होती एक नजर.......
लेखनविषय:
होती एक नजर.......
मला पाहणारी
लाख झिडकारले तरी
अंगचटीस येणारी.....
होती एक नजर.......
मला शोधणारी
कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप
तर कधी खिडकीवर रेंगाळणारी
होती एक नजर.......
मला आसुसलेली
प्रत्येक नकाराने माझ्या
सुडाने ठसठसलेली...........
होती एक नजर.......
मला दाहणारी
पेटवून देहास माझ्या
खुनशी खदखदणारी..........
होती हर एक नजर....
माझ्यावरच खिळलेली
जेव्हा फोडला मी टाहो
तेव्हा हलकेच चुकचुकलेली.....
होती एक नजर.......
धुराने धुसरलेली
दिसत होते त्यात बाबा
अन आई लाघवी हसणारी.....
उरली एक नजर.........
जगण्यास धडपडणारी
प्रत्येक विझत्या निखर्यासवे
एक बाहुली कायमची.......निजलेली
वाचने
3262
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
४५ वाचन होउन ही एकही comment नाही.
कविता आवडली नसल्यास तस तरी कळवा.
निदान पुढिल लिखाणात सुधारणेस वाव राहील.
एक एकटा एकटाच आत्तापर्यंत तुमचं सगळं लिखाण मला आवडलाय . हि कविता सुधा छान आहे . फक्त शेवटच्या २ कडव्यात जरा गडबड वाटतेय
कविता अतिशय आवडली. आशय खूपच परिणामकारक.
सगळ्यांचे आभार
शशकच्या गर्दीत हरवून गेली होती. आत्ता वाचली. एका मुलीचा विकृतपणे पाठलाग करणार्या प्रेमिकाचे वर्णन आहे. बरोबर नं. मला वाटते शेवटी खून केला त्या विकृत माणसाने.
प्रभावी आहे वर्णन.
In reply to शशकच्या गर्दीत हरवून गेली by जडभरत
बरोबर ओळखलत भरत
मागे एकदा रिंकु पाटील (1990) उल्हासनगर केस बद्दल वाचनात आलं होत. तिला तिच्या माथेफिरू प्रियकराने तिच्या वर्गात सगळ्या विद्यार्थ्यां समोर जाळलं होत.
अंगावर चुकुन सांडलेला गरम चहा आपल्याला सोसवत नाही. ही तर अवघी 15-16 वर्षाची पोर. तिची त्या वेळची अवस्था काय झाली असेल हां नुसता विचार करून ही अगदी कससंच झालं.
दिवसभर नुसता तोच विचार डोक्यात घोळत होता.
त्याच तिरमिरीत ही लिहून काढली.
पण नंतर जाणवलं की नुसत्या कागदावर आपल्या भावना उतरवून काही होणार नाही. फार फार तर आपला अस्वस्थपणा थोडा कमी होईल. पण हा ह्या समस्येवर उपाय नाही. आपण ही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. भर दिवसा इतक्या लोकांसमोर ते अवघे दोन लांडगे जेव्हा त्या चिमुरडीचा घास घेत होते. तेव्हा बाहेरच्या जमावामध्ये आणि त्या हरामखोरांमध्ये फ़क्त एक लाकडाचा आतून फ़क्त एक कडी लावलेला दरवाजा होता. तो दरवाजा तोडायचा नुसता प्रयत्न जरी झाला असता तरी रिंकु आज आपल्यात असती.
असो,
ह्या सगळ्या जर
त्या बघ्यांना दोष देऊन काही होणार नाही. कारण आपणही ह्या समाजाचा एक भाग आहोत.
मध्यंतरी T.V वर " Raise Your Voice" नावाची Campaign आली होती.
So be proud to part of that Campaign.
गर्दीच्या ठिकाणी आजही pinching, bottom slapping असे विकृत प्रकार सर्रास होत असतात. बरेचसे हरेश दररोज कुठल्या ना कुठल्या रिंकुचा घास घ्यायला टपले आहेत. अश्या हजारो रिंकु आपल्याभवती आपल्या मदतीच्या अपेक्षेत असतात. तेव्हा नुसत बघत बासु नका तो लाकडी दरवाजा तोडून टाका. एकदा जरी का तो दरवाजा आपल्याकडून तुटला की बास......
