'किल्ला' आणि प्रेक्षक!
लेखनप्रकार
(चित्रपट पाहिला नसल्यास सूचना: काही किरकोळ स्पॉइलर आहेत, त्यामुळे नंतर तक्रार चालणार नाही :) )
काल रात्री किल्ला पाहण्याचा योग आला. चित्रपट निश्चित आवडला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून काही (अस्वस्थ करणारे) प्रश्न पडले.
चित्रपटाचा विषय खूप तरल आहे आणि विनोदी प्रसंगांची पेरणी असली तरी ती गरजेनुसार वातावरण निर्मितीसाठी किंवा असे म्हणूयात एकसुरी/संथ होणे टाळण्यासाठी केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट खूप बोलत नाही. दृश्य-परिणामकारकता(शब्द चुकल्यास सुचवावे), पार्श्वसंगीत आणि शांतता यातून खूप गोष्टी सांगून जातो. हा चित्रपट एक अनुभव म्हणून आपल्याशी जोडून घ्यायचा आहे असे मला वाटले.
चित्रपटगृहातील अनुभव खूप वेगळा होता. बहुसंख्य प्रेक्षक २-३ प्रकारात होते. पहिले म्हणजे ट्रेलर बघून आलेले - ज्यांना 'शाळा' टाईप लव्ह-ष्टोरी अपेक्षित होती, सोबतीला शिव्या वगैरे यांचा येथेच्छ वापर त्यामुळे फुल २ टाईमपास! दुसरे म्हणजे 'राष्ट्रीय पारितोषिक' मिळाले आहे म्हणजे भन्नाट काहीतरी असणार. त्यांच्या नेमक्या काही अपेक्षा नसल्या तरी निखळ मनोरंजन अपेक्षित होतेच.
त्यामुळे या वर्गातील प्रेक्षकांचा अपेक्षाभंग थोड्या प्रमाणात झाला. शेवटी शेवटी तर काहीजण उठून गेले, एकमेकांना शिव्या घालत होते 'का आग्रह केला' म्हणून आणि बहुसंख्य लोक बाहेर पडताना - "अरे याला काही 'ष्टोरीच' नाही!", "किल्ला नाव कशाला दिलंय?", "असा कसा मध्येच सोडला?" अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत होते.
हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण ट्रेलर वरून हिंट घेऊन आलेल्या पब्लिकने अश्लील शेरेबाजी, मध्येच हसणे, ओरडणे या प्रकारांनी पूर्ण विचका करून टाकला होता. म्हणजे त्या मुलाच्या वर्गातील मुली दिसल्यावर दंगा अपेक्षित आहे, किंवा शिव्या खरडल्या जात असताना वगैरे; पण त्या मुलाच्या आईच्या एकटेपणावरून सुद्धा (नवरा नसल्यामुळे) अश्लील शेरेबाजी चालू होती. चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.
आता या सर्व गोष्टींबद्दल कुणाला दोष द्यायचा? प्रेक्षक तर म्हणणार, आम्ही 'ट्रेलर' बघून किंवा 'मनोरंजना'साठी पैसे मोजून तिकीट काढलंय!
'झी मराठी'ने किल्ला आणि फँड्री च्या बाबतीत जाहिरात करताना 'मास-अपील' असणाऱ्या गोष्टींवर भर दिला होता(लव्ह-ष्टोरी इ.) त्यामुळे प्रेक्षक 'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे! पण ह्याची दुसरी बाजू म्हणजे अशी 'पब्लिसिटी' झाल्याशिवाय प्रेक्षक थेटरात जाउन पिच्चर बघत नाहीत!
कोर्ट च्या वेळी पण साधारण असाच अनुभव होता.
आपले अनुभव, मत याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
बादवे - चित्रपटाचे छायाचित्रण भन्नाट आहे! काय कोकण दाखवलाय - एका शॉटला अख्या स्क्रीनभर समुद्र किनारा आहे आणि मध्ये तो मुलगा बसलाय! अप्रतिम! किल्ला, लाईट-हाउस चे चित्रण पण जबरी. पार्श्वसंगीत आणि एक कविता खूप भारी! 'भूतनाथ रिटर्न्स' फेम खोडकर बालकलाकाराचे काम मस्त आहे(बहुसंख्य लोकांना 'तेवढेच' आवडले)!
वाचन
13785
प्रतिक्रिया
78
किल्ला अजून पहिला नाही पण
'झी मराठी'ने किल्ला आणि
काय जबरा काम केलंय पोरांनी .
चित्रपट आवडला , तुम्ही कुठे
रविवारीच पाहिला किल्ला.. आवडला!!
