सो ने
सोशल नेटवर्किंग साइट्स ! यातही प्रामुख्याने फेबु न कसंकाय !!!
खरोखर उबग आलाय !
मी किती ग्रेट , माझीच एकट्याची अक्कल महान म्हणणारे लोक.. श्रावण असूनही आम्ही किती खाण्यापिण्याची मज्जा करतो असं सांगत श्रावण पाळणार्यांच्या भावनांची नकळत टिंगल करणारे बिन्डोक्...( श्रावण हे उदाहरण फक्त !)स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर लिहिणारांना उमाळे वगेरे म्हणणारे आणि दुसरीकडे फाशीच्या विडिओला लाईक केले नाही तर देशद्रोही ठरवून मोकळे होणारे निष्क्रीय वाचाळ, दिवसभर शिंकण्या-ढेकरण्या-जांभया-पादण्या न कशाकशाचे स्टेट्स देणारे लोक, बायका म्हणजे कित्ती मूर्ख न कजाग आणि पुरूष किती शहाणे न सहनशील असल्या बिनडोक आशयाचे विनोद करून दात दाखवणारे लोक, अमक्या भाजीचा रस, तमक्या फळाची साल टैपचे अविवेकी वैद्यकीय सल्ले पुढे ढकलणारे नाटकी काळजीवाहू, कोणत्याही प्रकारचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न सोशल फोरम्स वर मांडून स्वतःचं हसं करून घेणारे लोक, आंतरजालीय ओळखीचा सामाजिक्,आर्थिक्,भावनिक आणि शारीरिकही फायदा करून घेण्यासाठी नेम धरून बसलेले लोक, व्यक्तिस्वतंत्र्याच्या नावाखाली इतरांच्या श्रद्धास्थानांची, विश्वासांची क्रूर टिंगल करणारे लोक, धार्मिकतेच्या नावाखाली मजा मारत त्याला सांस्कृतिक बुद्धिवादी मुलामा देत माज दाखवणारे स्यूडो लोक,नास्तिकतेचे कर्मकांड आस्तिक लोकांपेक्षाही भडक पणे न सवंगपणे दाखवत राहणारे उथळबुद्धी, पोर्न,बालात्कार वा देशद्रोह्याला फाशीसारख्या अती संवेदनशील विषयावर दोन टोकाची विधाने करत दिवे पाजळणारे लोक, ज्यांचा चेहरा आठवायला अजिबात आवडणार नाही असे पहाटे ५ वाजेपासून गुडमॉर्निंग मेसेज पाठवत दिवसाची काशी घालणारे लोक, लांबच्या लांब लेखन स्वतः अजिबात न वाचता (यात कविता ही आल्या ) नुसतं तुमच्याकडे ढकलून त्यावर मत काय विचारणारे लोक, स्टिरियोटैप्स ना भरपूर तेल घालणारे लोक, सतत कोणीतरी मेलंय्,अपघात झालाय, आजारी पडलंय आणि जीव जाणारंय असं आणि असंच लिहिणारे लोक, बाकी लोकांचा जन्मात कधी संबंध येणार नाही अशा दूरदूरच्या नातेवाईकांचे न मित्रमैत्रिणिंचे सत्कारसोहळे आपल्या ग्रुपवर फुकट करवून घेणारे लोक, या न त्या कारणाने सतत नकारात्मकच वातावरण तयार करत राहणे हे जन्मजात कर्तव्य बजावणारे लोक, स्मायलींशिवाय नुसत्या शब्दात भावना अजिबात न कळणारे संवेदनापंगुत्व आलेले लोक, स्वतः कोणत्याही बाबतीत कोणतेही मत न देणारे वा चकार शब्द न काढला लपुन कसंकाय वरचे इतरांचे शो बघणारे लोक, सतत खोटी सहानुभूती-प्रेम्-काळजी अत्यंत भडकपणे दाखवत राहणारे पण मनातून त्या दु:खद गोष्टींची चवीचवीने मजा घेणारे लोक, मी किती जग पाहिलंय न किती सोसलंय न किती समाजसेवा केलीय, न किती त्याग केलाय हे सतत बोलत सेल्फ पिटी चं अॅडिक्शन झालेले लोक, आपली राजकीय मते स्पष्ट नसताना समोर आला त्याच्या समोर पचापच थुंकणारे लोक,सिनेमापासून गल्लीतल्या नाटकापर्यंत कशाचीही समीक्षा करत आत्मतुष्टीच्या ग्लानीत राहणारे लोक, स्वतःला कोणत्याच विषयात कोणतेच मत मांडता येत नाही म्हणून चतुरपणे शब्दांच्या ऐवजी स्मायल्या टाकत नरो वा कुंजरो वा हा एकच एक मंत्र जपणारे लोक...
