७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
सातला विशाखा पाटील अनिवासी पुणेकर असल्याने साडेदहाला दिल्या वेळेआधीच पाताळेश्वरला हजर!तिचा फोन आला आणि ती सोडुन कोणीच मिपाकर तिथे आलेले नसल्याची वार्ता तिने दिली!आम्ही (मी आणि माझा नवरा)डेक्कन जवळ पोहोचलोच होतो.तिला म्हंटलं आलोच आम्ही पाच मिनिटात.दोन अनाहिता भेटल्या तरी राॅकिंग कट्टा होऊ शकतोच ना;) पण त्यानंतर रितसर रस्ता चुकत आम्हाला जवळच्या अंतराला पोहोचण्यात अर्धा तास गेला.जाऊन बघतो तर मिपाकरांनी पाताळेश्वराचे प्रांगण भरलेले अाणि साक्षात नीलकांतनी कट्टयाला हजेरी लावलेली!एका वडाच्या झाडाखाली पारावर सर्व मिपाभुतं जमलेली!आम्ही यायला आणि युनिफाॅर्मातले गुरुजी जायला एकच गाठ पडली.ते गेल्यानंतर त्यांचे काही दु दु मित्र गणपती सरस्वती बारसं बाटल्या असं बोलत असलेलं ऐकलं बुवा!खखो वडावरचा मुंजा जाणे!
एक हिंदी भाषक काका कोण होते कळले नाही.एका बाजूला पारावर अोक काका आणि एक मिपाकर होते.ते नंतर दिसले नाहीत.त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.उत्साही विनायक देशपांडे काका नीलकांतशी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मोडमध्ये होते.उपास आणि त्यांची सौ.,चिमी ,विशाखा पाटील एका झाडाखाली पारावर बसले होते.वल्ली दोन ग्रंथ हातात घेऊनच आलेले!चिनार,प्रशांत आणि एक्का काका बहुधा पुढल्या कटाची माहिती असल्याने सुहास्यवदनाने सगळ्यांशी गप्पा मारत होते! वात्रट कार्टी सगा ,सूड, टकाचे सोंग घेतलेला दु दु अभ्या(!)आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=))
या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते!दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला.पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;)
आता अलीकडे इ एक्का नीलकांत उपास अनाहिता आोक काका आणि पलिकडे उरलेले दु दु लोक्स!!तेवढ्यात भर पावसात भिजत सुरंगी ताईने येऊन बोलण्याची सूत्र हातात घेऊन सर्वाना गप्प करुन टाकले!नीलकांतला सर्वांनी इतकी सजेशन देऊनही न कंटाळता प्रत्येकाशी संवाद सुरु होता.तेवढ्यात ओककाकांच्या हातावर बांधलेला दोरा तुटला!तो वेड्या बहिणीची रे वेडी माया म्हणत सुरंन्गीताईने बांधुन दिला.तिथे असलेल्या एका वात्रट अनाहितेला दोरा का नाडी हा प्रश्न आवरला नाही असे ऐकले,ख.खो. नंदी जाणे=))(ओककाका ह. घ्या हो!तुमच्या ज्ञानाचा आदर आहे.)
तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली!
तिथे शहाण्या अभ्याने हळूच मी टका नाही,पैचान कौन करुन कन्फुजन वाढवले आणि मग तो अभ्या आहे असे सांगीतले.तरी वाटतंच होतं एवढा शहाणा दिसाणारा मुलगा टका कसा=))
त्यामुळे दमामिची उलटतपासणी सुरु केली!दमामि नाहीच पण साक्षात टवाळ असे चेहेर्यावर छापलेला हा कोण हे कळणार तोच बाकीचे नेमस्त पक्षीय पण खंदक ओलांडुन जमा झाले.मधेच मृत्युंजय हजेरी लावुन गेले.गप्पा सुरु असताना अचानक एक दुबईवासी कुटुंब तिथे आले.ते गृहस्थ स्वतः मिपाकर आहेत.समोर जमलेला ग्रुप बघुन चौकशी करता हा मिसळपावचा कट्टा असल्याचे कळल्याने ते आवर्जून भेटायला आले.जय मिपा!
आता सगळ्याना जेवायला जाण्याचे वेध लागलेले.दंबुकधारी बाबा पाटलांना राजधानीला यायला सांगुन बाकीच्यानी राजधानीकडे कूच केले.इथे नीलकांतने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला.
राजधानीला आल्यावर कटात सामिल लोकांनी सो काॅल्ड दमा मि ला अनाहितांत बसवल्याने चोरुन लपुन वावरणार्या,अनाहितांना न घाबलणार्या टकाचे सोंग उघडे पडले!!त्याची जेवताना मग अनाहितांनी प्रेमळ विचारपूस केली,महत्त्वाचे सल्ले दिले;) टक्याच्या वधू संशोधनाबाबत काही चिंतन करण्यात अाले.समस्त दारु आवडणार्या अविवाहित मुलींना टक्यासाठी मागणी घालण्याच्या विषयावर चर्चा केल्या गेली!या सर्व चिंतनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.कल्जी घ्यायला सांगीतली.ते भावविभोर दृश्य बघून उरलेल्यांचे ड्वाले पानावले:(
टकाचा बंदोबस्त करुन बाकीची मंडळी सूड सगा वल्ली एक्का काका वाल्गुद महाशय विशाखा आणि श्री व सौ अजया महात्मा फुले म्युझियम जवळच असल्याने बघायला गेले.तिथे इ. दुशली ब च्या मुलांसाठी असलेल्या वस्तू बघुन कट्टयाची सांगता झाली!
