(सई)
लेखनविषय:
काव्यरस
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते.
मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही.
माझी सई तशी बोल्ड आहे
सीन आणि सिनेमाची गरज पाहून
काय आणि कसं करायचे
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
हातात काही काम नसेल तर
रीअॅलीटी शोची अँकर बनणेही
जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
दिग्दर्शक रोल देत नसेल तर
त्याची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
झी मधला आपला शेअर संपला
की दुसर्या वाहिनी कडे जायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई जरी निरागस
नोएन्ट्री... मधल्या सारखा
लालचुटुक चेरी च्या रंगाचा ड्रेस
कसा मिरवायचा
हे चांगलच कळतं तिला
---
माझी सई तशी हुशार
शिरीन घाटगे आणि शशी देवधर,
दोघींची बेअरींग कशी सांभाळायची
समजतं तिला
---
माझी सई चिरतरुण आहे.....
फॅनाळलेला सईप्रेमी
वाचने
6363
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अगागागागा. काय हे पैजारबुवा.
एक
काव्यरस:
In reply to काव्यरस: by आदूबाळ
+++१११ अगदी अगदी!
आरारारा... सईला "हंटरवाली"
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.:):):):):):):)
यू टू पैजारब्रुटस?
बाब्बौ!
In reply to बाब्बौ! by पैसा
त्या बाबतीत मी एकदम सेफ खेळतो
हाहाहा
सईच्या लीला पुरेशा एक्सपोज
In reply to सईच्या लीला पुरेशा एक्सपोज by सस्नेह
असेच म्हणतो! :) >> दृष्यमान ?
आता
मस्तच हो पैजारबुवा. अजून खूप
झकास ………… सईची पंखिण