इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या
लेखनविषय:
काव्यरस
आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या
येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या
खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या
येती कितीक येथे मशहूर रोज होती
गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या
लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला
विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या
झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा
लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या
माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले
आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या
विशाल...
वाचने
5337
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
वा! क्या बात!!!!
ब्रिल्लियंट !
Chan ahe :)
मस्तच!
In reply to मस्तच! by शब्दबम्बाळ
अहो, गाईच्या आचळांना वासरे
In reply to अहो, गाईच्या आचळांना वासरे by दमामि
धन्यवाद!
माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकजबरदस्त
अतिशय
मस्त शेर आहेत... आवडले सगळे
काफियांच्या म्हणजे काय?
In reply to काफियांच्या म्हणजे काय? by काळा पहाड
काफिया
In reply to काफिया by शब्दबम्बाळ
इथे "गर्दीत" आणि "धारेत" हे
इथे "गर्दीत" आणि "धारेत" हे काफिया(यमक) आहेत तर "गारद्यांच्या" आणि "आसवांच्या" हे रदीफ(अन्त्ययमक) आहेत.नाही, तसे नाहीये ते. मुळात या गझलेला रदीफ नाहीये. ही ’गैरमुर्रद्दफ़’ गज़ल आहे. रदीफ़ नसलेल्या गज़लेला ’गैरमुर्रद्दफ़’ गज़ल असे म्हणतात. रदीफ़ असलेल्या व रदीफ़ नसलेल्या दोन्ही गज़ला तितक्याच महत्वाच्या असतात. रदीफ़वर गझलेचा दर्जा ठरत नाही. आत्ता महत्वाचे म्हणजे गारद्यांच्या, आसवांच्या याला 'रदीफ' का नाही म्हणायचे? तर रदीफ़ म्हणजे न बदलणारे शब्द/ शब्दसमूह! गारद्यांच्या, आसवांच्या हे शब्द असमान आहेत. ते एकसारखे नाहीत. नुसतेच 'च्या’ हे अक्षर समान आहे. पण 'च्या' लाही रदीफ़ म्हणता येत नाही कारण ते अक्षर ’काफ़िया’चा भाग आहे, स्वतंत्र, सुट्टे अक्षर नाही. म्हणजेच "काफियाच्या" , आसवांच्या, गारद्यांच्या हे खरे काफिया आहेत या गझलेतले. गर्दीत किंवा धारेत हे नव्हे.In reply to इथे "गर्दीत" आणि "धारेत" हे by विशाल कुलकर्णी
गजल शिकायची इच्छा असलेल्यांनी
In reply to गजल शिकायची इच्छा असलेल्यांनी by विशाल कुलकर्णी
खूपच धन्यवाद!:)
In reply to खूपच धन्यवाद!:) by शब्दबम्बाळ
ज्यांना कोणाला एखादी गझल
ज्यांना कोणाला एखादी गझल आवडेल तीचे रसग्रहण त्या धाग्यात करता येईल असे…कल्पना छानच आहे. मिपावर बरेच 'कलाकार' आहेत. :)In reply to काफियांच्या म्हणजे काय? by काळा पहाड
काफियांच्या म्हणजे काय?
काफियांच्या म्हणजे काय?"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा. मी वरील व्याख्येवरून "काफिया" अधिक स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करतो. चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला काय तो वेडा इथेही बोलला हा शहाणाही चळाया लागला? हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला नमुन्यादाखल दिलेल्या माझ्या एका गझलेतील ह्या तिन्ही शेरात "मावळाया, ढळाया, चळाया, वळाया" हे चार शब्द काफिया म्हणून आलेले आहेत. 'मावळाया' ह्या शब्दामागून 'ढळाया' हा शब्द येतो. 'ढळाया'ची पाठ धरून 'चळाया' येतो आणि 'चळाया' नंतर लगेच 'वळाया' हा शब्द त्याच्यामागे येतो. 'ढळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या आधीच्या शब्दाचे अनुसरण केले आहे, तर नंतरच्या शेरात 'चळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' व 'ढळाया' ह्या शब्दांची पाठ सोडलेली नाही. आणि 'वळाया' हा काफियाचा शब्द "मावळाया, ढळाया, चळाया" ह्या आधीच्या (काफिया म्हणून आलेल्या) शब्दांशी नाते राखत आहे. "मावळाया" ह्या काफियाच्या शब्दाच्या मागेमागे, एकामागे एक, अशी एकमेकांचा पदर धरून ही इतर (काफियाच्या) शब्दांची माळ चालत आहे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे. काफियांचे बहुवचन 'कवाफी' असे होते. संदर्भ : गझलेची बाराखडी : सुरेश भटजबरी
वा!
__/\__
वा छान!!!!
मस्त....
सुंदर आवडली.
गझल आवडली. प्रत्येक कडवे
सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_
विशाल भौ
In reply to विशाल भौ by नाखु
धन्यवाद श्रीमंत :)
वाखु साठवली आहे.