"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "
लेखनविषय:
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ)
ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे
अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे
भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1)
मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो
उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो
आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2)
डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो
खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो
पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (3)
--डॉ.कैलास गायकवाड
वाचने
2159
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
कविता छान आहे .
रच्याकने आपल्या अत्रुप्त गुर्जींच नाव पण यमकात जुळतय .
नमस्कार डॉक !! कसे आहात !! बरेच दिवसांनी भेटलो !!
कविता आवडली
डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो
खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो
पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे
>> हे छान आहे :)
कसा आहेस प्रगो?
दमामि...आपली प्रतिक्रिया आवडली... दुसरी ओळ कळाली नाही.
In reply to प्रगो... :) by कैलास गायकवाड
संप्रुक्तचे यमक अत्रुप्त्शी पण जुळते म्हणून म्हटले . हलकेच घ्या.
छान आहे कविता..
फक्त संपृक्तचा अर्थ समजला नाही
In reply to सुंदर !! by नीलमोहर
तुमचा सरगम उडवला की काय?
In reply to तुमचा सरगम उडवला की काय? by दमामि
तुम्हीच सांगा त्यात काही चुकीचे होते का,
असो
कविता अवाडली
दमामि... :)
संप्रुक्त = सॅच्युरेटेड.
भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे
भयग्रस्त झाल्यावर भयमुक्त कसे बाँ ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त by मदनबाण
"मेलेल कोंबड आगीला भीत नाही"
तस काहीस असेल, अशी मी स्वतःची समजूत काढली.
पैजारबुवा,
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर, काळ्या आणि पांढर्याच्या मधे कुठेतरी..
अजून येऊ द्या. कविता आवडलीच आहे.
सर्व साध्या ओळीत ''संपृक्त'' हा शब्द थोडा कडक लागतो.
असे वाटले.
-दिलीप बिरुटे
In reply to आवडली कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे डॉक्टर.
कन्फ्युज जाहलो आहे
पण प्रभावित जाहलो आहे.!
मास्त लिहिलिये कविता!
कविता छान आहे .