मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

< वाटतं असं …. की >

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अतृप्त यांच्या वाटतं असं… की ह्या सुंदर कवितेचे वाईट विडंबन करीत असल्याबद्दल अतृप्त आणि सर्व थोरा मोठ्यांची क्षमा मागते. वाटतं असं… की तुझ्या घोरण्याचे सगळे नमुने रेकॉर्ड करून ठेवावे, आणि एक दिवस तू झोपल्यावर ते चालू करावे, नक्की माझी झोपमोड करणारा खर्ज कुठला ते शोधण्यासाठी! वाटतं असं… की तुझे मळलेले सगळे मोजे गोळा करून तुलाच धुवायला लावावे, तू बूट काढल्यावर पसरणारा दुर्गंध, तुला कळण्यासाठी वाटतं असं… की तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा, भावना आणि यंत्र यातला फरक, तुला समजण्यासाठी वाटतं असं… की हरेक दुकानी, हरेक मॉली तुझेच पैसे तुझी निवड किती छान म्हणत उधळावेत उरवावेत थोडेसेच पैसे, पाकिटाची तुझ्या लाज राखण्यासाठी ( चित्र म्हणून प्रत्येकाने आपापल्या बायको किंवा प्रेयसी किंवा बायको आणि प्रेयसीचा फोटू आठवावा ही इनंती, शी. सा. नमस्कार)

वाचने 9496 वाचनखूण प्रतिक्रिया 48

In reply to by श्रीरंग_जोशी

@ वाटतं असं… की तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा, भावना आणि यंत्र यातला फरक, तुला समजण्यासाठी>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif अफाट हाणलय हो,निव्वळ अफाट! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif आणि फ़ोटो बद्दलच्या कोमेंट ला तर १०० पैकी २०० मार्क आहेत. सं'रस विडंबन! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif सल्लाम तुम्हाला आपल्याकडून!

In reply to by रातराणी

@ अजून बरीच आग आहे, ह्या कवितेत भरपूर भर घालता येईल पण हात आवरला :D >> :-D कित्ती कित्ती तो दू दू हिंसकपणा! :P ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

पैसा Sat, 06/20/2015 - 09:09
विडंबन अवडले. पण विडंबन करायची परवांगी द मामि यानी मागितली आणि विडंबन रातराणीने केले. आयडी चुकून दुसरा वापरलात काय?

एस Sat, 06/20/2015 - 09:22
वाटतं असं की... तुझे ठेवणीतले सग्गळे टोमणे गुपचूप ध्वनिमुद्रित करावेत, आणि एक दिवस तू छान मूडमध्ये असताना तुलाच ऐकवावेत, नक्की माझा मूड घालवणारा खास टोमणा कुठला ते शोधण्यासाठी!!!

In reply to by एस

रातराणी Sun, 06/21/2015 - 13:17
वैधानिक इशारा: मुळात तुम्हाला ती छान मूडमधे आहे असे वाटत असेल पण ते खरच असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टोमणे ऐकवाय्च्या आधी खास मित्राला कल्पना देऊन ठेवावी.कधी कशासाठी गरज पडेल सांगता येत नाही.

एस Sat, 06/20/2015 - 09:33
वाटतं असं की कपाटातल्या माझ्या कप्प्यात तू अतिक्रमण करून टांगलेल्या सर्व साड्या खाली फेकाव्यात, आणि तुलाच त्या गाठोड्यात बांधायला लावाव्यात. तुझ्या साड्यांची संख्या तुलाच कळण्यासाठी.

In reply to by एस

पैसा Sat, 06/20/2015 - 09:37
=)) माझा नव्रा मला गद्यात सांगतो. की तू मेल्यावर लाकडांची गरज नाही. साड्याच पुरेत! =))

In reply to by पैसा

रातराणी Sun, 06/21/2015 - 13:58
ताई दाजीना सांग खबरदार् जर साड्यांविषयी माझ्या मनात आनाल असले काही, सकाळी दुधी रात्री कारली वाढीनं ताटात जोवर आहे प्राण कुडीत.

एस Sat, 06/20/2015 - 09:37
वाटतं असं की... तुझ्या त्या टीव्हीवर एक दिवस एक बॅटच घालावी, बिनडोक मालिका आणि खरंखुरं आयुष्य यातला फरक तुला दाखवून देण्यासाठी.

नाखु Sat, 06/20/2015 - 09:43
वाटतं असं की... तू पाडलेल्या कविता जिल्ब्या फ्रेम करून ठेवाव्यात आणी लावाव्यात तुझ्या घरी-दारी हाफिसात नेहमी नजरेसमोर.. तुलाही कळू दे वाचकांना नक्की कशाचा आणि कसा डोक्याला शॉट लागतो ते.

एस Sat, 06/20/2015 - 09:49
वाटतं असं की... तुला तुळशीबागेत नेण्याची लालूच दाखवावी आणि तिथून काहीच्च न घेता तुला बाहेर आणावी शेवटी एक लेडिज रुमाल घेऊन द्यावा तुझ्या डोळ्यांतल्या पाणीदार अंगाराला अजून फुलवण्यासाठी!!!

In reply to by एस

रातराणी Sun, 06/21/2015 - 19:53
काकू?काकू? मॅम म्हणत जा हो. काकू इज सो मिडलक्लास यू नो! इट्स ओके! पुढच्या वेळेस लक्षात ठेवा हं :) रोसेशचे डॅडी बिघडलेत हा तुमचा गैरसमज आहे. शुद्धलेखनाबद्दल मात्र आय टोटली अग्री बर का. काये ना रोसेश नवीन नाटक लिहतोय ना, पण त्याचा लॅपटॉप चोरीला गेला! इन्दुचच काम असणार ते! म्हणून त्याने माझा मॅक बॉरो केलाय. ते मोबाइल वरून लिहणे किती अवघड आहे! सो . . . . . . . ! तरी बर माझा s6 आहे! मोनिशा सांगत होती तिच्या मोटोरोला वर तर 2gच कनेक्षन आहे! मी घेऊन देत होते s6 तर म्हणाली बिल खूप येईल !सो..... !

सतिश गावडे Sat, 06/20/2015 - 09:58
वाटतं असं... की हातापाशी एक टमरेल भरुन ठेवावं.. आणि निसर्गाच्या हाकेची वाट पहात बसावी.. आली की लगेच ओ देऊन, आत शिरण्यासाठी! वाटतं असं... की अंधारभरल्या कूपात एक पिवळट दिवा लावून तुझ्यासवे एकरूप व्हावं.. हळूच टुरटुर करत शांतता भंगण्यासाठी!

अजया Sat, 06/20/2015 - 10:12
वाटतं असं की सा-या शौच कवितांवर एकदाच पाणी ओतावं आणि वाट बघत नसावं तांब्या परत येण्याची!

In reply to by अजया

तिमा Sat, 06/20/2015 - 17:52
वाटतं असं ...की सर्व शौचकवींना पुढनंच खो द्यावा आणि तांब्या ओतून द्यावा म्हणजे, जातील तसेच बरबटलेले लोकांच्या नजरा चुकवत !

रातराणी Tue, 06/23/2015 - 00:07
सर्वांचे आभार! पहिल्याच विडंबन प्रयत्नास इतके भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नव विडंबनकारांची हौसला अफझाई केल्याबद्दल मंडळ शतश: आभारी आहे :)