तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा
|
तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चैतन्यशील माणसाला लावला की माणसाची शुद्ध वस्तू होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली.
|
अध्यात्माच्या किंवा धार्मिक क्षेत्रात 'तत्त्व' या शब्दाचे आकर्षण सर्वाधिक आहे, असे आढळेल. तिथे 'धर्मतत्त्वे' अतिमहत्त्वाची ठरतात. ती धर्मसंस्थापकाने अथवा ईश्वराने दिलेली असतात. ती नेहमीच अपरिवर्तनीय आणि ज्यांचे उल्लंघन करता येत नाही, अशी असतात (- किंवा तशी श्रद्धा असते.)
संस्कृतमधील 'तत्त्व' संज्ञा 'तत्' या सर्वनामाला भाववाचक 'त्व' प्रत्यय लागून 'तत्त्व' हे नाम होते. त्यापासून तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. अद्वैत वेदान्तानुसार ब्रह्म हे व्यापक असल्यामुळे त्याचे नाव 'तत्'. या 'तत्'चा 'ते'पणा हे तत्त्व आहे. जे काही 'आहे', असे म्हणता येईल ते केवळ हेच तत्त्व आहे. म्हणून तत्त्व म्हणजे ब्रह्म.
तत्त्व म्हणजे पदार्थ हा संस्कृतमधील आणखी एक अर्थ आहे. पद म्हणजे शब्द. शब्दाला अर्थ असणे म्हणजे पदार्थ. ज्यासंबंधी आपण शब्द उच्चारू शकतो, वर्णन करू शकतो, तो पदार्थ (पदस्य अर्थ:). येथे अर्थ असणे, याचा अर्थ ज्या वस्तूचे किंवा ज्या विषयाचे आकलन होते ती वस्तू किंवा विषय. एखाद्या वस्तूचे किंवा विषयाचे पदाने वर्णन करता येत असेल तर आणि तरच तो पदार्थ असतो, अन्यथा नाही. येथे पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष वस्तू नाही तर वस्तू ज्याची बनली आहे ते सारतत्त्व (essence) किंवा द्रव्य substance). जसे की खुर्चीचे खुर्चीत्व, मनुष्याचे सार मनुष्यत्व, पशूचे पशुत्व. म्हणून तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप. या पदार्थरूपी तत्त्वाचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.
तत्त्व ही संज्ञा माणसाच्या रोजच्या व्यवहारात वापरली जाते तेव्हा ती बहुधा सिद्धांत, रीती, सत्यनिष्ठा, सत्याचरण, नियम, व्यवस्था, तात्पर्य या नतिक अर्थाने वापरात येते. तर जगाचे वर्णन करताना (निसर्ग विज्ञानात) वस्तूचे सार, सारघटक, सारतत्त्व, निसर्गनियमांची व्यवस्था या अर्थाने वापरली जाते. अध्यात्म, धर्म या क्षेत्रात ती जगाचे सार, मूलघटक, ब्रह्म, मन, देवता अशा अर्थाने उपयोगात येते.
इंग्लिशमधील principle चाही अर्थ असाच केला जातो. A man of principle म्हणजे सत्यनिष्ठ माणूस. 'the principles of democracy' म्हणजे लोकशाहीतील मूलभूत सत्ये, नियम किंवा गृहीतके.
आता, 'तत्त्व' किंवा principle या शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करता येईल का ? ही समस्या मांडता येईल.
या वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टीत एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र दिसते. एकदा तत्त्व निश्चित झाले की त्या तत्त्वाचे उपयोजन ठरते आणि ती राबविण्याची व्यवस्था तयार होते, तेच संबंधित व्यक्तीचे किंवा गटाचे, देशाचे तत्त्वज्ञान बनते. 'माझे तत्त्वज्ञान' याचा अर्थ हाच होतो. 'मी तत्त्वनिष्ठ माणूस आहे' हे म्हणणे म्हणजे 'मी अमुकतमुक तत्त्वे मान्य करतो, त्यासाठी मी काहीही करीन.' हे तत्त्वप्रेम असते. वर्ण, जात, धर्म, िलगभेद किंवा देश, एखादी विचारसरणी हे तत्त्व बनले की त्या व्यक्तीचे तत्त्वज्ञान अस्तित्वात येते, तेच त्याच्या विचाराचे, आचाराचे आणि प्रत्येक कृतीचे नियंत्रण करू लागते.
असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने 'तत्त्व' हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची 'शुद्ध भौतिक वस्तू' होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना (social regulative principles) एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली. साहजिकच अमुक जातीचा माणूस अमुक रीतीनेच वागेल, असा खास जातीयवादी मानसशास्त्रीय सिद्धान्त तयार झाला. वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. या तत्त्वांचे ज्ञान तेच तत्त्वज्ञान (जातीसाठी खावी माती), असा समज दृढ होत राहतो. माणसाचे 'मूळ स्वरूप ब्रह्म' आहे, तो 'प्रभूचा पुत्र' आहे किंवा 'अल्लाचा बंदा' आहे, या खऱ्या तर माणूस नावाच्या भौतिक वस्तूच्या व्याख्या आहेत. व्याख्या करणे हे माणसाचे सारतत्त्व किंवा द्रव्य शोधणेच असते. मग त्याला हवे तसे वापरता येते.
