मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्तुळ

शब्दवेडी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न … चू. भू. दे. घे. प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित वर्तुळ वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही आयुष्य व्यापून टाकेल इतका कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही …. अपुरेपणाच्या विस्तृत्वाला कोणतीच रेषा छेदत नसते कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते …. वर्तुळाच्या गोलाईचा कोणताच एक आकार नाही मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं कोणतच एक सूत्र नाही …. गुरफटलेल्या आकृत्यांना खरंतर स्वत:ची नावंच नसतात आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. - शब्दवेडी

वाचने 3342 वाचनखूण प्रतिक्रिया 17

जडभरत Tue, 07/14/2015 - 10:41
कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….
मला वाटतं दोन्ही ओळींच्या मध्ये तरी हा शब्द आवश्यक आहे.

In reply to by जडभरत

जडभरत Tue, 07/14/2015 - 10:49
नवीन आगमनाबद्दल स्वागत करतो. कविता चांगली आहे. शेवटच्या २ ओळी जरा अजून परिणामकारक करता आल्या असत्या तर चांगले!

तिमा Tue, 07/14/2015 - 11:04
वर्तुळात फार फिरु नये शिळेपणा दाटल्यावर टॅजंट बनून निघून जावे नव्या वर्तुळाच्या शोधात

शब्दवेडी Tue, 07/14/2015 - 11:52
तिमा हाहाहाहा प्ण आयुष्याचं वर्तूळ असं सहजासहजी थोडीच मोडता येतं....

In reply to by शब्दवेडी

जडभरत Tue, 07/14/2015 - 12:29
प्ण आयुष्याचं वर्तूळ असं सहजासहजी थोडीच मोडता येतं....
हे वाक्य खूप म्हणजे खूप आवडलं. आयुष्याच्या चक्रात भिरभिरत राहणारा जीव, त्याची इच्छा असो वा नसो, हे वर्तुळ सोडून बाहेर जाऊ शकत नाही. यालाच म्हणायचं मायाजाल. जे काही थोडके लोक हे वर्तुळ भेदून जातात त्यांनाच तर लोक डोक्यावर घेतात क्रिष्ण, ख्रिस्त, बुद्ध, तीर्थंकर म्हणून.

आवडली कविता.

फक्त

... आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. या ऐवजी आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना भू-मितींचे , गावंच नसतात …. हे कसं वाटतय पहा बरं. .. नै ...म्हणजे रुपकाला धरलय त्यातच पूर्णविराम दिला तर शेवटी ॥औम शांति:शांति:शांति:॥ म्हणायला कसं ग्गा ग्गार वाटेल..म्हणून सुचवलं.

जडभरत Tue, 07/14/2015 - 17:15
ते कै अस्तंय न्हवे ज्ञानान्जनशलाकया, अर्धोन्मीलितम नेत्रम, वगैरे वगैरे तेच खरे शेवटी गुरुजीना यावे लागले.