मौनांची भाषांतरे
लेखनविषय:
काव्यरस
तसा हट्ट नाहिये माझा
अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील
मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी
माळलेल्या मोगर्याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध
सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र,
नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र
अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे
तसा हट्टच नाहिये माझा
फक्त
बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे
#जिप्सी
#gypsykavita.blogspot.in
वाचने
4342
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मस्तच..
छानच...
ठीकठाक.
कविता आवडली ... मौनाची भाषांतरे नाव छान ... मला वाटते संदिप खरेच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाचे हे नाव आहे.. निटसे लक्षात नाही...
In reply to कविता आवडली ... मौनाची by गणेशा
हो हेच नाव आहे .
In reply to हो by महासंग्राम
ओके...
तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत..
मृदुगंध हे नाव असावे असे मला उगाच वाटले
In reply to हो by महासंग्राम
ओके...
तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत..
मृदुगंध हे कवितेला नाव असावे असे मला उगाच वाटले
In reply to ओके... by गणेशा
म्हणायचं आहे का?
In reply to मृद्गंध by सूड
मृद्गंध .. बरोबर
In reply to मृद्गंध .. बरोबर by गणेशा
मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला असताना ही वरील शब्द- मृद्गंध असा जॉईंट का होतोय कळाले नाही.. मला आधी चुकीचाच वाटला..
मृदुगंध.. मध्ये चुकुन हुकार दिल्या गेल्या होता..
असो .. मुळा कवितेला हे असले उपरिप्लाय आल्याने, मुळ कवीला दिलगीरी व्यक्त करतो ..
लिहित रहा.. वाचत आहे
In reply to मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला by गणेशा
मुळ कवितेला असे वाचावे..
In reply to मुळ कवितेला असे वाचावे.. by गणेशा
बदल केला आहे.
In reply to बदल by मिसळलेला काव्यप्रेमी
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात बदल करायचा असल्यास कसा करता येतो.
२. मूळ लेखका शिवाय दुसर कोणी व्यक्ती तो बदल करू शकते का
In reply to बदल by मिसळलेला काव्यप्रेमी
मृद्-गंध मला येथे पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुंगध अपेक्षित आहे, म्हणून मृद्-गंध हा शब्द योजिला आहे
आवडलं!!
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
मस्त आहे.
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात बदल करायचा असल्यास कसा करता येतो.
२. मूळ लेखका शिवाय दुसर कोणी व्यक्ती तो बदल करू शकते का
In reply to लेखनात बदल / संपादित करणे by महासंग्राम
संपादक किंवा साहित्य संपादक बदल करतात. त्यापैकी कोणालाही व्यनि करून कळवा.
खूप छान !!
आवडली.
वाह