, कधी तिवा य गुरांच्या जिवघेण्या रोगाने मरायची तर कधी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने मरायची. अशा वेळी नवी म्हैस घेण्याशिवाय पर्याय नसायचा.
आम्हा लहान मुलांना गुरं चरायला न्यावी लागायची. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दोन तीन तास वेळ असायचा. सकाळी सातला गुरं चरायला नेली की दहा वाजेपर्यंत चरायची. दहाला त्यांना पाण्यावर नेऊन सव्वा-दहा साडे दहा पर्यंत शाळेत जाण्यासाठी घरी. गुरांकडे गेल्यावर गुरे डोंगरावर किंवा माळरानावर लावून देऊन आम्ही खुप धमाल करायचो. विटी दांडू खेळायचो. बाजूच्या काळ नदीत मनसोक्त डुंबायचो. आंबा करवंदांच्या हंगामात तर मज्जाच असायची.
हे असं चालू असताना दहाएक महिने झाल्यानंतर तानी म्हैस दुध देणं बंद करायची. अजून एखादा महिना झाला की माजावर यायची. पाडशी झालेली म्हैस थोडयाच दिवसात माजावर येणार हे आम्हालाही कळायचं. अशा म्हशीचं जननांग सुजू लागायचे. शेपटीच्या खाली जननांगाच्या बाजूला चिकट द्रव जमा होऊ लागायचा. आणि अचानक एक दिवस म्हैस सतत ओरडू लागायची. दर दोन तीन मिनिटांनी हंबरडा फोडायची. जर म्हैस चरायला नेली असेल तर बेफाम उधळायची, वाट सापडेल तिकडे पळायची. ही सारी म्हैस माजावर आल्याची लक्षणं असायची.
ही माजावर आलेललीम्हैस गोठयातच बांधलेली असेल तर ठीक. जर ती चरायला नेली असताना माजावर आली तर मात्र आम्हा मुलांना मोठी डोकेदुखी असायची. बेफाम उधळलेल्या म्हशीला आवरुन घरी आणणं खुप अवघड काम असायचं. हे सारं होत असताना म्हशीचा हंबरडा अखंड चालूच असायचा. जशी काय ती रेडयाला सादच घालत असायची. म्हैस पाळणे हा व्यवसाय असल्यामुळे माजावर आलेल्या म्हशीला चांगला रेडा लावणे आवश्यक असायचे. आजुबाजूच्या दोन चार गावांपैकी एखादया गावामध्ये खास म्हशीला लावण्यासाठी एखादा मस्तवाल रेडा पाळलेला असायचा. रेडयाचा मालक रेडयाला म्हशीवर सोडण्याचे पन्नास रुपये घ्यायचा.
माजावर आलेल्या म्हशीला मग बैलगाडीला बांधून रेडा असलेल्या गावी नेले जायचे. सोबत आम्हा गुराख्यांची वरात असायचीच. म्हशीचं रेडयाला साद घालणंही अखंड चालू असायचं. ही वरात जात असताना आजूबाजुने जाणारेही विचारायचे, "माज आलाय काय?". त्या रेडयाच्या गावात पोहोचेपर्यंत दोघे तीघे जण तरी असं विचारायचे. बैलगाडी रेडयाच्या मालकाच्या गोठयाजवळ थांबायची. म्हशीला जवळच्याच एखाद्या मोठया झाडाच्या बुंध्याला घट्ट बांधले जायचे. रेडयाच्या मालकाला बोलावले जायचे. म्हशीच्या अखंड साद घालण्याने गोठयात बांधलेला रेडाही एव्हाना अस्वस्थ होउन थयथय नाचू लागलेला असायचा. रेडयाचा मालक कसाबसा त्या रेडयाचं दावं सोडायचा. दावं सुटताच रेडा थेट म्हशीकडे धाव घ्यायचा.