ता.क:ज्या दिपक_कुवेत यांच्या आगमनार्थ कट्टा होणार होता ते या कट्टयाला न येता आदल्या दिवशी पक्षी तीर्थ कट्टा करुन रविवारी निमुटपणे तुळशी बागेत गेले.यावरुन सर्व काही ध्यानात आले आहे;)सहानुभूती दाखवल्या गेली आहे!
वाचने
39413
वाचनखूण
प्रतिक्रिया
143
लै भारी. मज्जा केलेली दिसतेय.
In reply to लै भारी. मज्जा केलेली दिसतेय. by यशोधरा
का वो? तिथं जवळच्या जवळ
In reply to का वो? तिथं जवळच्या जवळ by किसन शिंदे
मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :|
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
अच्छा, असं झालं तर...
In reply to अच्छा, असं झालं तर... by किसन शिंदे
दुत्त दुत्त, अगदीच दुत्त
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
दुत्त शिंदे!
In reply to दुत्त शिंदे! by सतिश गावडे
पुढे तब्येतीप्रमाणे
In reply to पुढे तब्येतीप्रमाणे by बॅटमॅन
कोणाच्या तब्येतीप्रमाणे?
In reply to मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :| by यशोधरा
दुत्ताजी शिंदे असं म्हणाला
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठ्ठो =)) =)) =))
In reply to दुत्ताजी शिंदे असं म्हणाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
भारीच. फोटो टका.
मस्त कल्पनारंजन...
अजया ताई..मी पण होतो की
In reply to अजया ताई..मी पण होतो की by चिनार
दुरुस्ती केली आहे!
हा कोण तोतया दमामि????
फोटो टाका
मस्त झाला कट्टा...एकदम मज्या
आकाशातल्या
वाह ! एकदम खुमासदार व्रुतांत
या वृत्तांतातील मनाचे श्लोक
वृतांत आवडला... फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'भारीच
फोटो नाय तर कट्टा नाय!
@आणि एक डु आय डीचा डु आयडी
चला एकतरी कट्टा झाल्याचा
अजया, मी येण्याआधीच आणि मी
In reply to अजया, मी येण्याआधीच आणि मी by नूतन सावंत
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या
In reply to शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या by टवाळ कार्टा
भावना पोचल्या...
वृतांत मस्तच!!!! पण फ़ोटो कुठे
टका हाये का अजुन शिल्लक!!!
In reply to टका हाये का अजुन शिल्लक!!! by पिलीयन रायडर
ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
अप्रतिम कट्टा वर्णन .. आवडेश.
यायची इच्छा होती, पण रवीवारी
काय बोलता तो दमामि दमामि
In reply to काय बोलता तो दमामि दमामि by मृत्युन्जय
काही चुकलं तर जोड्यानं हाणा
In reply to काही चुकलं तर जोड्यानं हाणा by दमामि
जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला
In reply to जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला by सूड
चायला आधी गुलाबजाम आणि आता
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by टवाळ कार्टा
चायला आधी गुलाबजाम आणि आता
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by सूड
अर्रे हो रसगुल्ले :)
In reply to अर्रे हो रसगुल्ले :) by टवाळ कार्टा
खाल्ल्या पाकाला जागला हं तू
In reply to खाल्ल्या पाकाला जागला हं तू by सतिश गावडे
ख्याssssक्क!
In reply to चायला आधी गुलाबजाम आणि आता by सूड
कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका
In reply to कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका by काळा पहाड
:)
@ अजया : मजा आली व्रूतांत वाचुन, छान लिहीलाय....!!
In reply to @ अजया : मजा आली व्रूतांत वाचुन, छान लिहीलाय....!! by विनोद१८
आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली
In reply to आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली by टवाळ कार्टा
सहमत आहे.
In reply to आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली by टवाळ कार्टा
+१
In reply to +१ by हाडक्या
सहमत.
In reply to सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत आहे!पोरगं अगदीच टवाळातलं
In reply to सहमत आहे!पोरगं अगदीच टवाळातलं by अजया
वा वा. थोड्याच् दिवसात
In reply to वा वा. थोड्याच् दिवसात by सदस्यनाम
ओ...मी राम कॅटेगरीतला नै...
In reply to ओ...मी राम कॅटेगरीतला नै... by टवाळ कार्टा
नाही मॅनेज होणार तुझ्याच्यानी
In reply to नाही मॅनेज होणार तुझ्याच्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
तो तुमचा भ्रम आहे
In reply to तो तुमचा भ्रम आहे by टवाळ कार्टा
आपणास मुद्दा कळलेला नाही.