माझ्या खात्याशी जोडलेल्या १०-१२ ग्रुप्स आणि सुमारे ७५० लोकांच्या गदारोळात खरंच वैतागलेय.
या गर्दीत चांगले, बुद्धीचे पोषण करणारे वाचन कमी झाले. लेखन करण्यासाठीची शक्ती या लोकांना अटेंड करताना संपून गेलेली असते त्यामुळे नीट लेखन होत नाही. तोंड बंद असले तरी मनात असंख्य अनावश्यक असणार्या विषयांची-चित्रांची नि आवाजांची रहदारी फक्त प्रदूषणच पसरवते.या माध्यमांची अती सवय झाल्याने बंदही करवत नाही. दिवसभरात सगळ्या ग्रुप वरच्या मिळून किमान २००० पोस्ट्स वाचताना हातात कन्स्ट्रक्टिव काही सापडेल याची अजिबात खात्री नाही.
इथला सगळाच कारभार पोकळ, काल्पनिक आणि हे कळूनही ओढवून घेतलेला... !!!
आज सकाळी आधी अशा बर्याच ग्रुप्स मधून बाहेर पडले. ज्या ग्रुप वर आहे त्या ३-४ ग्रुप्स वर माझं योगदान किती असेल याची स्ट्रॅटेजी आखली. किती वेळ 'कनेक्टेड' रहायचंय हे ठरवून उपयोग नाही. म्हणून किती वेळ याशिवाय इतर गोष्टी दिवसभरात अनिवार्य म्हणून करायच्यात ते ठरवले.(प्रत्यक्ष भेटणे, प्रत्यक्ष बोलणे, वाचन्,व्यायाम इ)
अजून खूप गोष्टी शिकाव्या लागणारेत.एकीकडे 'वेळ नाही' च्या आरोळ्या ठोकत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारण्यात कै मज्जा नाही असं वाटतंय ! हा वैताग न फुकटचे मनस्ताप वेळीच आवरता आले नाही तर यापासून दूर पळणे !
वर्गीकरण
वाचने
13773
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
बरं झालं... मी फेसबुक वापरत
नेमक्या याच सगळ्या गोष्टींचा
भापो
२००० पोस्टी वाचण्याइतपत खरंच वेळ आहे? :)
फेसबूक परवडलं असा वात
In reply to फेसबूक परवडलं असा वात by अजया
+१
In reply to +१ by गॅरी ट्रुमन
सहमत!!! ग्रुप्स म्युट केले की
या पोस्ट्ला माझे शंभर लाईक्स!
मी तर गेले कित्येक दिवस फे बु
प्रचंड सहमत! याशिवाय एकच
अगं, चिखलराडीत शिरलं की
मानवी स्वभाव हा निसर्गतः
In reply to मानवी स्वभाव हा निसर्गतः by एस
+१
प्रचंड सहमत
अरे त्रास होत असेल तर खाते
इंटरनेट
सध्याच्या युगात FB, WhatsApp
माझ्या मते तरी गृपचे स्वरुप
१ नंबर लेख .मी माझ्या चे पु
In reply to १ नंबर लेख .मी माझ्या चे पु by तुडतुडी
लोकांकडे उपलब्ध असलेला वेळ
वैताग आनलाय राव कस्काय न.
ह्या सो ने च्या कृपेने
बहुसंख्य सो ने वापरणार्यांचे
In reply to बहुसंख्य सो ने वापरणार्यांचे by संदीप डांगे
+१
सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर मी
बराय ब्वा.
पर्फेक्ट लिहिलयेस मितान.
सुरी दूधारी...
In reply to सुरी दूधारी... by स्वप्नांची राणी
+ १
मितान तुम्ही नेट अॅडिक्ट आहात
मंडळी,
गेले तीन वर्षे चेपूवरील
मला व्हॉट्स अॅपचा म्हणा
वर दिलेल्या उपायांशी सहमत.
माझ्या स्वभावात चेपु, व्हॉटस
In reply to माझ्या स्वभावात चेपु, व्हॉटस by रेवती
दहा एक दिवसांपूर्वी एका गावात
गुगल प्लस बंद होणार असे मधे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروحIn reply to गुगल प्लस बंद होणार असे मधे by मदनबाण
नक्की का
- Google Loosens Ties to Google Plus
- Google kills mandatory Google Plus identity policy, rolls back YouTube changes
आशा वाटते की तुम्ही म्हणताय तसे घडणार नाही.धन्यवाद.......
वापराल तसं