रेडा व्यवस्थित लागण्यावर पुढचा वर्षभराचा दुधाचा व्यवसाय अवलंबून असल्याने म्हैसवाले आणि रेडयाचा मालक कुठलाच धोका पत्करायला तयार नसायचे. एव्हाना त्या गावातील रिकामटेकडयांचीही गर्दी जमलेली असायची. म्हशीच्या शेपटीमुळे रेडयाचं काम अडू नये म्हणून गर्दीतील कुणीतरी हौशी म्हशीची शेपटी वर उचलत उचलत असे. कहर म्हणजे रेडयाचा मालक रेडयाचं जननांग हातात पकडून त्याला दिशा दाखवत असे. रेडयाचं काम एकदा झालं की रेडा शांत व्हायचा. पण म्हशीकडची मंडळी एव्हढयावर समाधानी नसायची. शेवटी वर्षभराच्या दुधाच्या व्यवसायाचा प्रश्न असायचा. न जाणो रेडयाच्या एका दमाने काम झालं नाही तर. म्हणून रेडयाला पुन्हा पुन्हा म्हशीजवळ नेलं जायचं. त्या बिचार्याची पुढे काही करायची ईच्छा नसायची म्हणून मग आजुबाजूचे बघे "हुर्र हुर्र" असा विचित्र आवाज काढायचे. कसं कोण जाणे पण त्या आवाजाने रेडयाला पुन्हा चेव यायचा. आणि पुन्हा सारं व्हायचं. हे असं तीन वेळा झालं की "झक्कास झालं" असं म्हणून रेडयाच्या मालकाला पैसे दिले जायचे. म्हशीचा हंबरडा बंद झालेला असायचा. रेडाही म्हशीपासून दुर गेलेला असायचा. म्हशीला पुन्हा एकदा बैलगाडीला बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागायचो.
*********************************************************************************
यथावकाश माझं शिक्षण पुर्ण झालं. शिक्षणाने जगण्याचा कॉन्टेक्स्ट पुर्णपणे बदलून गेला. बालपणीच्या सार्या आठवणी कुणा परक्याच्या बालपणीच्या आठवणींचं पुस्तक मिटून ठेवावं अशा मनाच्या कप्प्यात बंद झाल्या. परवा बाईकवरुन सिंहगड प्रदक्षिणा करताना पाबे घाटात वल्लीने गाय आणि बैलाचं बागडणं दाखवलं आणि मी त्याला वर्षातून किमान दोन वेळा होणार्या म्हशीला रेडा लावण्याच्या सोहळ्याचे वर्णन केले. योगायोगाची गोष्ट अशी की पाबे घाट उतरुन राजगड आणि तोरणा मागे टाकल्यावर एका गावी हे रेडा लावणे पाहायला मिळालं. इथेही फार वेगळं नव्हतं. वल्ली यावर लिहि अस म्हणाला. अशा वेगळ्या विषयावर लिहिणं थोडं अवघड होतं. पण विचार केला, जे आपण वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी पाहिलं ते मिपाचे वाचकही समजून घेतील. लेखात कुठे खटकण्याजोगं जाणवलं तर ती माझ्या लेखनाची मर्यादा समजून सांभाळून घ्यावं.
वाचने
97496
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रष्ण
कोकणात नाही म्हणत.
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
धनाजीराव
In reply to कोकणात नाही म्हणत. by धन्या
आमच्या रायगड जिल्ह्यात याला
In reply to धनाजीराव by अनिरुद्ध प
भरवश्याच्या म्हशीला ...
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात याला by धन्या
याला झोम्बी लावणे असे म्हणतात
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
बैलांची मारामारी
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
बरोबर.
In reply to बैलांची मारामारी by पैसा
सामन्य शेतकरी जर म्हशीला
प्रजनन सोडलं तर रेडयाचा
In reply to सामन्य शेतकरी जर म्हशीला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
रेडा अगदिच निरुपयोगि नसतो!
In reply to प्रजनन सोडलं तर रेडयाचा by धन्या
आम्ही पण
In reply to रेडा अगदिच निरुपयोगि नसतो! by वसईचे किल्लेदार
रेडकू कसायाकडे दिले जाते हे
In reply to सामन्य शेतकरी जर म्हशीला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कातड्याची पिशवी अजुन वापरतात.
In reply to रेडकू कसायाकडे दिले जाते हे by खटपट्या
वाईट :(
In reply to रेडकू कसायाकडे दिले जाते हे by खटपट्या
गाईचं दूध पी. मग उगा अपराधी
In reply to वाईट :( by बॅटमॅन
गाई काय चितळ्याकडुन दूध आणून
In reply to गाईचं दूध पी. मग उगा अपराधी by प्रचेतस
येक्झ्यॅक्टली
In reply to गाई काय चितळ्याकडुन दूध आणून by अभ्या..
वईच तो बता रिया मै
In reply to येक्झ्यॅक्टली by प्रसाद गोडबोले
खालील लेख वाचा. आता अमेरिकेत
In reply to गाईचं दूध पी. मग उगा अपराधी by प्रचेतस
उगा कायबी काहान्या ऐकू नगा...
In reply to वाईट :( by बॅटमॅन
शेळीचे दुध पिणे बघा जमतय का?
In reply to वाईट :( by बॅटमॅन
काय हे शेखर....
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
असं कसं ? असं कंसं ?
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
एक माणुस दूध पिता पिता मेला.