आता पाहा, 'माणूस विवेकशील, आत्मभान असणारा प्राणी आहे,' हीदेखील माणसाची व्याख्याच असते. सारतत्त्व किंवा द्रव्य म्हणून माणसाची व्याख्या करणे आणि नियामक तत्त्व म्हणून माणसाची कोणत्या तरी गुणधर्मामध्ये व्याख्या स्वीकारणे यात मूलभूत फरक करता येईल, असे वाटते. हा 'कोऽहम्?' (मी कोण आहे?)चे उत्तर शोधण्याचा प्रयत्न असतो.
'कोऽहम्?'चे रेडीमेड उत्तर प्रत्येक भारतीयाला वर्ण-जात-लिंगभेद या सारतत्त्व किंवा द्रव्य स्वरूपात मिळते. हा त्या त्या व्यक्तीचा खासगी आत्मपरिचय असला तरी तो वस्तुत: सार्वजनिक असतो. कारण वर्ण-जात सार्वजनिक असते. ती व्यक्ती मग त्या आत्मपरिचयाच्या तावडीत सापडते आणि विवेकशील माणूस हे स्वत:चे भान हरविते. व्यक्तीचा जातपरिचय इतर तशाच व्यक्तींना वावगा वाटत नाही, उलट सुरक्षित वाटते आणि चुकून जर जातपरिचयाचा पत्ताच लागत नाही, असे लक्षात आले तर त्यासाठी जंग जंग पछाडले जाते. 'जाती परिचय शोधण्याचे तर्कशास्त्र' या विषयात भारतीय माणूस अतिशय तज्ज्ञ असतोच.
आजची भारतीय सामाजिक व राजकीय स्थिती अशा अनेक प्रकारच्या तत्त्वांच्या संघर्षांच्या विषारी विळख्यात अडकली आहे, हे सहज दिसून येते. आमची परंपरा वर्ण, जात आणि लिंगभेद यांनी ग्रस्त आहे आणि विद्यमान जीवनाचा ढाचा मात्र युरोपीय तत्त्वांचा आहे. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युरोपीय व पाश्चात्त्य आहे तर त्याचे उपयोजन मात्र परंपरा टिकविण्यासाठी होते आहे. 'कोऽहम्?'चे उत्तर 'भारतीय!' असे सामाजिक स्वरूपाचे मिळेल, अशा व्यापक आत्मभानाकडे, आत्मपरिचयाकडे जाण्याची तयारी कशी करावी, हे धोरण आखणे आवश्यक आहे.
tattvabhan.blogspot.in वरून साभार
पूर्वप्रकाशन आणि सौजन्य: लोकसत्ता, दि.२३ जानेवारी २०१४
तत्त्वभान ०१. तत्त्वभानाच्या दिशेने ०२. भानावर येण्यापूर्वी.. ०३. स्वजाणिवेचे पक्व रूप
मी आधी ही लेखमाला वाचलेली
In reply to मी आधी ही लेखमाला वाचलेली by द-बाहुबली
अरे वो बोले ना भाइ... लिकान
In reply to अरे वो बोले ना भाइ... लिकान by संदीप डांगे
बीच बीच मी चलेगा यार !
In reply to बीच बीच मी चलेगा यार ! by निरन्जनदास
पिक्चर अभी बाकी हय ?
In reply to पिक्चर अभी बाकी हय ? by द-बाहुबली
कोई बात बात नै रे
In reply to कोई बात बात नै रे by निरन्जनदास
अब्बी, मै देक भाया, कित्ते
In reply to अब्बी, मै देक भाया, कित्ते by द-बाहुबली
तू बी आजा
In reply to बीच बीच मी चलेगा यार ! by निरन्जनदास
आमचा सॉरी
In reply to मी आधी ही लेखमाला वाचलेली by द-बाहुबली
खरे आहे !
विचार अधिक समजून घेण्याची इच्छा
सुरेख मुद्देसूद मांडणी. लेखन
In reply to सुरेख मुद्देसूद मांडणी. लेखन by अत्रुप्त आत्मा
अहो, तुम्हाला मी थांक्यू आहे
आभार औपचारिक
In reply to आभार औपचारिक by निरन्जनदास
जात, धर्म, लिंगभेद जन्मदत्त
In reply to जात, धर्म, लिंगभेद जन्मदत्त by द-बाहुबली
लिंगभेद जन्मदत्त नाही ?
In reply to लिंगभेद जन्मदत्त नाही ? by माहितगार
ठीकय , लिंगाधारीत भेदभाव करुन
In reply to ठीकय , लिंगाधारीत भेदभाव करुन by द-बाहुबली
माझे अजून दोन (?) शब्द :)
In reply to माझे अजून दोन (?) शब्द :) by माहितगार
लिंगभेद आणी भेदभाव ह्या दोन
तत्व व्याख्येचा उहापोह आवडला.
माझ्या डोक्यावरून लेख गेला.
In reply to माझ्या डोक्यावरून लेख गेला. by विवेकपटाईत
कृपया सांगा.
निरन्जनदासाम्साठी अजून एक विनंती
In reply to निरन्जनदासाम्साठी अजून एक विनंती by माहितगार
येईल.
चांगले लेखन
In reply to चांगले लेखन by कविता१९७८
धन्यवाद कविता !
मस्त..
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
+++१११
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद !
नजरचूक
पुन्हा गाढवपणा !
बोंब
In reply to बोंब by निरन्जनदास
अरे व्वा. तुम्ही तर मन्हा
सर, सध्य परिस्थीतीमधे संपुर्ण
In reply to सर, सध्य परिस्थीतीमधे संपुर्ण by द-बाहुबली
हाॅ हाॅ हाॅ हाॅ हाॅ
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुधीर
धन्यवाद !
लेख एकूणात पटला