चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)
In reply to मालिकेचा एकही भाग बघितलेला by प्रचेतस
In reply to मालिकेचा एकही भाग बघितलेला by प्रचेतस
आर्य चाणक्याचा मृत्यु अशोकाच्या जन्माआधीच झालेला होता. त्यामुळे पुढचे वाचण्यात काहीच स्वारस्य उरले नाही.
याबद्दल अजुन माहिती मिळू शकेल का? कारण आंतरजालावर काही वेगळ्याच सनावळ्या उपलब्ध आहेत. विकीवर (जरी तिथली माहिती पुर्णपणे ऑथेंटीक नसली तरी) चाणक्याचा मृत्यु 275 BCE असे दाखवतेय, तर अशोकाच्या राज्याभिषेकाचा कालावधी 269 BCE असे दाखवतेय. जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा. In reply to आर्य चाणक्याचा मृत्यु by विशाल कुलकर्णी
In reply to कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स. by प्रचेतस
In reply to चंद्रगुप्ताने उत्तरार्धात by माहितगार
In reply to कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स. by प्रचेतस
In reply to आर्य चाणक्याचा मृत्यु by विशाल कुलकर्णी
In reply to एक महत्वाचा मुद्दा असा की by अस्वस्थामा
In reply to एग्झॅक्टली. :( अशांच्या नादी by बॅटमॅन
In reply to हो रे. पण बर्याच वेळेस असा by अस्वस्थामा
(मालिका नै त्यावरुन "असेही असू शकेल" असा दावा करणारे ).. :)अशांना फक्त इतकंच सांगायचं, पिच्चर तर हॅरी पॉटरवरही निघालाय, तेवढ्यावरनं काय हॉगवर्ट्सची एण्ट्रन्स एक्झाम देणार आहात काय?
In reply to (मालिका नै त्यावरुन "असेही by बॅटमॅन
In reply to "आधारित फिक्शन" असे म्हटले आहे by संग्राम
मालिका चालू असताना "आधारित फिक्शन" अशा आषयाची तळटीप दाखवतातहो का ? सम हाऊ माझे लक्ष गेले नसावे, पुन्हा एकदा पाहीन टिव्ही पडद्याच्या साईझवर अवलंबून नसेल ना.
In reply to सादरीकरण by नीलकांत
In reply to सादरीकरण by नीलकांत
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
दुर्देवाने ह्या देशात बाबासाहेबांनी शिवशाही वर जेवढे संशोधन केले तेवढे इतिहासाच्या कोणत्याही कालखंडावर झालेले नाही.या घडीला जे लोक आपले हे वाक्य वाचतील त्यातील बहुतांश लोकांना 'बाबासाहेब' हा उल्लेख कोणत्या व्यक्ती बद्दलचा आहे हे लागलीच लक्षात येईल, पण अगदी प्रत्येकाला लक्षात येईलच असेही नव्हे, आता आपल्या या वाक्याचा संदर्भ घेत शिवशाहीवरील संशोधनाचे क्रेडीट बाबासाहेब नावाच्या वेगळ्याच व्यक्तीस (मराठी विकिपीडियावर बाबासाहेब नावाच्या ६ उल्लेखनीय व्यक्ती आहेत) दिले तर बाबासाहेब नावाच्या दोन व्यक्तींच्या इतिहासाची तोडमोड होणार नाही का ? म्हणून इतिहासातील अचूकता शक्य तेवढ्या तटस्थतेने सांभाळली जाण्याचे स्वतःचे महत्व आहे. (इथे कोणताही इतिहास पुर्ण सत्य आहे असा दावा करण्याचा उद्देश नाही हे वेगळे सांगणे न लगे) बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लेखन करतानाची त्यांची भूमीका त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत आली आहे. बाबासाहेब पुरंदरें म्हणतात.. "...ऐतिहासिक सत्य आणि पारंपरिक आख्यायिका यांचा मी उपयोग केला आहे. संवाद व वर्णने जेवढी अस्सल मिळाली तेवढी मी वापरली आहेत. बाकीची सत्याच्या अनुरोधाने घातली आहेत. हा काटेकोर शास्त्रीय इतिहास नव्हे. बखरी व अस्सल पत्रे यांचा मुक्त वापर आहे...." संदर्भ मी ललित साहित्याचा वाचक नसल्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंयांची पुस्तके वाचलेली नाहीत पण त्यांच्या काही ग्रंथात त्यांनी संदर्भ नोंदवण्याचा प्रयत्न केलेला असावा हे स्विकारून; केवळ बाबासाहेब पुरंदरे म्हणून नव्हे कोणत्याही इतिहासाच्या लेखकाने काटेकोर शास्त्रीय इतिहास आणि लेखकाने स्वतः स्वातंत्र्य घेऊन केलेली काल्पनिक सरमिसळ त्या लेखकास व्यक्तीशः सत्याच्या अनुरोधाने आहे असे वाटत असले तरीही काटेकोर शास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासकास तथाकथीत सत्याच्या अनुरोधाने केलेली सरमिसळ काल्पनिक आणि सब्जेक्टीव्ह आहे हे लक्षात येत असते. तेव्हा काटेकोर शास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासकाने वाचलेला इतिहासही कितपत खरा असेल हा निश्चितपणे वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, (पण एका त्रुटीने दुसर्या त्रुटीचे समर्थन होत नाही) पण या चर्चेत असलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील बद्दल कुणी अतिरंजित अशी धारणा करणे म्हणजे, खरेच असे ,,,, का सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही त्या मागून होऊ शकतो ? "वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध" ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. म्हणून अतीरंजततेबद्दल सांशंकता व्यक्त करणार्यांच्या शंकांची सुद्धा दखल घेतली पाहीजे असे वाटते आणि धाग्याचा उद्देश अंशतः अशा शंकांची दखल घेणे आहे. आपण परिच्छेदाच्या सुरवातीस जे म्हणता "ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि तो इतिहास ५० टक्क्याहून अधिक अचूक आहे अशी खात्री आहे त्यांनी संक्षिप्त स्वरुपात इतिहास येथे सांगावा" असे मलाही वाटते.
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
दुर्देवाने ह्या देशात बाबासाहेबांनी शिवशाही वर जेवढे संशोधन केले तेवढे इतिहासाच्या कोणत्याही कालखंडावर झालेले नाहीह्म्म.. वानगीदाखल राजवाडे यांच्याबद्दल ऐकले आहे काय हो ? नै त्यांनी जन्मच वाया घालवला म्हणायचा. बाकी असोच.
In reply to दुर्देवाने ह्या देशात by अस्वस्थामा
In reply to दुर्देवाने ह्या देशात by अस्वस्थामा
In reply to प्रतिसाद देतांना मला असे by निनाद मुक्काम …
अलंकार फारच गोड दिसते बुआ
तुम्ही त्या 'राजाजीराज' नामक मांडलिकाच्या जो बिंदुसाराच्या हत्येच्या कटात सहभागी आहे कन्येबद्दल बोलताय का? तसे असेल तर तिचे नाव 'अलंकार' नाही 'अहंकारा' आहे :)In reply to प्रतिसाद देतांना मला असे by निनाद मुक्काम …
व महत्त्वाचे म्हणजे खुरासनी युनानी व हिंदू वंशीय ह्यांचा सिंहासनाला चाललेला सत्ता संघर्ष अश्या बरर्याच गोष्टी ह्या निमित्ताने दिसतातराजकीय विवाहांमुळे पुढील पिढीतील राजा ठरवला जाताना मालिकेत रंगवल्या प्रमाणे सत्तासंघर्ष होऊ शकत असावेत. अर्थात ह्या मालिकेत खुरासान प्रकरण (नूर आणि तीचे वडील) घेतले आहे ते मौर्यकुलाच्या इतिहासाचे माझ्या (जुजबी) वाचनात तरी आलेले नाही, बहुधा पुर्ण काल्पनिक असावे. युनानी सेल्यूकस निकेटरच्या दोन मुली होत्या एकीचे नाव हेलेना आणि दुसरी डिओडोरा. चंद्ररगुप्ताने सेल्यूकस निकेटरला युद्धात परास्त केल्यानंतर (पश्चिम) भारतातील भूभाग आणि हेलेनाशी लग्न हे ऐतिहासीक तथ्याशी धरून असावे. चंद्रगुप्ताच्या दुसर्या एका पत्नीचे (जी बिंदुसारची माता होती) नाव दुर्धरा असे येते जे डिओडोरा शब्दाचा अपभ्रंशतर नाही अशीही शंका घेतली जाते. चंद्रगुप्त आणि बिंदुसारच्या काळात जैन आणि बौद्धधर्मियांचा प्रभाव बर्यापैकी असू शकतो म्हणजे बिंदुसारच्या व्यक्तीगत निष्ठा वैदीक होत्या कि नव्हत्या ह्याचा कितपत स्पष्ट निर्देश इतिहासास उपलब्ध आहे याची कल्पना नाही शिवाय बिंदुसाराची माता दुर्धरा आणि युनानी डिओडोरा एकच असतील तर जस्टीन प्रमाणे बिंदुसारमध्येही मातेच्या बाजुने युनानी रक्त असण्याची शक्यताही शिल्लक राहतेच. अर्थात जस्टीन आणि बिंदुसार सावत्र एवजी सख्खे भाऊही असते तरीही सत्तासंघर्ष झालाच नसता अथवा नसावा असेही नाही. या मालिकेतील त्याहीपेक्षा कच्चादुवा म्हणजे सेल्युकस निकेटर कडे पश्चिम भारत चंद्रगुप्ताला दिल्यानंतर सुद्धा पर्शीयाचा प्रचंड मोठा भूभाग शिल्लक असावा आणि तो त्याच्या (पर्शियाच्या पश्चिम?) आघाडीवर सत्ता संघर्षात इतपत व्यस्त असावा की त्याचा पाटलीपुत्रात पडीक राहून कटकारस्थानात प्रत्यक्ष सहभाग तार्कीक दृष्ट्या संभवनीय वाटत नाही. मौर्य वंशाचा काळ इतपत जुना आहे की इतिहास संशोधनातुन मूळ दस्तएवज नव्याने मिळण्याची शक्यता अंधूक असू शकते पण बरीच कमी असावी. त्यामुळे इतिहासकारांनाही काल्पनीक कथा रंगवण्याशिवाय पर्याय नाही.
काही वर्षांच्या पूर्वी भारतातील राजमातेचे परकीय रक्त तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी आड आले , त्या घटनेला नैतिक अधिष्ठान ह्या मालिकेतून चढवण्यात येते, हेलेना व जस्टीन च्या मुखी अनेक संवाद मुद्दामहून दिले गेले आहेत असे वाटते.:) मालिकेचे लेखक अशोक बनकर यांची आई बहुधा पोर्तुगीज वंशाची आणि संगोपन आजोळी झालेले आहे असे इति इंग्रजी विकिपीडियातून दिसते. पण ते गोव्याचे आहेत आणि अंबानींच्या चैनल ची माया आहे असे म्हणता तेव्हा कै नक्की सांगता यायच नै.
In reply to ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि by निनाद मुक्काम …
In reply to प्रतिसाद २ by माहितगार
In reply to चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी by प्रचेतस
In reply to चंड-अशोक by माहितगार
In reply to ओह्ह ओके. by प्रचेतस
बाकी कलिंगयुद्धाआधीच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती असे बरेच संशोधक मानतात मात्र कलिंगयुद्धानंतर अशोक हिंसेविषयी विरक्त झाला.हो आंतरजालवर माझ्याही वाचनात असेच काहीसे आले आहे, की अशोकाच्या एका पत्नीने (कि जी बौद्धधर्मीय) होती युद्धात जखमि झाल्यानंतर सम्राट अशोकाची सुश्रुषा केली आणि तिच्या प्रभावाने अशोक बौद्ध धर्मीय झाला. पण चंद्रगुप्ताने ज्या अर्थी उत्तरार्धात जैन धर्माचा स्विकार केला म्हटले जाते हे खरे असेल तर एकुण अहींसावाद मौर्य राजघराण्यास एकदम नवा नसावा. बहुतांश भारतीय उपमहाद्वीप चंद्रगुप्ताच्या काळातच जिंकला गेला होता बिंदुसाराच्याकाळात दक्षीणभारतात मौर्यसाम्राज्याने राज्यांना मांडलीक केले, एक कलिंग वगळता तसे वस्तुतः खूप सार्या मोठ्या युद्धांकरता अशोकास कितपत आव्हान शिल्लक होते अशी शंका वाटते. अशोकावर तक्षशिलेच्या एका युद्धाचा प्रसंग आला तो प्रत्यक्षात युद्ध न होताच निभावला गेला. कितीतरी हिंसात्मक मोठी युद्धे कितीतरी सत्ताधीशांनी पाहिली असतील पण त्यांच्या पैकी सहसा इतर कुणी अहींसावादी झाल्याचे फारसे वाचनात येत नाही. म्हणून कलिंगयुद्धाआधीच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती असे बरेच संशोधक मानतात मात्र कलिंगयुद्धानंतर अशोक हिंसेविषयी विरक्त झाला. असे शक्य वाटते.