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
अतिशय रोचक लेखन! हे प्रत्यक्ष
हा प्रकार माहिती होता, टोणगा
हा प्रकार माहिती होता, टोणगा
In reply to हा प्रकार माहिती होता, टोणगा by मदनबाण
वाकप्रचाराचा अर्थ
रेड्याबरोबरच्या एका
In reply to वाकप्रचाराचा अर्थ by परिंदा
//भरवशाच्या म्हशीला टोणगा या
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
किंवा आपण म्हणता तसाही अर्थ
In reply to //भरवशाच्या म्हशीला टोणगा या by जयंत कुलकर्णी
भरवशाच्या म्हशीला टोणगा ही
In reply to किंवा आपण म्हणता तसाही अर्थ by जयंत कुलकर्णी
जयंतरावांचं बरोबर आहे.
In reply to भरवशाच्या म्हशीला टोणगा ही by धन्या
माझ मत थोडं वेगळं आहे
In reply to जयंतरावांचं बरोबर आहे. by प्यारे१
जयंतरावांचं बरोबर आहे.
In reply to जयंतरावांचं बरोबर आहे. by प्यारे१
बैल बडवणे पाहायला मला आजही
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
बैलाचा जन्म नकोरे बाबा
In reply to बैल बडवणे पाहायला मला आजही by arunjoshi123
>>> या प्रकाराला "बैल बडवणे"
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस
In reply to >>> या प्रकाराला "बैल बडवणे" by श्रीगुरुजी
आणि तो नाद
In reply to स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस by धन्या
वा काका...
In reply to आणि तो नाद by चौकटराजा
त्याला कारण आहे.
In reply to स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस by धन्या
अजून एक
In reply to त्याला कारण आहे. by अर्धवटराव
माणूस असा वागतो की त्यापुढे
In reply to त्याला कारण आहे. by अर्धवटराव
बैल इतर प्राण्यांप्रमाणेच
In reply to >>> या प्रकाराला "बैल बडवणे" by श्रीगुरुजी
निसर्गनियमाप्रमाणे बैल
In reply to बैल इतर प्राण्यांप्रमाणेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यासाठी बैलाच्या मागे
In reply to निसर्गनियमाप्रमाणे बैल by बॅटमॅन
अहो विदा आणि निरीक्षणे
In reply to त्यासाठी बैलाच्या मागे by प्यारे१
मूलभूत प्रेरणा - गुणसूत्रांचा प्रसार
In reply to निसर्गनियमाप्रमाणे बैल by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to मूलभूत प्रेरणा - गुणसूत्रांचा प्रसार by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स'
In reply to धन्यवाद by बॅटमॅन
हा हा हा....तत्त्वतः जे असेल
In reply to ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' by प्यारे१
ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स'
In reply to ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' by प्यारे१
आपला असा समज का झाला हे
In reply to धन्यवाद by बॅटमॅन
+ १
In reply to बैल इतर प्राण्यांप्रमाणेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
****
अनुभव'पूर्ण' लेख.
टिपिकल गावातला अनुभव!
अस्सल..
हुर्र हुर्र हुर्रे
उधळणे ते हेच का?
In reply to हुर्र हुर्र हुर्रे by प्रचेतस
(No subject)
In reply to उधळणे ते हेच का? by प्यारे१
वेगळाच लेख
असो खुपच जुन्या आठवणी जागा झाल्या.
+१
In reply to असो खुपच जुन्या आठवणी जागा झाल्या. by वेताळ
मस्त माहितीपुर्ण लेख...
निगडीत स्मृती
__/\__!!
दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात
कळलावी नावाची एक वनस्पती आहे
वा!
नवीन माहिती!
नवीन
मस्त जमला आहे लेख.
माझ्या माहितीतील एक
ओ तै, लेखातल्या शब्दाचा अनं
In reply to माझ्या माहितीतील एक by मनीषा
माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ
In reply to ओ तै, लेखातल्या शब्दाचा अनं by किसन शिंदे
माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ
In reply to माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ by धन्या
खी खी खी =)) =)) =))
In reply to माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ by प्रसाद गोडबोले
मस्त
छान लेख आहे
चांगला लेखं
एक म्हटले तर भाबडी शंका.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन
धन्यवाद. उत्तरांच्या
In reply to तुमच्या प्रश्नांची उत्तरे by धन्या
वृषण फोडणे अमानूष आहे यात
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन
+१
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by डॉ सुहास म्हात्रे
ऑपरेशन होऊ शकत नाही का?
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by डॉ सुहास म्हात्रे
अशा काही गोष्टी न केल्या तरी
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन