देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
In reply to खूप काथ्याकूट झालाय मिपावर या by वेल्लाभट
मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.मग तुमच्या त्या मोठ्ठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी,सैन्यातील मोठे पदाधिकारी,भारतिय विदेश सेवेतले अधिकारी,मोठे आय.पी.एस.अधिकारी..ह्यांचे शि़क्षण अनेक वेळा इंग्रजीत झालेले दिसून येते.ह्यांची मानसिक वाढ तुलनेत कमी असते असे आहे का?
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई,तुमच्या ह्यांच शिक्षांण by जेपी
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बघा नायतर, माई हा ब्रह्मदेव by बॅटमॅन
In reply to माईला साक्षात सरस्वती by सूड
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ते काय पण असु दे सूड राव पण by हाडक्या
जरी डु आयडी असला तरी) जर तो आता तसा उपद्रवी नसेल तर जगण्याचा, वावरण्याचा हक्क नाही का ? की त्यांना कायम अशीच वंचना सहन करावी लागणार ??ते ठीकाय, पण असला उपद्व्याप कशासाठी? फार पोक्त भाव आणून बोलणं, अनुभवाचे शब्द, उपदेशाचे डोस हे कशासाठी?
>>(खासकरुन गिरिजा-प्रगोच्या प्रसंगामुळे हे डोक्यात आलंय.)गिरिजा प्रगो आणि माईसाहेब मध्ये गल्लत करताय. त्याने तो माझाच आयडी आहे हे सांगण्याचे गट्स दाखवले होते. त्यामुळे आमच्यासाठी तो प्रश्न तिथेच संपला. त्यातूनही नंतर ज्यांनी काही धुमाकुळ घातला असेल, त्यांचं त्यांच्यापाशी!! हा माईसाहेब ज्या कोणाचा आयडी आहे त्याने येऊन सांगू देत हा माझा आयडी आहे, त्यानंतर मी चिडवलं तर सांगा.
In reply to जरी डु आयडी असला तरी) जर तो by सूड
फार पोक्त भाव आणून बोलणं, अनुभवाचे शब्द, उपदेशाचे डोस हे कशासाठी?माई असा कोणी पर्सोना घेऊन जर काही लिहू पहात असेल तर जोवर ते आक्षेपार्ह अथवा उपद्रवी असे नसेल तोवर कोणाला इतकीही हरकत नसावी की त्या आयडीची इतकी टर उडवली जावी. म्हणजे असे की इथे सगळेच आयडी आहेत (व्यक्ती नव्हेत) आणि बरेचजण उपदेशाचे डोस पाजणे वगैरे करतातच की. तेव्हा माईला टार्गेट करुनही जर तो आयडी अद्वा-तद्वा बोलणे वगैरे देखील करत नसेल तर त्याला सारखेच टार्गेट करणे बरोबर नै वाटत. इतकंच.
हा माईसाहेब ज्या कोणाचा आयडी आहे त्याने येऊन सांगू देत हा माझा आयडी आहे, त्यानंतर मी चिडवलं तर सांगा.अर्रे पण त्यादिवशीच तर बरेच जण हेच म्हणत होते ना, की इथे आयडी हे वेरिफाईड नाहीत तेव्हा "वेरिफाय केले तरच चिडवणर नाही" हे सगळ्यांनाच लागू होते ना ( तसाही मला सूड कोण आहे हे माहित नाही म्हणून मी त्यालाच माईचा नाना म्हणावे का ? ;) ) . म्हणजे असे की इथे व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते. मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.). (कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय यास महत्त्व देणारा..) (कसली पण एक गंभीर स्माईली कल्पावी)
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्या आयडीस वेगळाऐसा और मिप्पापे...कब्बी नै ;)
In reply to आपण ओळखतो म्हणून एका आयडीस by टवाळ कार्टा
In reply to तू गप्राव.. वशाड मेलो..! by हाडक्या
In reply to तेच म्हणतोय...मिपावर "कोणी" by टवाळ कार्टा
In reply to चला...कोणीतरी हे मान्य केले.. by स्वप्नांची राणी
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून सापडले म्हणून त्यांनी सांगितलं रेपण मान्य केलं ना? राह्यला प्रश्न पर्सोना घेऊन लिहीण्याचा, माईसाहेब हा आयडी ज्या पद्धतीचे प्रतिसाद देत असतो तसे उपप्रतिसाद मिळतायेत.
तसाही मला सूड कोण आहे हे माहित नाही म्हणून मी त्यालाच माईचा नाना म्हणावे काम्हणालात तरी मला काही विशेष फरक पडत नाही.
म्हणजे असे की इथे व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते.नक्की? आता गिर्जाकाकाचा विषय काढलाच आहात म्हणून सांगतो, मागच्या आठवड्यात त्याने लिहीलेली कविता जुन्या लोकांना 'विनायक प्रभू' या आयडीने वाचायला द्या. दहातले चार प्रतिसाद 'मास्तर फारच क्रिप्टिक लिहितात बुवा' असे असतील. "काय बोलताय हे मॅटर करावं" हा आदर्शवाद झाला, वास्तविक कोण बोललंय हेही आपण बघत असतोच!!
मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).हो, पण आहे हे असं आहे!! :)
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by सूड
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).आणि याच्याशी: (कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय यास महत्त्व देणारा..)
In reply to सहमत by तुषार काळभोर
धागा गिरेजा इन वंडरलँड
गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे प्राची अश्विनी - Fri, 24/04/2015 - 10:44 गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:) उत्तर द्या चला नाद खुळा - Fri, 24/04/2015 - 16:17 दोस्तहो या विषयावर बोलू काही. "काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच"ज्याच्याशी काही विषयांवर तीव्र मतभेद असूनही तोच जर काही योग्य आणि समतोल विचार मांडत असेल तर पाठिंबा+सहमती द्यायला अजिबात न कचरणारा.चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला. जुनाट ना़खु.
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
In reply to अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून by हाडक्या
व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते. मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).+१००
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
In reply to शांत गदाधारी भीम शांत!! ;) by सूड
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
शिवाय ती सरसकट लागट कमेंटही करत नाही.माईंचे वय लक्षात घेता असे करणे शोभणार पण नै...अश्या सुध्धा प्रतिक्रिया येतील मग :)
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
In reply to शिवाय ती सरसकट लागट कमेंटही by टवाळ कार्टा
In reply to ही चर्चा नक्की कशावर आहे? by क्लिंटन
In reply to ही चर्चा नक्की कशावर आहे? by क्लिंटन
In reply to माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा by जेपी
In reply to माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा by जेपी
In reply to काय ते बेअरींग ....माई म्हणजे by टवाळ कार्टा
In reply to काय ते बेअरींग ....माई म्हणजे by टवाळ कार्टा
In reply to हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत by बॅटमॅन
In reply to सहमत. माई ह्या आयडीचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सहमत. माई ह्या आयडीचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to जी भाषा रोजगाराशी निगडीत असते by विवेकपटाईत
जर महाराष्ट्र सरकारने मराठीत मेडिकल, इंजीनीरिंग, इत्यादी शिक्षण सुरु तर लोक मराठीत शिकू लागतीलही कल्पना चांगली आहे रे विवेक पण आपल्या भाषा ईतर-इंग्रजी,जर्मन्,जपानी भाषांच्या तुलनेत मागे आहेत असे नाही वाटत का?खालीला शब्दांना मराठी शब्द सापड्तात का पहा. browser adapter gear clutch गेल्या दीडशे वर्षात ज्या काही उलाढाली झाल्या जगभर त्यात असंख्य शब्द तयार झाले.त्यांना पर्यायी मराठी शब्द शोधायचे कुणी? मराठीच्या नावाने राजकारण करणे सोपे पण असे काही काम करायचे तर सावरकर,डॉ. केतकरांसारखे लोक हवेत समाजात.
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अगं माई ! by धर्मराजमुटके
मी तीला अडॅप्टर चा अर्थ विचारणार तोवर ती झोपी गेली.ही अपेक्षा होतीच.(ह. घे.रे). माझा उद्देश मराटीची(वा ईतर भारतीय भाषा) इंग्रजीशी तुलना करणे नाही.मराठी भाषेत असे शेकडो शब्द असतील ज्यांना इंग्रजीत प्रतिशब्द नाही.सगळे शिक्षण मातृभाषेत हवे हा आग्रह तार्किक वाटला तरी तो भारतात टिकणार नाही. हजारो,लाखो वैज्ञानिक संज्ञांना मराठी प्रतिशब्द बळेच शोधायचे व मुलांना ते शिकायला लावायचे?असो. गणेशाच्या ह्या विधानावर माझा अजूनही आ़क्षेप आहे.
मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरतेभारतापुरता विचार केलास ते खरे नाही. मोठ्ठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी,सैन्यातील मोठे पदाधिकारी,भारतिय विदेश सेवेतले अधिकारी,मोठे आय.पी.एस.अधिकारी..ह्यांचे शि़क्षण अनेक वेळा इंग्रजीत झालेले दिसून येते.ह्यांची मानसिक वाढ तुलनेत कमी असते असे आहे का? इंग्रजी शाळेत गेलेली काही मंडळी. १)रघुराम राजन(दिल्ली पब्लिक स्कूल) २)आमीर खान,राहूल शर्मा(बॉम्बे स्कॉटिश) ३)दीपक पारेख, ज्युलियो रिबेरो, गौतम राजाध्यक्ष,होमी. सेठना,सोली सोराबजी(सेंट झेवियर). मला खात्री आहे मातृभाषेत शिकलेल्यांची ही अशी यादी तू देशील कदाचित. मातृभाषेत न शिकल्याने मानसिक वाढ कमी होते,विषय नीट समजत नाहीत..असल्या विधानांवर माझा आ़़क्षेप आहे.
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अगदी तुमच्यासारखे विचार by संदीप डांगे
मुलभूत संकल्पना आपल्या भाषेतून शिकणे आणि परक्या भाषेतून शिकणे यात फरक आहेच. ए फॉर अॅपल करणे म्हणजे फक्त रट्टा मारणे आहे. त्या मुलाला ए समजत नाही, अॅपल समजत नाही. फॉर चा अर्थ समजत नाहीअसे असेल तर मातृभाषेत(मराठीत) शिकणार्यांच्या गणित्,विज्ञान.. वगरे विषयातल्या संकल्पना ईतरांपेक्षा अधिक प्रगल्भ हव्यात.पण मला तरी तसे दिसत नाही.स्पर्धा परीक्षा,नोकर्या,संशोधन... कुठेतरी मातृभाषेत शि़क्षण घेणारी मुले मोठ्या प्रमाणावर चमकताना दिसली असती.. निदान एखाद्या क्षेत्रात तसा पॅटर्न तरी दिसायला हवा की नको? तो तसा (भारतापुरता)दिसत नाही म्हणून इंग्रजी शाळेय घातले तर काय फरक पडतो? निदान डिग्री मिळाल्यावर मुलाखतीत स्पष्ट इंग्रजी बोलता तरी येते. घरी मातृभाषा पण बाहेर सर्वत्र इंग्रजी असे असणारी अमेरेकेतली भारतीय वंशाची मुले अनेक स्पर्धा परीक्षात्,संशोधनात चमकताना दिसतात. ती कशी काय असा ह्यांचा सवाल.
In reply to नाही by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेब, तुमच्या बेसिकमधेच by संदीप डांगे
In reply to नाही by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to चमकणे म्हणजे काय हो माई? by नगरीनिरंजन
In reply to अरे वा ! चायनीज मालाबद्दल इतके प्रेम ! by hitesh
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तिचे इतके कौतुक by होबासराव
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
In reply to मी पगारे , माई , नाना नाही. by hitesh
In reply to नान्या नान्या अरे काय बोलतोस? by हुप्प्या
In reply to कुण कशाचे कौतुक करायचे by hitesh
In reply to कुण कशाचे कौतुक करायचे by hitesh
भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झालीहा नवीन शोध लावल्याबद्दल अभिनंदन !
In reply to भाग्वाद्गीतेला by अवतार
सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.वरुन हे लोकप्रभाने छापल्यामुळे अधिकृत पण झालंय.. आहांत कुठे ? (एकच डोला मिचकावणारी स्माईली कल्पावी)
In reply to नेमाडे सरांचे भाषण by ज्ञानोबाचे पैजार
In reply to नेमाडे साहेब ही आपल्या सारखे by विवेकपटाईत
रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे नजरेआड करून चालणार नाही.ह्यापैकी किती देश शतकानुशतके गुलामगीरीत होते, त्यांच्या जनजीवनावर आणि भाषेवर जेत्यांच्या भाषेचा पगडा होता? त्या-त्या देशांनी त्यांच्या भाषेत ते ज्ञान उपलब्ध होइल ह्याची काळजी घेतली त्यामुळे ते शिक्षण त्यांच्या भाषेत घेऊ शकतात.
मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात.हे कसे ते सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची? - (ज्ञान मिळवणे महत्वाचे मानणारा) सोकाजी
In reply to माझ्या काही मित्रांची by सोत्रि
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तेच म्हणतो मै ! by hitesh
In reply to माझ्या काही मित्रांची by सोत्रि
माझ्या काही मित्रांची मातृभाषा खालीलप्रमाणे आहे: आगरी, अहिराणी, वाडवळ ई.बापरे वाडवळ म्हणून कुठली भाषा असते याचा पत्ताच नव्हता मला :)
त्यांनी त्यांचे शिक्षण त्या भाषांत घ्यावे हे उत्तमच! पण जे ज्ञान शिक्षणाने प्राप्त करायचे आहे ते ज्ञान आधि त्या भाषेत उपलब्धपसायला नको?छे हो असले प्रश्न विचारायचे नसतात.मराठी बाणा जपता आला पाहिजे काय समजलात?
(ज्ञान मिळवणे महत्वाचे मानणारा) सोकाजीमी पण. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)In reply to जीवनात मिळणारे यश, पैसा, by संदीप डांगे
In reply to छाण . डोळे पाणावले by hitesh
In reply to जीवनात मिळणारे यश, पैसा, by संदीप डांगे
सगळं ज्ञान इंग्रजीतच असतं हा दुसरा विनोद.बरं.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ (विनोद असल्याने हसलो)
विज्ञानाला कुठलीही भाषा नसते, ज्ञानी व्ह्यायची प्रचंड इच्छा असेल तर ज्ञानाला भाषेचे अडसर येत नाहीत.बाब्बोय... प्रेमाला भाषा नसते हे माहितसोकाजी, पण आता ज्ञानाला पण भाषेचा अडसर नाही हे 'सत्य उमगल्याने' चक्क बोधी वृक्षाच्या झाडाखाली बसल्यासारखे वाटले. - (ज्ञान प्राप्त झालेला) सोकाजी
In reply to जय हो! by सोत्रि
In reply to . by hitesh
In reply to जय हो! by सोत्रि
मराठीला किंवा मातृभाषेला आंधळा विरोध करणार्यांनी जरा विचार करावा.मुद्दा भरकटवतो आहेस रे संदीप. विरोध मराटी वा मातृभाषेला नाही.इंग्रजीतून शि़क्षण घेणार्यांच्या मूलभूत संकल्पना चांगल्या नसतात ह्या गैरसमजाला आक्षेप. ग्रेटगणेशाच्या खालील विधानांना माझा जोरदार आ़क्षेप आहे. ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं.मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. अशी विधाने लिहायची तर पुरेसा विदा नको का? समाजात चित्र पूर्ण उलटे दिसते.बहुतांशी राजकारण्यांची मुले,सैन्य अधिकारी,त्यांची मुले,मोठे वैज्ञानिक्,त्यांची मुले,मोठे उदोय्गपती,त्यांची मुले.... बहुतांशी इंग्रजी माध्यमात शिकलेली आढळतील.
इथेच करोडपती, अब्जोपती जन्माला येतील ते इथल्या मातीत व्यवहार करूनचसध्याच्या करोडपती,अब्जाधीशांची यादी पहा. मला खात्री आहे त्यातले बहुतांशी लोक्,त्यांची पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकलेली दिसेल. धिरूभाई इथल्या मातीतलेच. पण मुकेश्,अनिल पेडर रोडच्या इंग्रजी शाळेत शिकले आहेत.व इथल्या मातीतच व्यवहार करत आहेत.
In reply to मुद्दा by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्याच्या करोडपती,अब्जाधीशांची यादी पहा. मला खात्री आहे त्यातले बहुतांशी लोक्,त्यांची पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकलेली दिसेल. धिरूभाई इथल्या मातीतलेच. पण मुकेश्,अनिल पेडर रोडच्या इंग्रजी शाळेत शिकले आहेत.व इथल्या मातीतच व्यवहार करत आहेत.खरं तर तुम्हीच त्या अब्जाधिशांची यादी जरा निरखून पाहिली आणि त्यातल्या सगळ्यांच्या शालेय शिक्षणाचा मागोवा काढला तर सत्य कळेल. नुसतंच सांगू नका अब्जाधिशांची यादी बघायला. ते इंग्रजीत शिकले म्हणून ते अब्जाधिश झाले असा तुमचा दावा असेल तर धन्य आहे. माईसाहेब, अब्जाधिशांची मुले ज्या शाळांमधे जातात त्या शाळा भाषेपेक्षा इतर आवश्यक गोष्टींवर जास्त भर देतात. व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. इंग्रजी फाडफाड बोलता येणे हा नाही. ते ज्या वातावरणात, लोकांमधे राहतात, वावरतात, धंदा करतात त्या वातावरणात इंग्रजी संपर्कभाषा आहे. धीरूभाई मातृभाषेत शिकले किंवा त्यांची मुलं इंग्रजी शिकली म्हणून ते अब्जाधीश झाले असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा. माझा मुद्दा फार सरळ आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत आत्मविश्वास वाढवणारे, एक परिपुर्ण व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षण असावे आणि ते मातृभाषेत असावे, जेणेकरून मुलांना कुठलाही न्यूनगंड वाटू नये की इतर देशबांधवांबाबत किळस वाटू नये. आताच्या गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवलेल्या इंग्रजी शाळांत आणि बॉम्बे स्कॉटीश शाळेत काहीच फरक नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा. बॉम्बे स्कॉटीशचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात भारतीयतेशी नाळ तोडणारे इंग्रजी शिक्षण देण्याचा घाट गल्लीबोळातल्या शाळांनी घातला आहे. तो फार घातक आहे एवढेच नमूद करू इच्छितो. माझा मुलगा ज्या (पुर्ण) मराठी शाळेत जातो तिथली आठवी-नववीची मुले स्वतः इंग्रजीमधे नाटक लिहून स्वत: दिग्दर्शन करून सादर करतात. इंग्रजीमधे सादर करण्याचे कारण हेच की त्यांना दाखवून द्यायचे आहे की ते इंग्रजी शाळांच्या मुलांपेक्षा इंग्रजीत कुठेच मागे नाहीत तर काकणभर पुढेच आहेत. पण त्यांच्या इंग्रजीपेक्षा नाटक स्वतः लिहिणे, स्वत: सादर करणे यात दिसत असलेला व्यक्तिमत्व विकास मला अभिप्रेत आहे. मुलं इंग्रजी शाळेत गेली की हुशार झाली असा गोड समज करून पालक फक्त स्वप्नरंजन करत आहेत हे आजुबाजुला इंग्रजी शाळेत जाणार्या कित्येक मुलांना पाहून सांगू शकतो.
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
In reply to सुबत्ता आणि लोकांचा ओढा by राही
In reply to +१०० by अवतार
In reply to सुबत्ता आणि लोकांचा ओढा by राही
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
धीरूभाई मातृभाषेत शिकले किंवा त्यांची मुलं इंग्रजी शिकली म्हणून ते अब्जाधीश झाले असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा.पुन्हा ये रे माझ्या मागल्या! मातृभाषेत शिकून मुले काहीतरी मोठे भव्य दिव्य करून दाखवतील असा तुझा समज असेल तर तो समज चुकीचा आहे.इंग्रजी शाळेत जाऊन मराठी कादंबर्या वाचणारी,स्पष्ट मराठी व इंग्रजी बोलणारी मुले अनेक पाहिली आहेत. तेव्हा मुलांना एकदा इंग्रजी शाळेत घातले की 'सगळे काही संपले' असे नाही.
माझा मुलगा ज्या (पुर्ण) मराठी शाळेत जातो तिथली आठवी-नववीची मुले स्वतः इंग्रजीमधे नाटक लिहून स्वत: दिग्दर्शन करून सादर करतात.उत्तम. पण असे प्रत्येक मराठी शाळेत होत असेल का?प्रत्येक शाळेचा दर्जा(मग मराठी असो वा इंग्रजी) वेगळा. समोर सारख्या दर्जाच्या शाळा असतील तर बहुतांशी पालक पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतील.
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मराठी शाळांचा दर्जा सुमार by संदीप डांगे
मोलकरणी, रिक्षावाले यांची मुले ज्या इंग्रजी शाळेत जातात त्यांचा दर्जा बॉम्बे स्कॉटीश इतका चांगला असतो काय?हे वाक्य मला आक्षेपार्ह वाटते. मोलकरणी आणि रिक्षावाल्यांची मुले एखाद्या शाळेत आहेत यावरून त्या शाळेचा दर्जा कसा बदलेल? आणि मोलकरणी आणि रिक्षावाल्यांच्या मुलांना त्यांचे आई-बाप मोलकरणी/रिक्षावाले आहेत म्हणून त्यांना चांगल्या शाळेत शिकायची संधी नाकारावी असे आहे का?
In reply to आक्षेपार्ह वाक्य by क्लिंटन
In reply to क्लिंटनसाहेब, संदर्भ सोडून by संदीप डांगे
ज्या विशेष कारणांसाठी पालक इंग्रजी शाळेच्या मागे धावतायत ते वैशिष्ट्य गल्ली-बोळातल्या शाळांमधे नाही. यात मिळणारे परिणाम फक्त पोकळ सुख देणारे असतील.शाळेची गुणवत्ता ती शाळा कुठे आहे-- गल्लीबोळात की शहरातल्या मुख्य रस्त्यावर थोडीच अवलंबून असते?
सर्वात स्वस्त इंग्रजी शाळा आणि बॉम्बे स्कॉटीशचा दर्जा एकच असेल तर हे वाक्य मी मागे घ्यायला तयार आहेपरत एकदा---शाळेत फी किती घेतली जाते यावरून शाळेचा दर्जा ठरतो का? म्हणजे फी कमी याचा अर्थ शाळा वाईट किंवा फी जास्त याचा अर्थ शाळा चांगली असे थोडीच आहे? माझ्या शाळेत मी इयत्ता वजा २ रूपये दर महिना (म्हणजे ९ वीत दरमहा ७ रूपये, १० वीत दरमहा ८ रूपये इत्यादी) फी भरायचो. मी शाळेत असताना तरी माझी शाळा ठाण्यातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणली जायची. तेव्हा गल्लीबोळातली शाळा, सर्वात स्वस्त शाळा याचा शाळेच्या दर्जाशी संबंध का जोडत आहात? वरचे मोलकरणी-रिक्षावाल्यांची मुले ज्या शाळेत जातात ती शाळा चांगली कशी असेल हे विधानही त्याचेच द्योतक.
पण कुठलीही इंग्रजी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाची हमी आहे असे आपणास म्हणायचे आहे का?असे मी कधी आणि कुठे लिहिले आहे ते दाखवा. माझा मुद्दा हा की बदलत्या काळानुरूप इंग्रजी शाळेत जाणे श्रेयस्कर आहे आणि मराठीतून शिक्षण घ्या असे म्हणणे म्हणजे आपला मराठी बाणा सुखावायचा प्रयत्न आहे पण ते व्यवहार्य नाही. पुढच्या काळात इंग्रजी भाषेला (पक्षी इंग्रजी शाळेतील शिक्षणाला) पर्याय नाही ही जाणीव आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि तुम्हालाही उलटा प्रश्न विचारला तर--कुठलीही मराठी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाची हमी आहे असे आपणास म्हणायचे आहे काय?
In reply to सरसकटीकरण का? by क्लिंटन
मराठीतून शिक्षण घ्या असे म्हणणे म्हणजे आपला मराठी बाणा सुखावायचा प्रयत्न आहे पण ते व्यवहार्य नाहीतुमचा पुर्वग्रहदूषित दृष्टीकोन स्पष्ट दिसत असल्याने आत्तापर्यंत झालेली संपुर्ण चर्चा निष्फळ आहे असे वाटत आहे.
In reply to मराठीतून शिक्षण घ्या असे by संदीप डांगे
तुमचा पुर्वग्रहदूषित दृष्टीकोन स्पष्ट दिसत असल्याने आत्तापर्यंत झालेली संपुर्ण चर्चा निष्फळ आहे असे वाटत आहे.धन्यवाद
In reply to सध्याच्या करोडपती by संदीप डांगे
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to काही मराठी शब्द हवे आहेत by क्लिंटन
In reply to मराठीचा आग्रह धरणार्यांकडे by संदीप डांगे
मला सांगा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचे स्पेलिंग इंग्रजीत पाठ झाले की त्याचा अर्थ कळतो आपोआप? की त्याचा अर्थ फक्त इंग्रजीतच सांगता येतो? इंग्रजीत डेरिव्हेटिव्ह म्हटले की संज्ञा चटकन समजते? मराठीत सांगितली की समजत नाही का?डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या शब्दाचे नुसते स्पेलिंग असा अर्थ कुठून काढलात? डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना शिकायची असेल तर फंक्शन, लिमिट या संकल्पना आधी माहित पाहिजेत. फंक्शन ही संकल्पना शिकायला व्हेरिएबल, डिपेन्डन्स इत्यादी संकल्पना आधी माहित पाहिजेत. असे इतरही अनेक संकल्पनांविषयी म्हणता येईल. आता या सगळ्या संकल्पना मराठीत समजावून सांगणार म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज इट्स रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएअबल असे म्हणण्याऐवजी फंक्शनचे डेरिव्हिटिव्ह म्हणजे .... (जाऊ दे मला याचे मराठीकरण करताच येत नाही). म्हणजे एखादी संकल्पना मराठीत समजावणार म्हणजे क्रियापदे, उभयान्वयी अव्यये इत्यादी मराठीत आणि बाकी सगळे इंग्लिशमध्ये?
सुर्य सुर्य असतो, त्याला सन म्हटले काय नि आणि काय म्हटले काय. त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये समजायला विशिष्ट भाषाच लागते?तुम्ही हे प्राथमिक (फार तर माध्यमिक) शिक्षणाविषयी लिहित आहात.पण जसे उच्च शिक्षणाकडे जाऊ त्याप्रमाणे या सगळ्या संज्ञा अधिक क्लिष्ट होत जातील.आणि ते सूर्याला सन म्हणा की सूर्य म्हणा इतका साधा प्रकार तो राहणार नाही.
नुसता विरोधाला विरोध नको. काही ठोस मुद्दे आणा चर्चेत. बालिश अन फुटकळ प्रतिवादांना काही अर्थ नाही.तेच म्हणतो मी.
अशिक्षित नावाडी आणि उच्चविद्याविभूषित विद्वानाची कथा माहित असेलच आपणास.आणि त्या गोष्टीतला उच्चविद्याविभूषित विद्वान तर मराठीची जननी असलेल्या संस्कृत भाषेतला विद्वान होता हे पण माहित असेलच आपणास. :) एकेकाळी (म्हणजे शाळेत असताना) मी पण अगदी कट्टर मराठीवाला होतो. सल्फ्युरिक अॅसिडला एच २ एस ओ ४ ऐवजी मी "ह २ ग प्र ४" असे म्हणायचो. ह--हायड्रोजनचा, ग-- गंधकाचा (सल्फर) आणि प्र-- प्राणवायू (ऑक्सिजन). पण नंतर लक्षात आले की संज्ञाच शिकायच्या असतील तर त्या ज्या भाषेत आहेत आणि मुख्य म्हणजे पुढे ज्या भाषेत शिकाव्या लागतील त्याच भाषेत शिकलेल्या कधीही चांगल्या.
In reply to :) by क्लिंटन
In reply to एरवी डांगे काका चांगले by पिलीयन रायडर
एरवी डांगे काका चांगले प्रतिसाद लिहीतात, पण ह्या बाबतीत जामच काही तरी चुकतय..एरवीचं माहित नाही. पण इथे मात्र डांगेसाहेब कमालीचे बरोबर आहेत. एक तरी चुकीचा प्रतिवाद दाखवा त्यांचा....
In reply to एरवी डांगे काका चांगले by असंका
In reply to अर्धा बरोबरवाला दाखवलात तरी by आनंदी गोपाळ
In reply to :) by क्लिंटन
डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज इट्स रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएअबल असे म्हणण्याऐवजी फंक्शनचे डेरिव्हिटिव्ह म्हणजे .... (जाऊ दे मला याचे मराठीकरण करताच येत नाही). म्हणजे एखादी संकल्पना मराठीत समजावणार म्हणजे क्रियापदे, उभयान्वयी अव्यये इत्यादी मराठीत आणि बाकी सगळे इंग्लिशमध्ये?तुम्हाला अमुक एका इंग्रजी वाक्याचं मराठीकरण (!)(- ज्याला सर्वसामान्य मराठी माणूस भाषांतर म्हणतो ते-) जमत नाही ह्याचं कारण मराठी ह्या भाषेमध्येच काही दोष आहे असं आपलं प्रामाणिक मत आहे का?
In reply to डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज by असंका
In reply to तसे नाही. आपण नेहमे उदाहरण by मृत्युन्जय
मग एवढा आटापिटा करुन उपयोग काय?नाही हो दादा. आटापिटा कसला? आपल्या मातृभाषेत शिक्षण म्हणजे काय आटापिटा होइल का? उलट परक्या भाषेत शिक्षण ह्याला आटापिटा म्हणता येइल.
In reply to :) by क्लिंटन
तुम्ही हे प्राथमिक (फार तर माध्यमिक) शिक्षणाविषयी लिहित आहात.पण जसे उच्च शिक्षणाकडे जाऊ त्याप्रमाणे या सगळ्या संज्ञा अधिक क्लिष्ट होत जातील.आणि ते सूर्याला सन म्हणा की सूर्य म्हणा इतका साधा प्रकार तो राहणार नाही.अगदी हेच म्हणायचे आहे बघा मला. मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, माध्यमिक व उच्च-माध्यमिक पर्यंत आवश्यक आहे. डीग्री आणि त्यापुढील शिक्षण ज्या भाषेत उपलब्ध असेल त्या भाषेतच घ्यावे लागते. जर्मनीत जाऊन अभियांत्रिकीतले उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर जर्मन शिकायला लागेल की आधी इंग्रजी शिकून नंतर त्यातून जर्मन शिकायला लागेल? असंख्य संज्ञा तर लॅटीन, ग्रीक, वैगेरे नॉन-इंग्लीश भाषांतून उचललेल्या आहेत. त्या इंग्रजी वाक्यांमधे चालतात. पण मराठी वाक्यात नको. असं का? एखाद्याचे इंग्रजी चांगले म्हणून त्याला अर्थशास्त्र चांगले जमते, गणित चांगले जमते, क्वांटम-मेकॅनिक्स चांगले समजते असे नाही ना? या सर्व विषयांवर भारतीय भाषांमधे काहीच लिहिले नाही? अचानक इंग्रजी आले तर हे सगळे ज्ञान फुटून बाहेर यायला लागले काय? कौटील्य, कणाद, आर्यभट्ट, रामानुजन, वराहमिहिर ह्यांनी सगळे लेखन इंग्रजीतच केले असेल, नाही? (आजकाल तर आपल्या पुर्वजांचे नाव घेणे सुद्धा पाप झालेय. त्यांचे दाखले देणे म्हणजे महापाप.) ज्ञानभाषा इंग्रजीच आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही हा जो प्रचार चाललाय तो चुकीचा आहे. त्यातून जे इंग्रजीत असते तेच ज्ञान असा प्रचार होऊ घातलाय. डेरिवेटीवची संज्ञा सोप्या मराठीत समजावून सांगता येते. तुम्हाला ती जर इंग्रजीत समजत असेल तर ती मराठीतही सांगता आली पाहिजे. तुम्ही ते एखादं उदाहरण, प्रयोग देऊनसुद्धा सांगू शकता. ज्ञान कुठल्याही भाषेचं गुलाम नाही. तुम्हाला मराठीत सांगता येत नसेल तर तुमची मराठी भाषेची जाण कमी असू शकते. पण त्यामुळे मराठी भाषेत दोष आहे असा होत नाही. (माझे ईंग्रजी बर्यापैकी आहे पण भौतिकशास्त्रात प्रचंड रस असून सुद्धा हे क्वांटम-मेकॅनिक्स साफ डोक्यावरून जाते. ते इंग्रजीतच काय मराठीत सुद्धा समजत नाही. व्यवस्थित सांगणारा भेटला नाही अजून.) आणि हो, तो कथेतला विद्वान जगातल्या अनेक भाषेत आहे बरंका... ती काही मुळ मराठी कथा नाहीये. लोककथा आहे. एखादी संकल्पना समजून सांगायची तर तिचे सामान्यीकरण केले जाते याचे याचसारख्या कथा उदाहरणे आहेत. मराठीत सांगताना तो विद्वान संस्कृतचा पंडीत असेल तर चीनमधे चायनीजचा, रशियामधे रशियन भाषेचा. शिक्षणाबद्दलपण आम्ही हेच म्हणतो. ज्ञानाचे सामान्यीकरण हवे अन्यथा ज्ञानेश्वरांना, बुद्धांना अवतार घ्यावे लागतात ते ज्ञान जनतेसाठी खुले करायला. संस्कृतला कुठे प्रतिशब्द शोधणार म्हणून ज्ञानोबा अडून बसले न्हायीत. त्यांनी त्यांच्या भाषेत गीता मांडली. त्यांची भाषा जड जाते तर विनोबांनी अजून सोपी केली. हजारो आपआपल्या भाषेत गीता सांगत आहेत. म्हणजे ज्ञान दुसर्या भाषेत समर्थपणे जाऊ शकते. पण सांगणार्याची इच्छा पाहिजे. जे संस्कृत सोबत झाले तेच इंग्रजीबद्दलही होत आहे. जे काही ज्ञान आहे ते याच भाषेत मिळेल हा अट्टाहास. तेव्हा जातीपातीची बंधने घालून ज्ञानाचा प्रसार रोखला. आता इंग्रजीची भीती घालून ज्ञानाचा प्रसार रोखल्या जातोय. यात काही अतिशयोक्ती असेल तर असु देत. पण पोकळ प्रतिवाद आज्याबात पटत न्हाय.
