.....ही मनाची अंतरे...

चुकलामाकला जे न देखे रवी...
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

21 टिप्पण्या 5,319 दृश्ये

Comments

दमामि नवीन

आवडली, कच्चा माल पुरवल्याबद्दल धन्यवाद!:)

बहुगुणी नवीन

जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... हे खासच!