(सई)
लेखनविषय:
काव्यरस
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते.
मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही.
माझी सई तशी बोल्ड आहे
सीन आणि सिनेमाची गरज पाहून
काय आणि कसं करायचे
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
हातात काही काम नसेल तर
रीअॅलीटी शोची अँकर बनणेही
जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
दिग्दर्शक रोल देत नसेल तर
त्याची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
झी मधला आपला शेअर संपला
की दुसर्या वाहिनी कडे जायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई जरी निरागस
नोएन्ट्री... मधल्या सारखा
लालचुटुक चेरी च्या रंगाचा ड्रेस
कसा मिरवायचा
हे चांगलच कळतं तिला
---
माझी सई तशी हुशार
शिरीन घाटगे आणि शशी देवधर,
दोघींची बेअरींग कशी सांभाळायची
समजतं तिला
---
माझी सई चिरतरुण आहे.....
फॅनाळलेला सईप्रेमी
वाचने
6367
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अगागागागा.
काय हे पैजारबुवा.
सई रे सई कवीता..
पैजारबुवा शीघ्रविड्म्बन मस्त.
खुशाल वाचक
नाखु
काव्यरस: गरम पाण्याचे कुंडहे पटलं.
In reply to काव्यरस: by आदूबाळ
+++१११ अगदी अगदी! 
आरारारा... सईला "हंटरवाली" कसं बनाव ते सुद्धा चांगलच ठावुक आहे बाँ... ;)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.:):):):):):):)
यू टू पैजारब्रुटस?
बाकी बालकविता वगैरे ठीके. पण माझी सई? पैजारवहिनी मिपावर येण्याची शक्यता किती आहे?
In reply to बाब्बौ! by पैसा
तिच्या परवानगी शिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही.
(आज्ञाधारक) पैजारबुवा,
हाहाहा
सईच्या निरागस बाल-लीला पुरेशा एक्सपोज (प्रतिशब्द ?) झाल्या नाहीत असे निरीक्षण नोंदवते.
In reply to सईच्या लीला पुरेशा एक्सपोज by सस्नेह
असेच म्हणतो!
:)
>> दृष्यमान ?
एखाद्या "सई" नेच लीलाधराची वहिनी व्हावे. म्हणजे आणखी "साय" युक्त कविता वाचायला मिळतील.
मस्तच हो पैजारबुवा. अजून खूप खूप लिहा. अतिशय मस्त स्टाईल लिखाणाची.
झकास ………… सईची पंखिण
अगागागागा. काय हे पैजारबुवा.