ही दु दु काय भानगड आहे?
In reply to ही दु दु काय भानगड आहे? by काळा पहाड
दुष्ट दुर्जन
अजया..
तसं बघायला गेलं तर सर्वात आधी
In reply to तसं बघायला गेलं तर सर्वात आधी by प्रचेतस
@ गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट
सातारला जावे लागल्याने कट्टा
खुमासदार वृ..आता फोटो येऊदेत.
एक्का काका फोटो टाकतील.
वाह मस्तच झालेला दिसतोय कट्टा.
मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!!
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
ती फोटोखाली नावं ल्ह्या ओ..
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
एकूण
In reply to एकूण by नाखु
सोत्ताच्या खिशात हात
सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय?हो.झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना?मिपाफौज कूच करत असताना कोणाची टाप आहे की वाट मोकळी करून देणार नाही ?! :)शहा साहेब दिसले नाहीतजोरदार पावसामुळे ते घरी निघून गेले. मिपाकर एकमेकांची ओळख करून घेऊन मोकळेपणाने बोलू लागल्यावरच फोटो काढणे सुरू केले. त्यामुळे ते फोटोंत नाहीत. टीप : इतर व्यक्तीगत प्रश्नांना संबंधीत व्यक्तीच उत्तरे देऊ शकतील ;)In reply to एकूण by नाखु
मागे वळून पाहण्याचे प्रयोजन
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
माझा एकदोन नविन नावांत गोंधळ
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे
In reply to तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे by सतिश गावडे
फ़ोटोंना क्रम दिला आहे.
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
तुफ्फान लिवलय हो येक्का काका!
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
दोन नंबरच्या फोटोवरून "कॉलर
In reply to मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! by डॉ सुहास म्हात्रे
फ़ोटो क्रं. ५ डावीकडून:
भरल्या ताटाच्या फोटुशिवाय
In reply to भरल्या ताटाच्या फोटुशिवाय by अजया
ब्येष्ट ! आता मात्र इनोचा खप एकाएकी
In reply to भरल्या ताटाच्या फोटुशिवाय by अजया
बाबौ! किती ते पदार्थ! चला.
छान कट्टा फोटो आणि तुमची कॉमेंट्री तर झकास
In reply to छान कट्टा फोटो आणि तुमची कॉमेंट्री तर झकास by पद्मावति
अगदि
फोटोओळख करून दिल्याबद्दल
सहा तारखेचा कट्टा उरकून
काकूतै, सुरंगीतै वैगरे मंडळींचा अनाहिती कट्टा सुरु झाला. बाकीची मंडळी वाकाटकांपासून नुसत्याच टकापर्यंत चर्चा करण्यात गुंतली. पावसाने थोडी पांगापांग झाली. पाताळेश्वराच्या नंदीमंडपात पुन्हा लोक नवनवे काथ्ये घेऊन कुटत होते. 'त्यात आपण मोजकेच का लिहीतो' इथपासून ते 'मराठीत 'ळ' नव्हताच तो दिवाळीत आपण शेजार्यांकडनं सोर्या उसना आणतो तसा कर्नाटकातनं उसना आणला आहे' इथवर चर्चा झाल्या. अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं. चटणीबद्दल आभार मानले असता अभ्याने 'गप बस *ड्या' अशी खास सोलापूरी प्रतिक्रिया दिली. पुढे सगळ्यांनी राजधानी गाठलं. राजधानीच्या अगदी समोरचाच रस्ता बघून ओककाकांना दाभोलकरांच्या आठवणीने भरुन आलं. पण एव्हाना आमच्या पोटात एव्हाना रेडे पळू लागल्याने स्वागतासाठी उभ्या असलेल्या टिळेकर्याकडनं टिळे लावून घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलापाशी आलो. दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या. दमामिला अनाहितांच्या समवेत बसावं लागलं तिथेच त्याने आपण टका असल्याचा गौप्यस्फोट केला आणि हिंदी शिरीयलीच्या फ्याशनीनुसार अजयाकाकूंपासून सुरंगीतैपर्यंत सगळ्यांनी 'काय' असे उद्गार काढले. आमच्याकडली लोकं पानातला मुगाचा शिरा संपवण्यात गुंग असल्याने तिकडे काय चाल्लंय त्याच्याशी शष्प घेणं-देणं नव्हतं. जेवणानंतर यत्ता दुशली ब च्या मुलांची सहल फुले संग्रहालयात गेली. दंबूकवाले डाक्टर येथे सोबत होते. ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली. भरल्या पोटाने आणि पेंगुळल्या डोळ्यांनी मंडळी आपापल्या घरी पोचली.In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
'ऑ अच्च जालं तल' वैगरे
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
नाना कुठे गेले नाना? (
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा
In reply to ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा by सतिश गावडे
आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट
In reply to सहा तारखेचा कट्टा उरकून by सूड
ब्याट्याने हळुच्कन लायसन्स
In reply to ब्याट्याने हळुच्कन लायसन्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे मकेस ओथेर्स सुफ्फेर ;)