सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे). मालीकेत कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे. आचार्य चाणक्य मगध साम्राज्याचे पितामह आणि सशक्त मार्गदर्शक स्वरूपात दाखवले आहेत. सध्या पाटलीपुत्र (पाटना) नगरीत अशोकाचे पिता बिंदुसार आणि राजघराण्यास कुमार अशोक एका मोठ्या कटकारस्थानातून वाचवतो आणि ते कटकारस्थान उघडकीस येण्याचे प्रसंग सध्या दाखवले जात आहेत. एकुण प्रसंगाचे सादरीकरण रोचक आहे. सम्राट बिंदुसारची त्याची पत्नी धर्मा आणि कुमार अशोक यांच्या पासून ताटातूट झालेली होती पण राजघराण्यातील कट कारस्थानांमुळे आचार्य चाणक्यांनी सम्राट बिंदुसारना कुमार अशोक त्यांचा मुलगा आहे हे अद्याप (हे लिही पर्यंत) सांगीतलेले नाही आणि राणी धर्मा बाकी राजघराण्यास न सांगता दासीरुपात पण सम्राट बिंदुसारला न दिसता वावरते आहे अशी काहीशी (मालीकेतील) कथा आहे.
कुणा एका मराठी दिग्दर्शकाच वाक्य आहे व्हीलनला जेवढे जास्त व्हीलन केले दाखवले तेवढे हिरो अधिक हिरो वाटतो. तर या मालीकेत बाहेरचे दोन तीन (मांडलीक) राजे व्हीलनच्या स्वरूपात दाखवले आहेत. बिंदुसारची सावत्र आई हेलना ग्रीक राजा सेल्यूकल निकेटरची मुलगी आहे जीने युद्धात वडीलांचा पराभव झाल्यामुळे चंद्रगुप्ताशी विवाह केला, वरून मगधवर प्रेम करणारी पण प्रत्यक्षात कटकारस्थानांनी मगध साम्राज्याचा नाश करून आपला पुत्र जस्टीनला सिंहासनावर बसवून राजमाता होण्याचे तिचे स्वप्न कुमार अशोक आणि आचार्य चाणक्य यांच्यामुळे धुळीस मिळते. बिंदुसारचा पहिला मुलगा सुशीम हा सुद्धा अहंकारी व्हिलन स्वरूपात कुमार अशोकवर उगाचच सतत खार खाऊन असतो आणि त्याच्या आईचे (बिंदुसारच्या महाराणीचे) स्वप्नही राजमाता व्हायचे आहे. सम्राट बिंदुसारची एकराणी शुभरसी चांगल्या स्वभावाची दाखवलेली आहे जीच्याकडे अशोकची आई दासी स्वरूपात लपून राहते आहे. सम्राट बिंदुसारची तीसरी राणी नूरसुद्धा तिच्या मुलाला सम्राट स्वरूपात पाहू इच्छिते. राणी नूरचे चरित्र मात्र ती पत्नी बिंदुसारची असली तरीही प्रत्यक्षात ती बिंदूसारचा मोठा भाऊ जस्टीनवर प्रेमही करते आणि नूरचा मुलगा खरेतर जस्टीन पासून झालेला असतो (इति कलर्स मालीका-लेखकाचे स्वांतत्र्य - बहुधा नकारात्मक गोष्टींच्या अनुभवातून अशोक दुख्खाचे कारण शोधत अशोक पुढे बौद्ध धर्म स्विकारणार आहे त्या दृष्टीने अशोकच्या जिवनातील वेगवेगळ्या प्रसंगांची रचना करण्याचा लेखकाचा प्रयत्न होता का कि केवळ धारावाहीकात मसाला भरणे हे मालिकेत पुढे काय होते यावरून कळेल)
बिंदुसार, त्याची ग्रीक वंशीय आई हेलेना, त्याचा सावत्र सासरा सेल्यूकस निकेटर, मुलगा सुशीम, आचार्य चाणक्याचा शिष्य राधागूप्त, अशोकची आई धर्मा हि नावे अशोकाच्या आईचे राजवाड्यापासून बराच काळ दूर असणे या आता पर्यंतच्या सम्राट अशोकाच्या बाबतीत माहित आहे असे समजल्या जाणार्या गोष्टी मालीकेत जशाच्या तशा आहेत पण बाकीचे दाखवलेले प्रसंग अत्यंत काल्पनीक आणि लेखकाने लेखनाचे प्रचंड स्वातंत्र्य घेतले आहे. योगा योगाने मालिकेच्या लेखकाचेही नाव अशोक बनकर आहे पण ते बहुधा योगा योगा योगानेच. इंग्रजी विकिपीडियावरील माहितीनुसार अशोक बनकरांचे पालनपोषण मॅटर्नल अँग्लोइंडीयन बाजूने झाले आहे. आणि ते इंग्रजी भाषिक लेखक म्हणूनही परिचीत आहेत तेव्हा त्यांची ही मालीका इंग्रजीत अनुवादीत होऊन बाकी जगभर प्रसिद्धी मिळवू शकली तर नवल असणार नाही.