'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे
मला असा अनुभव टाईमप्लीज
'झी मराठी'ने किल्ला आणि
मी किल्ला फर्स्ट डे फर्स्ट शो
हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
आई आणि मुलाच्या सीनमध्ये पण
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे
चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.हे खरोखर अतिशय क्लेशकारक आहे. तो सीन माझ्या मते चित्रपटातला परमोच्च बिंदू आहे. आई आणि मुलामधलं नातं खुप स्पष्ट आणि गडद होतं ते तिथंच. तोपर्यंत हट्टी वाटणार्या चिनूला आपल्या आईची अगतिकता, तिचा एकटेपणा कळतो तो क्षण आहे तो. आता बाबा नाहीये आणि आईची काळजी आपल्याला घ्यायला हवी हे त्याला समजते तो क्षण आहे तो. आम्ही गेलो तेव्हाही हाच गोंधळ होता. तसेच तो दारुडा नाविक आणि चिनु दोघे होडीत बसून सागरात शिरतात आणि काही वेळाने परत येतात. त्या सीनबद्दलही खुप उलटं सुलटं चर्वण चालु होतं. अतिशय विचित्र बोलत होतं पब्लिक. ख्ररतर तो सीन सगळ्या चित्रपटाला कलाटणी देणारा सीन आहे. पण... असो, किल्ला आवडलाच. तुषार परांजपेची कथा-पटकथा, अविनाश अरुणचं दिग्दर्शन आणि सर्वच मोठ्या आणि सर्वार्थाने मोठ्या असलेल्या लहान कलावंतांचे काम आणि त्यावर वरकडी म्हणजे अप्रतिम सिनेमॅटोग्राफी !@अत्रुप्तः
In reply to @अत्रुप्तः by जडभरत
काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
बाप रे हे सूड म्हणजे भलतंच
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
सूडभाऊंशी हज्जारदा सहमत.
In reply to सूडभाऊंशी हज्जारदा सहमत. by संदीप डांगे
राडा
In reply to राडा by लई भारी
ह्याला एकच प्रॅक्टीकल उपाय
In reply to राडा by लई भारी
पुण्यात सध्या हे जरा अवघड
In reply to सूडभाऊंशी हज्जारदा सहमत. by संदीप डांगे
आपण सिनेमाचा आनंद घ्यायला
In reply to आपण सिनेमाचा आनंद घ्यायला by प्रसाद१९७१
@ तसेही राडा केलात तर तुम्हीच
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
आज मुंबईकर्/ठाणेकर असल्याचा
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
सूड भाऊ
In reply to सूड भाऊ by वेल्लाभट
इ अम इन
In reply to सूड भाऊ by वेल्लाभट
भा.पो.
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
उगाच काय पुणे मुंबई येथे
In reply to उगाच काय पुणे मुंबई येथे by फारएन्ड
पुणे
धन्यवाद!
मुळात
In reply to मुळात by नाखु
सहमत!
खरे आहे रसभंग होतो खरा...
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा , अगदी सहमत , अॉड
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं
In reply to असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं by प्रसाद१९७१
:-D
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
बुवा
In reply to बुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
कंच्या
In reply to कंच्या by नाखु
तुम्ही बुआ आहात का?*
In reply to तुम्ही बुआ आहात का?* by टवाळ कार्टा
प्र्श्न
In reply to प्र्श्न by नाखु
तो माझाच डूआयडी असेल तर? :)
In reply to कंच्या by नाखु
युनीव्हरसिटी रोडवरच्या
In reply to बुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
थॅक्यु मिका...
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
कमी गर्दी.
उपाय
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by तुषार काळभोर
तुम्ही
In reply to तुम्ही by नाखु
मला घिउन जाय्च!!
खरंय,
तो कोळी, चित्रपटातल्या मुख्य
आयुश्यशिकवन्ण
परीक्षण वाचले....
अजून जालावर आला नसावा.
In reply to अजून जालावर आला नसावा. by रेवती
आमच्या या संभाषणानंतर किल्ला
In reply to अजून जालावर आला नसावा. by रेवती
+१
मी
नाद खुळा चा सिक्सर
करमाफी मुळे मराठी सिनेमा
कालच हा पिक्चर पाहिला.
In reply to कालच हा पिक्चर पाहिला. by विजुभाऊ
विजुभाऊ ,
In reply to विजुभाऊ , by अत्रुप्त आत्मा
अगदी असेच म्हणतो! कोथरूड वारी
अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
काय हो राग बिचारीवर...?
In reply to काय हो राग बिचारीवर...? by संदीप डांगे
भयानक ओवर अॅक्टींङ करते राव.
In reply to भयानक ओवर अॅक्टींङ करते राव. by द-बाहुबली
हे लय भारी हां मग. ते तमाम
In reply to हे लय भारी हां मग. ते तमाम by संदीप डांगे
अमृता सुभाष वर असल्या
In reply to भयानक ओवर अॅक्टींङ करते राव. by द-बाहुबली
विहीर मध्ये तिने ओव्हरअ
In reply to विहीर मध्ये तिने ओव्हरअ by सूड
पहा... ऐकु नका...
In reply to पहा... ऐकु नका... by द-बाहुबली
काय तरी दिवस आलेत, मुखवटे
In reply to काय तरी दिवस आलेत, मुखवटे by सूड
ए बाबा इथे मु़खवटा कोणीही
In reply to ए बाबा इथे मु़खवटा कोणीही by द-बाहुबली
चालू द्या म्हटलं ना!! :)
In reply to ए बाबा इथे मु़खवटा कोणीही by द-बाहुबली
माझा दुसरा आयडी जो ब्लॉ़क आहे
In reply to काय हो राग बिचारीवर...? by संदीप डांगे
अमृता सुभाष वर असल्या
In reply to अमृता सुभाष वर असल्या by अत्रुप्त आत्मा
कळवल्याबद्दल आभार.
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
???
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
तुमचा पिक्चर
एवढं काय केलं ओ बिचारीनं?
मला चित्रपट खूप आवडला आहे.
विशेष आवडला नाही पिक्चर..