.....ही मनाची अंतरे...
लेखनविषय:
काव्यरस
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे
सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे...
होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे
स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे...
जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी
मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे ....
एकमेकाना इथे का आज सारे टाळती
सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे....
लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा
उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
वाचने
5316
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वा!
आवडली,
आवडली!
जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे ....हे खासच!फार छान कविता!
अतिशय आवडली कविता.
वा! आवडली.
मीटर....?
In reply to मीटर....? by वेल्लाभट
म्हणूनच कविता सदरात टाकली,
सुर्रेख!
मस्त
सुंदर कवीता.
सुरेख!
आवडली! मस्त!
छान च पण आनखि कड्वि चाललि
धन्यवाद सर्वांनाच!
छान लिहिलीये!
मस्त आहे आवडली
सुरेख कविता
धन्यवाद!
सुरेख कविता!
आवडेश. पु.ले.शु.