(स्पर्धेसाठी नाही) क्लोज
लेखनप्रकार
भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय?
होय सर.
तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद.
होय सर.
चला सुटा.
+++++++++++++++++++++
उचल उचल भाड्याला.
भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा.
आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला.
+++++++++++++++++++++
भाडखाऊ कुठं पळतो बे?
न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की.
कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट.
व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला.
तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज?
साह्येब तिर्री सत्ती.
उभा राहा भेनचोद आता. क्लोज बी गेला. उद्या ओपनला बसली फिगर तर सुटतोस बघ.
+++++++++++++++++++++
वाचने
8149
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
=))
शेवटचा ट्विस्ट मस्तंय. बाकी हे ओपन/क्लोज ही परिभाषा डोक्यावरून गेली.
=))
भारी! लिहिता झालास ते एक नंबर झालं...
हाहाहा..लै भारी
जरा विस्कटून सांग की ते ओपन क्लोज
:)
जबरी.
सुशिंनी बर्याच कादंबर्यांत मटक्याचे विश्व ओपन केलंय त्याची आठवण आली.
WhatsApp वर विनोद म्हणुन आला होता! बाकी मटका खेळताना सकाळी ३ आकडे आणी संध्याकाळी ३ आकडे जाहीर करतात. सकाळच्या आकड्यांना ओपन आणी संध्याकाळच्या आकड्यांना क्लोज म्हणतात. जो कोणी सर्व ६ आकडे आधीच भाकीत करेल त्याला १ रुपयास १.५ लाख मिळतात. या योगाला 'संगम' असे म्हणतात. [लहानपणी मटका खेळणार्या शेजार्यांबरोबर वाढलेला]
In reply to पहिला भाग [गाडीत बसेपर्यंत] by gogglya
क्लोज माहीती ओपन केल्याबद्द्ल धन्यवाद !!!
फक्त मटका (पाण्या पुरताच) वापरणारा नाखु
रतन खत्री
;)
सुट्टा, पत्ती आणी डीपी ला किती पैसे मिळतात
;) मस्त!!!
अभ्या,
पाना विसरलास का रे ..
(धाड कुठे विजापूर वेशीत पडली होती का...नाही व्हॅन जेलरोडपत्तर नेलीस म्हणून इचारलं )
In reply to पाना.. by नि३सोलपुरकर
अरे नितीन. इप्पुडू येम चेसुनाउ?
पाना बिना सांगत बसलो तर रोजच आकडा मागतील मला. एकीव माहीतीवर सगळं दुकान आपलं.
रेड बहुतेक वेशीतच. दोन्ही पाच्छा पेठा काय कमीत काय? ;)
काय नविन विश्व ओपन केलंय!
ओपन ला आकडा लावला आहे ,८ वाजायची वाट बघतो आहे ...
अवांतर : येन इल्ला अण्णा,बोरिंग रुटीन ..... पाट्या टाकणे चालू आहे, बाकी ह्या मटक्या पायी बरबाद झालेली काही लोक पाहिलेले आहेत .
मस्त..
भारीच की....
छान कथा.
आमचे मटक्या-गुटक्याशी न जमता पक्त घुटक्याशीच जमते.
आगागा! :-D काय अकडा लावलाय पण!
काय आकडा लावलाय्स बे!
मस्त! =)) मी म्हापसा ब्रँचला नवीन ट्रान्सफर होऊन आले तेव्हा तिथली काही पोरं रोज सकाळी उठून आकडा सांग म्हणून जीव खायची. हा प्रकार २/३ दिवस झाल्यावर मी कशाला म्हटले. तेव्हा आपल्याला तू सांगितलेले आकडे लागले म्हणाले. ते आकडे मटक्याचे म्हणून एकदा कळल्यावर मी पुन्हा कशाला आकडे सांगतेय! तिथे आकडे घेणारी एक मुलगी होती. बँकेच्या बाहेरच बसायची. जाम टेरर होती.
In reply to हाहाहा! by पैसा
मग तुम्ही स्वतःच जर आकडे लावले असते तर मे बी तुमचा आयडी "डॉलर" किंवा "दिनार" असता आज. ;)
In reply to आय्ला by इरसाल
खिखिखि!
In reply to आय्ला by इरसाल
>>> मग तुम्ही स्वतःच जर आकडे लावले असते तर मे बी तुमचा आयडी "डॉलर" किंवा "दिनार" असता आज. ;)
माझ्या मते 'रुपया' कारण डॉलर अथवा दिनार हे परकीय चलन आहे आणि जर आकडे लावून घरबसल्याच जर रुपये मिळाले तर कोण उठाठेव करुन परदेशी जाऊन डॉलर अथवा दिनार कमवेल?
आता मिळालेला पैसा स्विस बँकेत वगैरे ठेवण्याची गरज भासली तर डॉलर म्हणता येईल म्हणा...
सातार्यातला एक मटकेवाला नेहमी मळकट नेहरु कुर्ता आणि पायजमा पायात स्लीपर अशा वेशात असायचा. एकदा त्याच्या घरी धाड पडली तेव्हा पोत्यात, बेडखाली, कपाटात नको नको तिथं कशाही पडलेल्या नोटा च्या पुडक्या होत्या. अक्षरशः वाळवी लागलेल्या स्वरुपात नोटा होत्या.
मागच्या वेळेस जागा मिळाली नाही म्हणून आता पटकन जावून बसला हा विनोद कितीतरी वेळा वाचलाय . शेवटचा ट्विस्ट छान
In reply to मागच्या वेळेस जागा मिळाली by तुडतुडी
धन्यवाद तुडतुडीतै.
मला तर आता लिहायची भीतीच बसलीय. इकडून तिकडून कायतरी जमवून लिहायचे ठरवले तर सगळंच तुम्हाला म्हैत असते बाबा ;)
In reply to धन्यवाद तुडतुडीतै. by अभ्या..
काय अभ्या तुमच्या सोलापुरातले लोक पण... सगळ्यांना माहित असलेल्या जोक प्रमाणे वागतात.
मला तर वाटत भोसले आणि पिवळ्या शर्ट वाल्याने जोक वाचून ठरवून धाड घातली असेल.
ते भेटले ना की त्यांना माझा निरोप सांग की अशा सगळ्यांना माहित असलेल्या, पेप्रातून आलेल्या गोष्टी नाय करु.. ट्राय समथिंग न्यू..


मलाच काय हो. कितीतरी लोकांना माहित असेल . जुना विनोद आहे . पेपर मध्ये पण किती वेळा आलाय .
In reply to मलाच काय हो. कितीतरी लोकांना by तुडतुडी
मामोऑ-
अगं तुडतुडे! किती तडतडतेस. आमचे हे पण असेच तडतडायचे.
जाऊ दे बाई नको ती आठवण.-मामोऑ
=))