वर्तुळ
लेखनविषय:
काव्यरस
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न …
चू. भू. दे. घे.
प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित
वर्तुळ
वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही
आयुष्य व्यापून टाकेल इतका
कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही ….
अपुरेपणाच्या विस्तृत्वाला
कोणतीच रेषा छेदत नसते
कितीही 'सुटावं' म्हटलं
प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….
वर्तुळाच्या गोलाईचा
कोणताच एक आकार नाही
मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं
कोणतच एक सूत्र नाही ….
गुरफटलेल्या आकृत्यांना
खरंतर स्वत:ची नावंच नसतात
आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना
पत्यांना, गावंच नसतात ….
- शब्दवेडी
वाचने
3342
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
फारच छान
कितीही 'सुटावं' म्हटलं
In reply to कितीही 'सुटावं' म्हटलं by जडभरत
मला पण असंच वाटलं पण कुठल्या
In reply to मला पण असंच वाटलं पण कुठल्या by क्रेझी
क्रेझी
In reply to क्रेझी by शब्दवेडी
नाही, त्यांनी एक विनोद केलेला
In reply to कितीही 'सुटावं' म्हटलं by जडभरत
नवीन आगमनाबद्दल स्वागत करतो.
In reply to कितीही 'सुटावं' म्हटलं by जडभरत
हो… हे जास्त छान वाटेल .
म्हणूनच
तिमा
In reply to तिमा by शब्दवेडी
प्ण आयुष्याचं वर्तूळ असं
आवडली... :)
कवीता आव्डली...मला थोडा कच्चा
आवडली कविता.फक्त
फक्त
... आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. या ऐवजी आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना भू-मितींचे , गावंच नसतात …. हे कसं वाटतय पहा बरं. .. नै ...म्हणजे रुपकाला धरलय त्यातच पूर्णविराम दिला तर शेवटी ॥औम शांति:शांति:शांति:॥ म्हणायला कसं ग्गा ग्गार वाटेल..म्हणून सुचवलं.In reply to आवडली कविता.फक्त by अत्रुप्त आत्मा
सुंदरच अत्रुप्त भाऊ!
In reply to आवडली कविता.फक्त by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त
ते कै अस्तंय न्हवे
चांगली आहे