मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "

"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "

कैलास गायकवाड · · जे न देखे रवी...
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ) ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1) मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2) डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (3) --डॉ.कैलास गायकवाड

दमामि 25/05/2015 - 11:08
कविता छान आहे . रच्याकने आपल्या अत्रुप्त गुर्जींच नाव पण यमकात जुळतय .

प्रसाद गोडबोले 25/05/2015 - 11:44
नमस्कार डॉक !! कसे आहात !! बरेच दिवसांनी भेटलो !! कविता आवडली डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे >> हे छान आहे :)

कैलास गायकवाड 25/05/2015 - 12:09
कसा आहेस प्रगो? दमामि...आपली प्रतिक्रिया आवडली... दुसरी ओळ कळाली नाही.

नीलमोहर 25/05/2015 - 18:25
छान आहे कविता.. फक्त संपृक्तचा अर्थ समजला नाही

कैलास गायकवाड 26/05/2015 - 11:06
दमामि... :) संप्रुक्त = सॅच्युरेटेड.

In reply to by मदनबाण

ज्ञानोबाचे पैजार 26/05/2015 - 11:34
"मेलेल कोंबड आगीला भीत नाही" तस काहीस असेल, अशी मी स्वतःची समजूत काढली. पैजारबुवा,

पैसा 26/05/2015 - 11:43
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर, काळ्या आणि पांढर्‍याच्या मधे कुठेतरी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/05/2015 - 16:08
अजून येऊ द्या. कविता आवडलीच आहे. सर्व साध्या ओळीत ''संपृक्त'' हा शब्द थोडा कडक लागतो. असे वाटले. -दिलीप बिरुटे

वाचने 2159 वाचनखूण प्रतिक्रिया 15