देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
(सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.)
आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला,
ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते.
आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या
दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे.
जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.
नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे.
सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे.
मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा.
भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी.
थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी..
आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे.
- गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१
वाचने
66695
प्रतिक्रिया
240
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिर्षक बघुन प्रतिक्रिया देतोय.
खूप काथ्याकूट झालाय मिपावर या
दुवा गंडला आहे
In reply to खूप काथ्याकूट झालाय मिपावर या by वेल्लाभट
मराठी भाषाच....
वा
माई तुम्ही अथवा तुम्चे "हे"
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
माई,तुमच्या ह्यांच शिक्षांण
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
माईला साक्षात सरस्वती
In reply to माई,तुमच्या ह्यांच शिक्षांण by जेपी
आणि वेळोवेळी नवीन अवतार घेणे
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
=))
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
=))
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
बघा नायतर, माई हा ब्रह्मदेव
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to बघा नायतर, माई हा ब्रह्मदेव by बॅटमॅन
हे सगळे देव
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
कदाचित. इतक्या साधनसमृद्ध
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
ते काय पण असु दे सूड राव पण
जरी डु आयडी असला तरी) जर तो
In reply to ते काय पण असु दे सूड राव पण by हाडक्या
अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून
In reply to जरी डु आयडी असला तरी) जर तो by सूड
आपण ओळखतो म्हणून एका आयडीस
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
तू गप्राव.. वशाड मेलो..!
In reply to आपण ओळखतो म्हणून एका आयडीस by टवाळ कार्टा
तेच म्हणतोय...मिपावर "कोणी"
In reply to तू गप्राव.. वशाड मेलो..! by हाडक्या
चला...कोणीतरी हे मान्य केले..
In reply to तेच म्हणतोय...मिपावर "कोणी" by टवाळ कार्टा
खिक्क...
In reply to चला...कोणीतरी हे मान्य केले.. by स्वप्नांची राणी
व्हर्चुअल लाइफ
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
सहमत..
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by सूड
सहमत
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
+१
In reply to सहमत by तुषार काळभोर
धागा गिरेजा इन वंडरलँड
गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे प्राची अश्विनी - Fri, 24/04/2015 - 10:44 गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:) उत्तर द्या चला नाद खुळा - Fri, 24/04/2015 - 16:17 दोस्तहो या विषयावर बोलू काही. "काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच" चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला. जुनाट ना़खु.पूर्ण सहमत.
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
हे महत्वाचे
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
अर्थातच मातृभाषा.
हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत
शांत गदाधारी भीम शांत!! ;)
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
अंहं
In reply to शांत गदाधारी भीम शांत!! ;) by सूड
शिवाय ती सरसकट लागट कमेंटही
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
(ळोळणारी स्माईली कल्पावी)
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
प्रतिक्रिया काय ओ, कशापण
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
ही चर्चा नक्की कशावर आहे?
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
सद्या तरी "माईसाहेब प्रतिसाद
In reply to ही चर्चा नक्की कशावर आहे? by क्लिंटन
माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा
In reply to ही चर्चा नक्की कशावर आहे? by क्लिंटन
:)
In reply to माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा by जेपी
काय ते बेअरींग ....माई म्हणजे
In reply to माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा by जेपी
खिक्क... =))
In reply to काय ते बेअरींग ....माई म्हणजे by टवाळ कार्टा
जेपीची मोडकला बघुन मलाही शंसय
In reply to काय ते बेअरींग ....माई म्हणजे by टवाळ कार्टा
सहमत. माई ह्या आयडीचे
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
हेच बोलतो. मलाही आवडतात
In reply to सहमत. माई ह्या आयडीचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
In reply to सहमत. माई ह्या आयडीचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
जी भाषा रोजगाराशी निगडीत असते
खरे
In reply to जी भाषा रोजगाराशी निगडीत असते by विवेकपटाईत
माई
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
toothpaste???
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
अगं माई !
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to अगं माई ! by धर्मराजमुटके
अगदी तुमच्यासारखे विचार
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
नाही
In reply to अगदी तुमच्यासारखे विचार by संदीप डांगे
माईसाहेब, तुमच्या बेसिकमधेच
In reply to नाही by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि हे असले लोकच......
In reply to माईसाहेब, तुमच्या बेसिकमधेच by संदीप डांगे
चमकणे म्हणजे काय हो माई?
In reply to नाही by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे वा ! चायनीज मालाबद्दल इतके प्रेम !
In reply to चमकणे म्हणजे काय हो माई? by नगरीनिरंजन
चायनीज मालाबद्दल प्रेम नाही.
In reply to अरे वा ! चायनीज मालाबद्दल इतके प्रेम ! by hitesh
प्रत्येक भाषा नवीन शब्दांना
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
शिक्षण मातृभाषेतच हवे.....
.
तिचे इतके कौतुक
मी पगारे , माई , नाना नाही.
In reply to तिचे इतके कौतुक by होबासराव
खरे
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
लाखाची गोष्ट!
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
नान्या नान्या अरे काय बोलतोस?
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
कुण कशाचे कौतुक करायचे
In reply to नान्या नान्या अरे काय बोलतोस? by हुप्प्या
वेड पांघरून पेडगाव?
In reply to कुण कशाचे कौतुक करायचे by hitesh
आपलं नावं बदलुन बुराखान किंवा
In reply to कुण कशाचे कौतुक करायचे by hitesh
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
भाग्वाद्गीतेला
सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त
In reply to भाग्वाद्गीतेला by अवतार
फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश
नेमाडे सरांचे भाषण
नेमाडे साहेब ही आपल्या सारखे
In reply to नेमाडे सरांचे भाषण by ज्ञानोबाचे पैजार
नेमाडे
In reply to नेमाडे साहेब ही आपल्या सारखे by विवेकपटाईत
सूतम् मृतम्
माझ्या काही मित्रांची
योग्य
In reply to माझ्या काही मित्रांची by सोत्रि
तेच म्हणतो मै !
