माझी 'वाईट्ट' व्यसनं : गुलझार
गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं....., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.
'पुखराज' या आपली मुलगी 'बोस्की' उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली 'पनाह' ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.
उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट - गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !
(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)
गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा 'पुखराज' मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.
कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..
मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..
तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..
(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)
तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने....
आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे 'संत कबीर'! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलुच)
मग एक दिवस कुणीतरी सांगितलं 'अबे 'इजाजत' बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची. 'कतरा कतरा' ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?
तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..
सुधाला नवर्याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात ...
"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...."
इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला ...
त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे 'रेखा' ! असो...., त्याबद्दल परत कधीतरी !
मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?
रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे
"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो" हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक अनाथ मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.
सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है
आणि हाच 'गुलजार' एका कवितेत लिहून जातो...
गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !
'प्रचंड उकडतय' या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं.
किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,
''आपको तैरना आता है?''
गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...''
'डुबणं, बुडून जाणं' एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात झोकून स्वतःला पुर्णपणे देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.
रात का नशा अभी, आंखसें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा....वही, वो...वोही...
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं.>...
शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या 'शाहरुख आणि करीना' ऐवजी 'घर'ची 'विनोद मेहरा आणि रेखा' किंवा 'तराना' मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा...
"सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं..."
या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला..... पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.
गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.
नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा...
बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?
आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्ये कार मेकॅनिक म्हणून काम करणारा 'संपूरणसिंग काला' हा तरुण चित्रसृष्टीत 'गुलझार साहब' या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्यांनी विपुल लेखन करून आपल्या वाचकांमध्ये मानाचे स्थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या 'गुलजार' व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की 'गुलजार' हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.
एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था
आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय...
नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...
गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.
विशाल. In reply to क्या टॉपिक निकाला है विशाल... by मनिष
त्यांचा रावीपार हा कथासंग्रह नक्की वाच!
पारायणे झालीत :)लिखते रहे तुम्हे रोजही मगर ख्वाईशो के खत कभी भेजेही नही.हूतूतु नावाच्या डोक्यावरुन साडे सोळा फूटे गेलेल्या चित्रपटातले अप्रतिम गाणे. दुसरे असेच अप्रतिम पण थोडे कमी प्रसिद्ध असलेले गाणे म्हणजे "नैना ठग लेंगे" काय अप्रतिम गाणे आहे.
नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो - (२) नैनो की मत सुनियो रे नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैना ठग लेंगे, ठग लेंगे नैना ठग लेंगे जागते जादू फूकेंगे रे जागते जागते जादू जागते जादू फूकेंगे रे नींदें बंजर कर देंगे नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैनो की मत मानियो रे भला मंदा देखे ना पराया ना सगा रे नैनो को तोह डसने का चस्का लगा रे - (२) नैनो का जेहर नशीला रे - (४) बादलो में सतरंगिया बोंवे, भोर तलक बरसावे बादलो में सत्र अंगिया बोंवे, नैना बांवरा कर देंगे नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे - (२) (नैना रात को चलते चलते स्वरगान में ले जावे मेघ मल्हार के सपने दीजे हरियाली दिखलावे) - (२) (नैनो की जुबान पे भरोसा नहीं आता लिखद परख ना रसीद ना खाता) - (२) सारी बात हमारी - (२) बिन बादल बरसाए सावन, सावन बिन बरसाता बिन बादल बरसाए सावन नैना बांवरा कर देंगे नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो नैनो की मत सुनियो रे, नैना ठग लेंगे जागते जादू फूकेंगे रे जागते जागते जादू जागते जादू फूकेंगे रे नींदे बंजर कर देंगे नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे - (२) नैनाअजुन एकः
वह मेरे साथ ही था दूर तक मगर इक दिन जो मुड़ के देखा तो वह दोस्त मेरे साथ न था फटी हो जेब तो कुछ सिक्के खो भी जाते हैं। लोग मेलों में भी गुम हो कर मिले हैं बारहा दास्तानों के किसी दिलचस्प से इक मोड़ पर यूँ हमेशा के लिये भी क्या बिछड़ता है कोई?आणि अजुन एक जबरदस्त उदाहरण द्यायचे तर हे घ्या:
तेरे जाने से तो कुछ बदला नहीं, रात भी आई थी और चाँद भी था, सांस वैसे ही चलती है हमेशा की तरह, आँख वैसे ही झपकती है हमेशा की तरह, थोड़ी सी भीगी हुई रहती है और कुछ भी नहीं, होंठ खुश्क होते है, और प्यास भी लगती है, आज कल शाम ही से सर्द हवा चलती है, बात करने से धुआ उठता है जो दिल का नहीं, तेरे जाने से तो कुछ बदला नहीं रात भी आई थी और चाँद भी था, हाँ मगर नींद नहीं ...नींद नहीं..
In reply to आहाहा. गुलजार. काय लिहु? by मृत्युन्जय
और एक..
मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते बुनते
जब कोई तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बाँधके
और सिरा कोई जोड के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
एक भी गाँठ गिराह बुनतर की
देख नही सकता कोई
मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उसकी सारी गिराहे
साफ नजर आती है मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
– गुलजार In reply to अजून एक... by विशाल कुलकर्णी
मै अखबार के तीसरे पन्ने पर हररोज जब देखता हूँ मरनेवालोंकी तस्बीरे कुछ देर मै धुंडता रहता हूँ मेरीभी तस्बीर है क्या? बेहिस हुवा हूँ अब एहसास नहीं होता के साँस आती है, जाती है चलती भी है के नहीं अखबार के पाहिले पन्नेपर बस एहदाद की गिनता हु गिनती ही देखता हु आज के दिन फिर कितने मरे आजका "स्कोर" क्या है । बेहिस हूवा हूँ अब एहसास नहीं होता के साँस है की नहीं चलती भी है के नहीं खून देख कर टाप के दूर हो जाता हूँ 9:11 की गाडी पकडनी है मै ऐसा बेहिस हूवा हूँ ! एहसास नहीं होता के साँस है की नहीं चलती भी है के नहीं -- गुलज़ारअवांतरः ते खाली 'क्रमशः' दिसल नाही त्याबद्दल जाहीर आणि जंगी निषेढ...
In reply to आइ ग्ग... by मिसळलेला काव्यप्रेमी
छोटे थे, माँ उपले थापा करती थी
हम उपलों पर शक्लें गूंथा करते थे
आँख लगाकर, कान बनाकर
नाक सजा कर
पगड़ी वाला, टोपी वाला
मेरा उपला
तेरा उपला
अपने अपने जाने पहचाने नामों से
उपले थापा करते थे
हँसता खेलता सूरज रोज़ सवेरे आकर
गोबर के उपलों पर खेला करता था
मेरा उपला सूख गया
उसका उपला टूट गया
रात को आंगन में जब चूल्हा जलता था
हम सारे चूल्हा घेर कर बैठे रहते थे
किस उपले की बारी आई
किसका उपला राख हुआ
वह पंडित था
वह मास्टर था
इक मुन्ना था
इक दशरथ था
बरसों बाद
श्मशान में बैठा सोच रहा हूँ
आज की रात इस वक़्त के जलते चूल्हे में
इक दोस्त का उपला और गया! In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to +१ by क्रेझी
यार अब न समझे है न समझेंगे वो मेरी बात उन्हे दिल और दे या मुझको जबाँ औरजमाना हर जबाँ मे पढ रहा है तुम्हारे सब सुखन गालीब समझते कितना है ये तो वही जाने, या तुम समझो.. यही शिशो मे लगवाये गये है पैरहन अब कुछ तुम्हारे जरा सोचो तो किस्मत चार गिरह कपडे की अब गालीब कि थी किस्मतही उस कपडे की गालीब का गरेबाँ था तुम्हारी टोपी रख्खी है, जो अपनी दौरसे उंची पहनते थे तुम्हारे जुते रख्खे है जिन्हे तुम हाथ मे लेकेर निकलते थे शिकायत थी कि सारे घरकोही मस्जिद बना दिया है बेगम ने तुम्हारा बुतभि अब लगवा दिया है उंचा कद देकर जहासे देखते हो अब तो सब बाजी-चा-ए-अतफाल लगता है सभी कुछ है मगर नौशाँ अगरचे जानता हू के हाथ मे जुंबिश नही बुत के तुम्हारे सामने एक सागर-ओ-मिना तो रख देते बस एक आवाज है जो गुंजती रहती है घरमे
न था कुछ तो खुदा था, कुछ ना होता तो खुदा होता डबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता!- गुलजार
In reply to वर म्हटल्याप्रमाणे by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to अहाहा.... ज्जे ब्बात ! by विशाल कुलकर्णी
In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to अवांतर बद्दल क्षमस्व ;) by विशाल कुलकर्णी
In reply to सुपर्ब.. by चिगो
गुलजार साब, तुम्ही आम्ही दुनिया गुलजार केलीय हे नक्की..हे "गुलजार साब, तुम्ही आमची दुनिया गुलजार केलीय, हे नक्की.." असं करावं प्लीज..
In reply to सुपर्ब.. by चिगो
In reply to सुपर्ब.. by चिगो
In reply to ब्लाॅगवर वाचली तेव्हाही आवडली by इनिगोय
गुलजार ही जखमच खरी, स्वतःचा निराळासा आठवा रंग ल्यायलेली. या माणसाला कशाहीवर कविता लिहिता येते. नव्हे, त्याने काहीही लिहिलन् तरी त्याची कविता होते.
अगदी...अगदी !In reply to गुलजार ही जखमच खरी, स्वतःचा by विशाल कुलकर्णी
In reply to ब्लाॅगवर वाचली तेव्हाही आवडली by इनिगोय
इस मोड से जाते है , कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें सहरा की तरफ जाकर , एक राह बगोलों मैं खो जाती है चकरा कर रुक-रुक के झीझकती सी , ईक मौत की ठंडी -सी वादी उतरती है इक राह उधडती सी छीलती हुई कांटो से, जंगल से गुजराती है - इक दौड के जाती है और कुद के गिरती है , अनजाने खलाओ मै उस मोड पे बैठा हूं जिस मोड से जाती है , हर एक तरफ राहें एक रोज तो युं होगा , इस मोड पे आकर तुम रुक जाओगी कह दोगी वह कौनसा रस्ता है जिस राह पे जाना है …वो जो शायर था
क्या टॉपिक निकाला है विशाल...