चिंब
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही
नेईल काळजासी तो तुझा हात नाही
एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही
ईथे श्रावणाला आता धार नाही
किती सरी जळाल्या वणवा वादळात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे...
कमरेत वाकलेला वड उभा अंगणात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
वाचने
2836
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
आवडली कविता. आधीच्या पेक्षा सुगम आणि घट्ट बांधणीची.
......मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे........ हे खासच.
धन्यवाद चित्रगुप्तजी...
प्रयत्न सुरु आहे...अधिक सुगम आणि घट्ट बनवण्याचा..
आवडली!
या निमित्ताने कवितेतील सुबोधता आणि निर्बोधता, गेयता आणि अगेयता, परंपरा आणि नवता, विस्कळितपण आणि नेटकेपण, छंदबद्ध आणि मुक्तछंद वगैरेंचा सौंदर्यानुभूतीशी कसा काय संबंध असू शकतो, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो.
वाह..
कविता छान आहे, पुढील कवितेस शुभेच्छा !
खुप छान कविता !
अजुन एक सुंदर रचना..
उसावे... म्हणजे?
उसावे म्हणा किंवा उसवावे.. किंवा संपावे एकच
सुरेख!!!!!!!
धन्यवाद
आवडली