कलर्स आणि अशोक बनकर टिमने मिळून मालिकेत दर्शवलेला इतिहास हा नव्याने लिहीलेला आहे. तो बराचसा पॉलीटीकली करेक्ट लिहिण्याचा प्रयास त्यांचा यशस्वी होताना दिसतो. तो काळाच्या ओघात मिथॉलॉजी म्हणून नजीकच्या भविष्यात जनमान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
खर्या व्यक्ती नामांच्या जवळ जाऊन सुद्धा बहुतांश काल्पनीक आहेत. नकारात्मक प्रसंग इतपत चातुर्याने रंगवले आहेत की सहसा लेखकाच्या स्वातंत्र्यावर सर्वसामान्य जनतेतून फारसे आक्षेप येणार नाहीत उलट लोकप्रीयताच लाभण्याची शक्यता अधीक आहे. या कलर्स मालिकेत मालिका प्रसंग काल्पनीक आहेत हे कुठे सांगीतले जात नाहीत. धागालेख चर्चेसाठी माझा मुद्दा लेखक आणि दिग्दर्शकांनी काल्पनीक प्रसंग रंगवण्याच्या स्वातंत्र्यावर नाही. पण कोणत्यातरी एका स्टेजला हे सर्व काल्पनीक प्रसंग आहेत हे लेखक आणि दिग्दर्शकांनी सांगावयास हवेत असे तुम्हाला वाटते का? या मालिकेतील मुख्य पात्रे सकारात्मक भूमीकेतच नव्हे अत्यंत आदर्श रंगवली आहेत की त्यांच्या लोकप्रीयतेत भरच पडेल.
लेखकाने कल्पनेतून रंगवलेल्या मिथॉलॉजीचा समाजावर ती मिथॉलॉजी खरीच आहे समजून किती प्रभाव पडावा ? बाकीही या मालिके संदर्भाने चर्चा करण्यास हरकत नाही जसे की या मालिकेत दाखवलेल्या पात्रांबाबत आणि प्रसंगांबाबत तुम्हाला काय वाटते. सम्राट अशोकाचा ज्ञात प्रमाण अथवा आख्यायिकातील इतिहास आणि मालिकेतील इतिहास यांची तुलना इत्यादी.
अर्थात काथ्याकुट करताना व्यक्तीगत टिका टाळाव्यात मिपा संपादकीय धोरणांचे यथोचीत पालन करावे हि नम्र विनंती
वाचने
18824
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालिकेचा एकही भाग बघितलेला
सेल्युलस निकेटर त्याला दुसरा
In reply to मालिकेचा एकही भाग बघितलेला by प्रचेतस
आर्य चाणक्याचा मृत्यु
In reply to मालिकेचा एकही भाग बघितलेला by प्रचेतस
आर्य चाणक्याचा मृत्यु अशोकाच्या जन्माआधीच झालेला होता. त्यामुळे पुढचे वाचण्यात काहीच स्वारस्य उरले नाही.याबद्दल अजुन माहिती मिळू शकेल का? कारण आंतरजालावर काही वेगळ्याच सनावळ्या उपलब्ध आहेत. विकीवर (जरी तिथली माहिती पुर्णपणे ऑथेंटीक नसली तरी) चाणक्याचा मृत्यु 275 BCE असे दाखवतेय, तर अशोकाच्या राज्याभिषेकाचा कालावधी 269 BCE असे दाखवतेय. जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स.
In reply to आर्य चाणक्याचा मृत्यु by विशाल कुलकर्णी
चंद्रगुप्ताने उत्तरार्धात
In reply to कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स. by प्रचेतस
शक्यता जवळजवळ नाहीच.
In reply to चंद्रगुप्ताने उत्तरार्धात by माहितगार
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
In reply to कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स. by प्रचेतस
275 BCE हे 269 BCE च्या ५
In reply to आर्य चाणक्याचा मृत्यु by विशाल कुलकर्णी
एक महत्वाचा मुद्दा असा की
एग्झॅक्टली. :( अशांच्या नादी
In reply to एक महत्वाचा मुद्दा असा की by अस्वस्थामा
हो रे. पण बर्याच वेळेस असा
In reply to एग्झॅक्टली. :( अशांच्या नादी by बॅटमॅन
(मालिका नै त्यावरुन "असेही
In reply to हो रे. पण बर्याच वेळेस असा by अस्वस्थामा
हा हा हा.. हे भारीय.. :))
In reply to (मालिका नै त्यावरुन "असेही by बॅटमॅन
"आधारित फिक्शन" असे म्हटले आहे
मालिका चालू असताना "आधारित
In reply to "आधारित फिक्शन" असे म्हटले आहे by संग्राम
सादरीकरण
नीलकांत +१
In reply to सादरीकरण by नीलकांत
+१..