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
शिक्षणपद्धती बदलायला इथे
In reply to तेच म्हणतो मै ! by hitesh
मी पण
In reply to माझ्या काही मित्रांची by सोत्रि
वसई
In reply to मी पण by क्लिंटन
International Mother Language
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)जीवनात मिळणारे यश, पैसा,
छाण . डोळे पाणावले
In reply to जीवनात मिळणारे यश, पैसा, by संदीप डांगे
आमची मेडिकलची पुस्तकं
In reply to छाण . डोळे पाणावले by hitesh
जय हो!
In reply to जीवनात मिळणारे यश, पैसा, by संदीप डांगे
.
In reply to जय हो! by सोत्रि
हितेश भाऊ,
In reply to . by hitesh
१. भिंगाने सुर्यकिरणांचा वापर
In reply to जय हो! by सोत्रि
बरं
मुद्दा
सध्याच्या करोडपती
In reply to मुद्दा by माईसाहेब कुरसूंदीकर
सुबत्ता आणि लोकांचा ओढा
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
+१००
In reply to सुबत्ता आणि लोकांचा ओढा by राही
हेच मीही बोललो.
In reply to +१०० by अवतार
+११११११
In reply to सुबत्ता आणि लोकांचा ओढा by राही
का
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
मराठी शाळांचा दर्जा सुमार
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
आक्षेपार्ह वाक्य
In reply to मराठी शाळांचा दर्जा सुमार by संदीप डांगे
क्लिंटनसाहेब, संदर्भ सोडून
In reply to आक्षेपार्ह वाक्य by क्लिंटन
सरसकटीकरण का?
In reply to क्लिंटनसाहेब, संदर्भ सोडून by संदीप डांगे
मराठीतून शिक्षण घ्या असे
In reply to सरसकटीकरण का? by क्लिंटन
धन्यवाद
In reply to मराठीतून शिक्षण घ्या असे by संदीप डांगे
ह्म्म्म
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
सोकाजीराव.
In reply to ह्म्म्म by सोत्रि
चर्चा वाचली नाही.. (कितीदा
काही मराठी शब्द हवे आहेत
मराठीचा आग्रह धरणार्यांकडे
In reply to काही मराठी शब्द हवे आहेत by क्लिंटन
:)
In reply to मराठीचा आग्रह धरणार्यांकडे by संदीप डांगे
एरवी डांगे काका चांगले
In reply to :) by क्लिंटन
एरवी डांगे काका चांगले
In reply to एरवी डांगे काका चांगले by पिलीयन रायडर
अर्धा बरोबरवाला दाखवलात तरी
In reply to एरवी डांगे काका चांगले by असंका
त्यांचं सगळंच म्हणणं बरोबर
In reply to अर्धा बरोबरवाला दाखवलात तरी by आनंदी गोपाळ
डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज
In reply to :) by क्लिंटन
तसे नाही. आपण नेहमे उदाहरण
In reply to डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज by असंका
मग एवढा आटापिटा करुन उपयोग
In reply to तसे नाही. आपण नेहमे उदाहरण by मृत्युन्जय
तुम्ही हे प्राथमिक (फार तर
In reply to :) by क्लिंटन
मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक,
In reply to तुम्ही हे प्राथमिक (फार तर by संदीप डांगे
आणखी एक
In reply to मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, by सोत्रि
एखाद्याचे इंग्रजी चांगले
In reply to तुम्ही हे प्राथमिक (फार तर by संदीप डांगे
या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ
In reply to एखाद्याचे इंग्रजी चांगले by क्लिंटन
:)
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
समजले नाही
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
तुमचे बरेच मुद्दे बरोबर आहे.
In reply to समजले नाही by क्लिंटन
+१
In reply to समजले नाही by क्लिंटन
+१००
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
मातृभाषेतून शिक्षण यात
In reply to +१०० by राही
या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ
In reply to एखाद्याचे इंग्रजी चांगले by क्लिंटन
मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
मग मागच्या पिढीत मराठी
In reply to मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या by सोत्रि
१०० टक्के सहमत.
In reply to मराठीचा आग्रह धरणार्यांकडे by संदीप डांगे
आताच एक जोक वाचला
इथे काय संबंध?
In reply to आताच एक जोक वाचला by hitesh
.
In reply to आताच एक जोक वाचला by hitesh
आजकाल कुठल्याही धाग्याचे
संस्क्रुत नको म्हटले की लगेच त्याला विकृत अस लेबल लावायचे ?
In reply to आजकाल कुठल्याही धाग्याचे by मृत्युन्जय
इथले मोदीही जुनेच आहेत आणि
In reply to संस्क्रुत नको म्हटले की लगेच त्याला विकृत अस लेबल लावायचे ? by hitesh
भेंडी शिक्षणाची भाषा बदलुन
९०% वि.१०%
या सर्वसाधारण लोकांना
In reply to ९०% वि.१०% by राही
संदर्भ
In reply to या सर्वसाधारण लोकांना by असंका
सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे
In reply to संदर्भ by राही
चुकीचे काय?
In reply to सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे by असंका
इतका वेळ आपण असं म्हणत होतात
In reply to चुकीचे काय? by क्लिंटन
वाजली त वाजली नाय तं मोडून
In reply to इतका वेळ आपण असं म्हणत होतात by असंका
साधी गोष्ट आहे. मी मराठी
In reply to वाजली त वाजली नाय तं मोडून by क्लिंटन