करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)
ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्या अट्टल गिर्हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-)
आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल
हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव
आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा
तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं
२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते
३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं
४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट
५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला
६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...
७) ही...लागली बघा तर्री.....१)
२)
८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड
९)उसळ फरसाण पोहे
१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव
११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा
१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) )
१२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही 
In reply to आपण मिसळ खाल्लेली नाही. by सतिश गावडे
In reply to तुम्हाला मिसळ कशी खायची हे by सतिश गावडे
In reply to +१ by तुषार काळभोर
In reply to +१ by तुषार काळभोर
नेवाळेची मिसळ करंट असते,नेवाळेंची मिसळ डोक्याला शॉट असते ! एका मिसळीत किमान चार मिसळींना पुरेल इतकी मिरची घालतात ... एकदा खल्लि होती तेव्हा काना नाकाला घाम फुटला होता ! नंतर दुसरे दिवशी सांप्रदायिक कविता सुचली होती !
In reply to नेवाळेची मिसळ करंट असते, by प्रसाद गोडबोले
(आतली बातमी: हेच मिसळवाले संध्याकाळी वडा-पाव आणि भजीची गाडी लावतातकमेरामन सत्यवादी उभे सह नाखु मिपा टाइम्सकरीता..त्याची उलाढाल बरीच मोठी
असल्याने मिसळीकडे (आणि पर्यायाने मिसळप्रेमींकडे) साफ दुर्लक्ष झाले आहे हे कटू सत्य आहे)
In reply to नेवाळेची मिसळ करंट असते, by प्रसाद गोडबोले
In reply to नेवाळे नुसता तिखटाच्या by प्रचेतस
घरी चिवडा केल्यावर मटकीची उसळ बनवायची आणि नेवाळेकडून २५/३० रूपयात श्याम्पल विकत आणायचे आणि ते उसळीत मिक्स करून मिसळ बनवायची. जबराट चव येते मग.हा प्रयोगही केला आहे ... तब्बल ४-५ माणसांन्ना पुरेल इतकी मिसळ होते . नको नको होतो तो तिखटपणा ... थोडक्यात नेवाळेंच्या मिसळ वरुन आमचे मन उडाले आहे ...
In reply to घरी चिवडा केल्यावर मटकीची उसळ by प्रसाद गोडबोले
In reply to माझेही तेच. by प्रचेतस
In reply to कुठे आहे रे हे 'दिप्ती मिसळ by गणामास्तर
In reply to घरी चिवडा केल्यावर मटकीची उसळ by प्रसाद गोडबोले
In reply to नेवाळे मिसळ म्हणजे नुसताच by झकासराव
In reply to +१ by तुषार काळभोर
करंट-बिरंट लांब राहिला! तो पुण्यात आत्तापर्यंत फक्त काताकिर्र्र ला मिळालायअगदी, मुंबईत मामलेदार, मुनमुन आणि पुण्यात काटाकिर्र!! सुदैवाने ही मामांची मिसळ खाल्लेली नाही.
In reply to १०० बद्दल by नाखु
In reply to आपके पांव जमीं पर मत रख्खे... by टवाळ कार्टा
In reply to १०० बद्दल by नाखु
In reply to सुप्तावस्थेत गेलेल्या by सतिश गावडे
In reply to वल्ली ... by गणेशा
In reply to अतिथी असे वाचावे... शाळेच्या by गणेशा
In reply to सर्व चर्चा वाचली. कळायला by खटपट्या
In reply to मस्त! by अनंत छंदी
In reply to @ त्याबरोबर मिळालेले "शांपल" by अत्रुप्त आत्मा
नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला -हीच अवस्था झाली ;-) . पुढच्या भारतवारीत करंट मिसळीचा झटका घेऊन बघीन :-) .
In reply to @ त्याबरोबर मिळालेले "शांपल" by अत्रुप्त आत्मा
In reply to @ त्याबरोबर मिळालेले "शांपल" by अत्रुप्त आत्मा
In reply to मामाचा नंबर द्या हो. by प्रचेतस
In reply to ते प्रत्यक्ष भेटीतच ओळ खायचे by अत्रुप्त आत्मा
In reply to आम्हीं प्रत्यक्ष भेटीतच by प्रचेतस
In reply to त्या दिवशीच सांगितलं होतं, ही by अत्रुप्त आत्मा
In reply to @तरी पण पाणचट लागली.>>> टुमची by अत्रुप्त आत्मा
In reply to हो.. by प्रचेतस
In reply to त्यानीही तशीच खाल्ली असेल मग! by अत्रुप्त आत्मा
In reply to पण त्याला "आंम्हाला आवडलेली by अत्रुप्त आत्मा
स्वमतांधता
=))In reply to पण त्याला "आंम्हाला आवडलेली by प्रसाद गोडबोले

In reply to कुंथा आता... दिवस रात्र मग! by अत्रुप्त आत्मा
In reply to पण त्याला "आंम्हाला आवडलेली by अत्रुप्त आत्मा
In reply to मिसळ गंडलेली म्हणजे फसलेली by प्रचेतस
In reply to बाकी मिसळ खाताना कधीच by प्रचेतस
फार्च पटक्क्न खुला सा - दिल्याबड्डल ढण्यवाद हो आगोबा!
आता चालू द्या तुमच........................ 
In reply to @त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच by अत्रुप्त आत्मा
In reply to हो.. by प्रचेतस

ती तुमची ऑर्डर होती