[शतशब्दकथा स्पर्धा] शीर्षकविहीन
आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता.
तिचंही मन थार्यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं..
तिच्याकडे बघतांना त्याच्या डोळ्यांसमोरून आख्खा भूतकाळ तरळून गेला. ती पहिली नजरभेट, ती चोरट्या प्रेमाची वाढती खुमारी.. सगळे विरोध पत्करून घडलेलं मिलन. तिच्या मखमली, उबदार मिठीत निवलेल्या रात्री.. अन् वाफाळत्या कॉफीच्या साक्षीनं रंगवलेली स्वप्नं !
तिच्या स्वतःपासून दूर होण्याच्या विचारानेच त्याचा श्वास कोंडला. गदगदून तिला पाठमोरं मिठीत घेत तो हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला, "आय लव्ह यू.... अ लॉट, डार्लिंग !"
.
.
.
.
.
.
.
पुढच्याच क्षणी तिच्या मानेवरून सर्र्कन् सुरी फिरवण्याआधी !!
वाचने
25233
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
लेखन आवडले. धन्यवाद.
मातेच्या ग्रामात ! ते स्पर्धा वगैरे राहू द्या , पुढचा भाग टाका लौकर .
In reply to मातेच्या ग्रामात ! ते स्पर्धा by उगा काहितरीच
लायक असल्यास पुढचा भाग येईल.. ;-) , सध्यातरी ही कथा इथेच संपलीय..
नै समजले कैच
"भयानक" आवडली !
पुढच्या भागाची उत्सुकता आहे ! माझ्या मते ती पूरी होईलच ! :)
बापरे...
कथा मस्तं. शेवटचा झटका खतरनाक.
+१
याचा sequel येणार हो. त्या रामपुरी सु-याची शपथ!
याला + १असे मत द्या जेंव्हा तुम्ही आवडली असे प्रतिसाद देताय. मतं मोजताना सोपं पडेल.
आणि हो, माझ्याकडुन +१ :)
+1
+१
+१
पन सुरी ऐवजी कोयता परवडल हो ही ही
+१
शेवट अंगावर आला. पण आवडली. पुढचा भाग वाचायला मिळावा हि अपेक्षा.
आईशप्पथ काय भयानक शेवट! वाचकाच्या मानेवर पण सुरी फिरवलीत.
+१
पण कथा नावातला फक्त क काढा नाव अनुरूप होईल ही नम्र सुचवणी.
नियमीत वाचक नाखु
In reply to कथेला +१ by नाखु
पण कथा नावातला फक्त क काढा नाव अनुरूप होईल ही नम्र सुचवणी.हा हा हा.. भारी सुचना.. पण, असोच.
+१
सर्व स्पर्धकांना विनंती की जरी तुमची शशक अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नाही तरी स्पर्धा संपल्यावर तुमच्या कथेचा पुढचा भाग वाचायला नक्कीच आवडेल. त्यामुळे सर्व स्पर्धकांनी पुढचा भाग तयार ठेवावा ही विनंती.
+१
+1
कथेचा शेवट वाचल्यावर जॉर्ज क्लुनीच्या "दि अमेरिकन" या चित्रपटाची सुरुवात आठवली!
+१
+१
हे तर "कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा" असं झालं.
त्याने तीला का मारलं. :D
+१
In reply to हे तर "कटप्पा ने बाहुबली को by शलभ
"ती" कदाचित व्यापंम मधली साक्षीदार असेल ….
;)
In reply to सिक्वल ... by पगला गजोधर
मस्त जोक पगलवा!!!
एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे?
म्हणजे एक अशी कथा कि ज्या मधून काही अर्थ बोध होईल किंवा जी स्वतः एक "कथा" म्हणून ओळखली जाऊ शकेल...
माफ करा पण केवळ पुढच्या भागासाठीची पार्श्वभूमी तयार करणारे १०० शब्द असे वाटले मला हे!
कारण जर असे झाले तर २०० शब्दांच्या कथेला १०० शब्दांचे २ भाग करून प्रकाशित करण्यासारखे होईल.
लेखनाबद्दल माझे काही म्हणणे नाही पण मत मांडावेसे वाटले.
In reply to एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे? by शब्दबम्बाळ
हेच्च वाटले
In reply to एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे? by शब्दबम्बाळ
तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगतोय.. मागे मिपावर एक धागा आला होता. 'यमक न जुळवता चारोळी'चा. तो वाचल्यावर ह्या चार ओळी सुचल्या होत्या.
'तिला हळूवारपणे मिठीत घेऊन
तो तिच्या बटांशी खेळत
बोलला तिच्या कानात 'आय लव यु, हनी..'
सर्र्कन् तिचा गळा चिरण्याआधी..'
मी एवढीच टाकणार होतो मिपावर.. ('ट्रेंडसेटर' बनायचा पण विचार होताच म्हणा.. ;-) ) मग श्रीरंग जोशींच्या चेपुपोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे वाटलं की जर 'शतशब्दकथा' ही टर्मच आपण दिलीय, तर एकतरी शशक असावी नावावर म्हणून ही कथा लिहीली. मिपावर टाकणार तेवढ्यात 'शशक स्पर्धे'बद्दल कळलं, म्हणून थांबलो आणि आता टाकली..