In reply to शक्य वाटते by माहितगार
In reply to वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील by बॅटमॅन
In reply to वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील by बॅटमॅन
In reply to चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी by प्रचेतस
In reply to चंड अशोक by श्रीरंग_जोशी
In reply to नाही पाहिला अजून. by प्रचेतस
नाही पाहिला अजून.
पाहूही नकात. पाहण्यासारखं एक करीना सोडली तर इतर काहीही नाहीये त्यात. ;)In reply to जोधा अकबर मालिकेतील जोधा तर by देव मासा
जोधा अकबर मालिकेतील जोधा तर
चक्क इंग्रजीत I love You बोलते.
आणि अकबराला लिहलेल्या पत्रात
चक्क तसे लिहते सुद्धा
ऐकावे ते नवलच !!!In reply to वीर शिवाजी by कपिलमुनी
In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
In reply to दाखले by कपिलमुनी
In reply to दाखले by कपिलमुनी
In reply to ते तरी परवडलं, लोक काय तर by बॅटमॅन
In reply to ग्रीस by कपिलमुनी
In reply to खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे by बॅटमॅन
In reply to राजीव दीक्षितांच्या एका by नाव आडनाव
In reply to राजीव दीक्षितांच्या एका by नाव आडनाव
In reply to खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे by बॅटमॅन
गर्वसे कहो, हम पुनाफ्यान हैं. पुना तिथे काय उना?>>> अहो काही नवइतिहासकारांच्या मते अशोक हा बुध्दाचाच अवतार होता ! अता बोला !! ( अवांतर : प्रतिसाद टाईप केला होता , प्रकाशित केला होता की नाही ते आठवत नाही ... की प्रकाशित केल्या नंतर संपादित झाला हे ही आठवत नाही . अर्थात संपादित होण्यासारखे ह्या प्रतिसादात काही नाहीये म्हणा , अनाहितावर की कोण्या लाडक्या सदस्यावर टीका नाही , काही अश्लिल नाही , कोणाच्या भावना दुखावणारेही काही नाही . ज्या प्रमाणे पु.ना ओक ह्यांची मते ज्या प्रमाणे बहुतांशांचे मनोरंजन करतात तसेच ह्या इतिहासकारांची मते मजेशीर आहेत ! )
In reply to गर्वसे कहो, हम पुनाफ्यान हैं. पुना तिथे काय उना? by प्रसाद गोडबोले
In reply to ग्रीस by कपिलमुनी
In reply to हर्क्युलिस = हरी + कुल + ईश by टवाळ कार्टा
In reply to टवाळ ओक =)) जमलंय हो! by बॅटमॅन
In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
In reply to +१ by कपिलमुनी
In reply to वरती बॅट्याने हॅरी पॉटरचा by अस्वस्थामा
पण बर्याच लोकांचा दावा असतो की हे मान्यवर लेखक, मालिका/चित्रपट निर्माते हे अभ्यास करुनच हे सगळे करत असणार (पक्षी:ते काय येडे हायत होय असं काही बाही लिहायला/दाखवायला). हे अजूनच डोक्यात जातं.हाथ मिलाओ, सेम हिअर. लैच डोक्यात जातं. याला उत्तर इतकंच की हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्स हेही तुफान अभ्यासानिशीच लिहिलेले आहेत. तुफान अभ्यास म्हणजे सत्य असे आजिबात जरूरी नाही. पण हे कुणाला, तर मेंदू थोडातरी शिल्लक असलेल्याला. नायतर शीर्यस चर्चेत "बघा बघा, खरा पुरावा पु ना ओकांच्या पुस्तकात दिलाय" म्हणून परम श्रद्धेने अर्ग्यू करणार्यांपुढे काहीच मात्रा चालत नाही. त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)
In reply to पण बर्याच लोकांचा दावा असतो by बॅटमॅन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)हा हा हा.. हे शिकायला हवंय खरंतर. :)
In reply to पण बर्याच लोकांचा दावा असतो by बॅटमॅन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;) अशी एक धुमश्चक्री बघायची आस आहे ! =))In reply to आता ते तरी काय करणार म्हणा.. by बॅटमॅन
In reply to जबरा ... by योगी९००
मालिकेचा एकही भाग बघितलेला