थांबली मुंबई सारी
गेला पाऊस बरसुनी
रस्त्यांचे झाले नाले
थांबली मुंबई सारी
पाण्याखाली रेल्वे जाळे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०१५
९८९२५६७२६४
वाचने
4365
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
प्रतिक्रिया
झालं इतकच! एवढी तरी कशाला मेमरी वाया घालवायची सर्वर ची
कवितेच्या चारच ओळी
यल्लप्पा लिहुनी गेले
प्रतिसाद धपाधप येती
धाग्यांचे पसरे जाळे
.
मिपावर धोधो कविता ओतणार्या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.
In reply to मिपावर धोधो कविता ओतणार्या by एस
चायला हा कस्ला नियम??? म्हणजे "तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
In reply to चायला हा कस्ला नियम??? म्हणजे by टवाळ कार्टा
टकाशेठशी सहमत.
In reply to चायला हा कस्ला नियम??? म्हणजे by टवाळ कार्टा
"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.
In reply to "तु माझी लाल नाही केलीस तर by सूड
+++++++++++++++११११११११११११११११११११११११११११
In reply to "तु माझी लाल नाही केलीस तर by सूड
प्रतिसाद देतच नसतील तर ते धाग्यावर फिरकत असतात हे कसे सिद्ध होणार ?
In reply to . by prasadnene
नेनेकाका, काय लिहीलंय ते नीट वाचा. नाही कळलं तर आपण तुमच्यासाठी मराठीच्या शिकवणीची सोय करु.
In reply to नेनेकाका, काय लिहीलंय ते नीट by सूड
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल
:)
वा ! कै लिव्हलय , कै लिव्हलै .
In reply to वा ! कै लिव्हलय , कै लिव्हलै by उगा काहितरीच
प्रतिक्रियांचा 'टोन' पाहून
कवीचे आशादीप निमाले
शब्दच देती आशा
कै लिव्ह्लै कै लिव्हलै
पाक किती(?) बिनतारी! ;)
गेला तांब्या फिरुनी
पीठची कढंईत आले
थिजली कढई सारी
जिलब्यांचे जाहले जाळे
स्वॅप्ससरांबरोबर सहमत,
त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत,
कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी.
म्हणतो लाल तुझी अन,
तू ही म्हणावे माझी लाल
आडवे जे अपल्याला जाती
रंगवू त्यांचे दोन्ही गाल,
रेकता तू गदर्भापरी,
मी म्हणावे कोकीळ गान,
असशी जरी तू कितीही हलकट
मी म्हणावे चान चान
पाडिल्या मी जरी तांबिय कविता,
त्यां तू म्हणशी भगवतगीता,
वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा
तू डिवचून उठवी अनाहिता,
कौतूक करता कोणी माझे,
चुंबावा तू त्याचा माथा,
टीका करी जो तुझीया वरती,
मी घालाव्या त्याला लाथा,
पैजारबुवा,
In reply to +१ टू स्वॅप्स by ज्ञानोबाचे पैजार

गाथा आवडली.
झालं इतकच