तर प्रश्न असा की 'अशी कथा किंवा शतशब्दकथा असते का?' किंवा 'ह्या कथेला स्वतंत्र कथा मानावं का?' माझ्यामते, अश्या कथा असतात. 'सिक्वेल येऊ शकतो' हा विचार न करता वाचलीत तर ही स्वतंत्र कथापण आहे, ज्यात नेमकं काय घडलं असेल ह्याबद्दल वाचकानेच विचार करावा. मी सुशिंचा चाहता आहे. त्यांची 'दास्तान' कादंबरी अशीच न संपता संपते. त्यांच्या इतरपण अनेक कथा आहेत. 'थ्री डायमेन्शनल' कथेत आर्चिस शेवटी तो प्याला पितो की नाही? माझा त्यांच्याएवढा वकुब नाही. प्रयत्न केला एवढंच..
माझ्याच मेंदूतच ह्या कथेला 'डिपेंडंट' धरुन २-३ कल्पना आहेत. जिंकलो न जिंकलो, तरी मी त्या मिपाकरांसमोर ओतणार. आणि तरीही मी 'ही कथा स्वतंत्र आहे' असं मानतो.
असो.. 'नाकापेक्षा मोती जड' प्रमाणेच 'कथेपेक्षा स्पष्टीकरण जड' असं झालंय, त्याबद्दल क्षमस्व..
+१
शब्दबम्बाळ >>+१११११
केवळ पुढच्या भागासाठीची पार्श्वभूमी तयार करणारे १०० शब्द झाले हे तर . कथेच्या पहिल्या भागात त्याच्या शेवट असा असला पाहिजे कि ती 'कथा' म्हणून मान्य व्हायला हवी . त्याचा शेवट काहीतरी अर्थपूर्ण असला पाहिजे
+१
+१
+१
कथा लेखन ही क्रिएटिव गोष्ट असल्यामुळे कोणती कथा किती असावी वा कधी पूर्ण व्हावी हे एकाउंट्सच्या एंट्रीज प्रमाणे ठरवता येत नाही. ते पूर्णपणे लेखकाचे स्वातंत्र्य आहे.
म्हणून "तो पादला." ही सुद्धा एक वाक्याची एक कथा होऊ शकते.
त्यामुळे वाचकांना जर एखादी कथा पटली नसेल तर गुण देऊ नयेत. कारण कथेचा पहिला भाग कंक्ल्युझीव असावा अशी स्पर्धेची अट नाहीये.
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
"आणि आजूबाजूचे बेशुद्ध झाले" हा त्या कथेचा सिक्वल होऊ शकतो नै.
In reply to ;) by पगला गजोधर
आईशप्पथ.. भन्नाट आहात दोघंपण. एकवाक्यीय कथेची स्पर्धा झाली तर तुम्ही लोक 'एकत्रित विजेते' बनाल.. =))
असो. अत्यंत 'खवट वास' मारत का होईना, आदीसाहेबांनी समर्थन दिले, त्याबद्दल धन्यवाद..
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
आपले मत...
कारण कथेचा पहिला भाग कंक्ल्युझीव असावा अशी स्पर्धेची अट नाहीये.
आदूबाळ यांचा एक प्रतिसाद...
"हेच तर आव्हान आहे. पहिल्या फेरीतली कथा १०० शब्दांत स्वयंपूर्ण तर असायला हवीच, पण त्या कथावस्तूत सीक्वल आणण्याएवढा जीव पाहिजे. तो सीक्वलही १०० शब्दांत बसवता आला पाहिजे."
आता स्वयंपूर्णचा अर्थ आपापला!
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
नियम समजण्यात गोंधळ होतोय का?
चिगोंची कथा छान आहे पण उलगडा होण्यासाठी सिक्वल "आवश्यक" आहे.
माझ्या समजुती प्रमाणे पहिली शशक सिक्वल शिवायही समजायला हवी आणि संधी मिळाली तर सिक्वल लिहीता येईल अशी शक्यताही त्या कथेत हवी.. तीच तर गम्मत होती.
मलाही ह्या अर्धवट शशक वाटत आहेत (२०० शब्दांची कथा २ भागात प्रकाशित करण्यासारखं)
संमंने खुलासा करावा आणि जर आम्हाला वाटतय तसा नियम असेल तर अशा लेखकांना परत संधी द्यावी (तसंही एकच शशकची एंट्री हवी असा नियम नाहीचे ना?)
+ १
पुभालटा
+१
+१ मस्त आवडली
-१
+१
+१
प्रोजेक्ट ऐवजी मोहीम हा शब्द टाकला तर सदर णायक हा गुप्तहेर असल्याच फील येइल असे वाटते.
In reply to +१ by मी-सौरभ
पण मग जो आता सिक्वेल टाकलाय, तो कसा 'जस्टीफाय' करणार? ;-)
लेखन आवडले. धन्यवाद.