In reply to सादरीकरण by नीलकांत
सादरीकरण १ नं
ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि
प्रतिसाद १
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
दुर्देवाने ह्या देशात
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
सहमत. निनादभौ, चेक द फॅक्ट
In reply to दुर्देवाने ह्या देशात by अस्वस्थामा
प्रतिसाद देतांना मला असे
In reply to दुर्देवाने ह्या देशात by अस्वस्थामा
अलंकार फारच गोड दिसते बुआ
In reply to प्रतिसाद देतांना मला असे by निनाद मुक्काम …
अलंकार फारच गोड दिसते बुआतुम्ही त्या 'राजाजीराज' नामक मांडलिकाच्या जो बिंदुसाराच्या हत्येच्या कटात सहभागी आहे कन्येबद्दल बोलताय का? तसे असेल तर तिचे नाव 'अलंकार' नाही 'अहंकारा' आहे :)कै नक्की सांगता यायच नै.
In reply to प्रतिसाद देतांना मला असे by निनाद मुक्काम …
प्रतिसाद २
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी
In reply to प्रतिसाद २ by माहितगार
चंड-अशोक
In reply to चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी by प्रचेतस
ओह्ह ओके.
In reply to चंड-अशोक by माहितगार
शक्य वाटते
In reply to ओह्ह ओके. by प्रचेतस
वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील
In reply to शक्य वाटते by माहितगार
हा भद्रबाहू कोण?
In reply to वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील by बॅटमॅन
एकसारख्या नावां मुळे इतिहास
In reply to वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील by बॅटमॅन
चंड अशोक
In reply to चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी by प्रचेतस
नाही पाहिला अजून.
In reply to चंड अशोक by श्रीरंग_जोशी
नाही पाहिला अजून.
In reply to नाही पाहिला अजून. by प्रचेतस
नाही पाहिला अजून.पाहूही नकात. पाहण्यासारखं एक करीना सोडली तर इतर काहीही नाहीये त्यात. ;)जोधा अकबर मालिकेतील जोधा तर
जोधा अकबर मालिकेतील जोधा तर
In reply to जोधा अकबर मालिकेतील जोधा तर by देव मासा
जोधा अकबर मालिकेतील जोधा तर चक्क इंग्रजीत I love You बोलते. आणि अकबराला लिहलेल्या पत्रात चक्क तसे लिहते सुद्धाऐकावे ते नवलच !!!वीर शिवाजी
आता ते तरी काय करणार म्हणा..
In reply to वीर शिवाजी by कपिलमुनी
दाखले
In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ
In reply to दाखले by कपिलमुनी
ते तरी परवडलं, लोक काय तर
In reply to दाखले by कपिलमुनी
ग्रीस
In reply to ते तरी परवडलं, लोक काय तर by बॅटमॅन
खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे
In reply to ग्रीस by कपिलमुनी
राजीव दीक्षितांच्या एका
In reply to खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे by बॅटमॅन
हा हा हा !
In reply to राजीव दीक्षितांच्या एका by नाव आडनाव
उच्चारदृष्ट्या तशीच फोड आहे
In reply to राजीव दीक्षितांच्या एका by नाव आडनाव
गर्वसे कहो, हम पुनाफ्यान हैं. पुना तिथे काय उना?
In reply to खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =
In reply to गर्वसे कहो, हम पुनाफ्यान हैं. पुना तिथे काय उना? by प्रसाद गोडबोले
हर्क्युलिस = हरी + कुल + ईश
In reply to ग्रीस by कपिलमुनी
टवाळ ओक =)) जमलंय हो!
In reply to हर्क्युलिस = हरी + कुल + ईश by टवाळ कार्टा
च्यामारी सुटलेयत सगळे नुसते .
In reply to टवाळ ओक =)) जमलंय हो! by बॅटमॅन
+१
In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
वरती बॅट्याने हॅरी पॉटरचा
In reply to +१ by कपिलमुनी
पण बर्याच लोकांचा दावा असतो
In reply to वरती बॅट्याने हॅरी पॉटरचा by अस्वस्थामा
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा
In reply to पण बर्याच लोकांचा दावा असतो by बॅटमॅन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा
In reply to पण बर्याच लोकांचा दावा असतो by बॅटमॅन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)अशी एक धुमश्चक्री बघायची आस आहे ! =))जबरा ...
In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
हाहा, धन्यवाद!
In reply to जबरा ... by योगी९००
सत्तेसाठी इतिहासातील भावांची साठमारी या विषयावर एनी कॉमेंट्स ?
करमणूकप्रधान मालिका