कारण नंतर जे घडेल त्याच्या नुसत्या आठवणींनेही कुठला हरेश कुठल्या रिंकुच्या आसपासदेखिल फ़िरकणार नाही.
In reply to थोडसं ह्या कविते विषयी.............. by एक एकटा एकटाच
त्या गुन्हेगारांचं पुढं काय झालं? त्यांना शिक्षा मिळाली? कुणाला माहिती आहे?
In reply to त्या गुन्हेगारांचं पुढं काय by जडभरत
त्या हरेश पटेल ने दुसऱ्या दिवशी रेल्वे खाली आत्महत्या केली होती.
आणि त्यांच्या साथीदाराला जन्मठेप झालेली बहुतेक.
In reply to त्या हरेश पटेल ने दुसऱ्या by एक एकटा एकटाच
मग तर बरं झालं!!!
कविता प्रभावी आणि प्रतिसादात व्यक्त झालेल्या भावनेशी सहमत.
अजून पोर्न ची बाजू घ्या . म्हणजे असे विकृत लोक तयार होणार नैत .
In reply to अजून पोर्न ची बाजू घ्या . by तुडतुडी
तुडतुडी
तुमचं मत अंशत: बरोबर आहे, पण पूर्णत: नाही.
कारण ह्या प्रकाराला फ़क्त पोर्न जबाबदार नाही. समाजाची नीतिमत्ता ही कारणीभुत आहे.
स्त्रियांना फ़क्त भोगवस्तु म्हणुन पाहायचा दृष्टिकोण बदलायला हवा.
तशी शिकवण रुजायला हवी.
एव्हढं जरी झालं तरी बराच फरक पडेल.
कविता अस्वस्थ करणारी आहे त्यामुळे कदाचित प्रतिसाद येत नाहीत. तुमच्या लेखनाचा दर्जा प्रतिसादांच्या संख्येच्या कसोटीवर घासून पाहू नका.
In reply to कविता अस्वस्थ करणारी आहे by एस
+111
कविता आवडली,
एका स्त्रीच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे अनुभव ह्या दृष्टीने ही कविता वाचली. तुम्ही म्हणता ती घटना माहित नव्हती त्यामुळे त्या दृष्टीने रिलेट करू शकलो नाही. समाजात वावरताना, पावलोपावली वेगवेगळ्या नजरांशी, एक स्त्री म्हणून जी झटापट करावी लागते, त्याचा (स्त्री नसलो तरी) चांगलाच अनुभव आहे. तुमची कविता ह्या वेगळ्या संदर्भाने देखील आवडली. प्रतिसाद हे कलाकाराला हवेच असतात कारण त्याने प्रोत्साहन लाभते त्याचवेळी एखादा जाणकार, उपयुक्त सूचना देखील देतो, पण हे लगेच झाले नाही तरी नाउमेद होऊ नका. चांगल्या कलाकृतीला चांगला प्रतिसाद नेहेमीच लाभतो.
In reply to एक रूपक म्हणून कविता आवडली. by सौन्दर्य
प्रतिसाद हे कलाकाराला हवेच असतात कारण त्याने प्रोत्साहन लाभते त्याचवेळी एखादा जाणकार, उपयुक्त सूचना देखील देतो, पण हे लगेच झाले नाही तरी नाउमेद होऊ नका. चांगल्या कलाकृतीला चांगला प्रतिसाद नेहेमीच लाभतो.ह्याच्याशी अगदी सहमत पण, मी प्रतिसाद मिळाले नाहीत म्हणुन मुळीच नाउमेद झालेलो नाही. मला आता मिपा परिवारात येउन पाच महीने झालेत. चांगल्या कलाकृतीला जशी मिपा मनापासून दाद देते, तसेच चुकल्यावर हातंच काहीही न राखता चांगली कान उघडणीही करते. हे मला माहितीय. पण माझ्या ह्या कवितेला सुरुवातीला बऱ्याच वाचनानंतरही एक ही प्रतिसाद नाही हे पहाता. माझी कविता कान उघडणीच्या लायकीचीही नाही आहे की काय अशी भितियुक्त शंका मनाला चाटून गेली. एव्हढंच..... बाकी काही नाही चूक भूल दयावी घ्यावी तरी आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी मनपुर्वक आभार
प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी सगळ्यांचे मनपुर्वक आभार!!!!!!
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص
आईइंग..........