In reply to तुम्ही हे प्राथमिक (फार तर by संदीप डांगे
मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, माध्यमिक व उच्च-माध्यमिक पर्यंत आवश्यक आहेहे तुमचे वैयक्तिक मत की नियम? जर वैयक्तिक मत असेल तर हरकत नाही पण जर जा नियम म्हणत असाल तर हरकत आहे. कारण हा मुद्दा वैयक्तिक आहे! एक मुद्दा दुर्लक्षित होतोय,Appolied Mechanics, Quantam Physics, Alopathy (MBBS), BAMS, Aeronuatics, Applied Mathematics, Statitics हे सगळे प्रत्त्येक भारतीयाच्या मातृभाषेत जर असेल तर तर ते शिक्षण घेण्यास काहीच अडचण नाही. पण तसे नाहीयेय हीच गोची आहे. आडातच नाहीयेय त्यामुळे पोहर्यात का नाही ह्यावर वाद करण्यात काय पॉइंट? - (अप्लाईड ज्ञानी) सोकाजी
In reply to मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, by सोत्रि
In reply to तुम्ही हे प्राथमिक (फार तर by संदीप डांगे
एखाद्याचे इंग्रजी चांगले म्हणून त्याला अर्थशास्त्र चांगले जमते, गणित चांगले जमते, क्वांटम-मेकॅनिक्स चांगले समजते असे नाही ना?क्वांटम मेकॅनिक्सचे माहित नाही.पण अर्थशास्त्र किंवा कला शाखेतल्या विषयांमध्ये इंग्रजी चांगले म्हणून नक्कीच विषय अधिक चांगला समजायला मदत होईल---किंबहुना इंग्रजी चांगले येत नसताना असे काही विषय--विशेषत: मॅनेजमेन्टशी संबंधित कसे काय समजणार हेच कळत नाही.या विषयांवरील जवळपास सगळे लिटरेचर इंग्रजीमध्ये आहे.शास्त्रीय पेपरमध्ये वाचायला मिळेल त्यापेक्षा वेगळी भाषा या विषयांवरील पेपरमध्ये असते.वर्तमानपत्रातील अग्रलेखाची भाषा वेगळी आणि शेअरमार्केटशी संबंधित पानावरील भाषा वेगळी असते तसाच फरक अशा लेखांमध्ये असतो. अगदी शेक्सपिअरच्या काळात असायचे तसे क्लासिकल इंग्रजी नसले तरी डॅश, स्वल्पविराम आणि इतर विरामचिन्हे वापरून चार-चार ओळींची वाक्ये अनेकदा असतात. हे वाचताना इंग्रजी चांगले समजत नसेल तर त्या लेखात नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायलाच त्रास होईल हे नक्कीच.आणि ज्ञानाला भाषेचे बंधन नाही म्हणून मी आपल्याच भाषेत शिकेन असे म्हटले तर ते शिक्षण घ्यायची वेळ आली आणि इंग्रजीत मार खाल्ला तर त्याचा काही उपयोग नाही. बाकी या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे असं का हा विचार करायचा प्रकार अभावानेच होतो हा प्रकार मात्र अजिबात पटला नाही. जसे तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स शिकविणारा चांगला गुरू भेटला नाही त्याप्रमाणे विचार कसा करावा हे शिकविणाराच भेटला नाही तर मराठी शाळेतले विद्यार्थीही असे का या प्रश्नापासून दूरच राहतात.
In reply to एखाद्याचे इंग्रजी चांगले by क्लिंटन
विचार कसा करावा हे शिकविणाराच भेटला नाही तर मराठी शाळेतले विद्यार्थीही असे का या प्रश्नापासून दूरच राहतात.क्लिंटन, तुम्हाला असे म्हणायचे आहे का की इंग्रजी शाळेत विचार करायला शिकवला जातो? इंग्रजी शाळेतूनच विचारवंत मुले बाहेर पडतात? असे असेल तर इंग्रजीचा वृथा अहंगंड तो हाच. बाकी तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण इंस्टींक्टमधे मार खातो हे खरे आहे. भारतीयांच्या वेगात प्रगती न करण्याला आळशीपणा, बेफिकिरवृत्तीच कारणीभूत आहे हे सत्य नाकारून तात्पुरत्या मलमपट्टीच्या मागे लागतो. पाश्चात्त्यांचे गोडवे गाणे आणि त्यांची उत्पादने वापरणे यातच धन्यता मानतो. मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या डॉक्टर-मालकाशी याविषयावर बरेच बोलणे झाले. तो म्हणाला, 'एक जागतिक दर्जाचं सिरींज बनवणे भारतीय उत्पादकांना शक्य आहे. पण अजून पर्यंत मी अशा उत्पादकाच्या शोधात आहे.' सगळे इंग्रजी शिकलेले, इंग्रजीत भौतीकी, रसायन-फसायन, अप्लाईड-फफ्लाईड वैगेरे उच्च ज्ञान मिळवलेले तथाकथित उच्चशिक्षित महान भारतीय इंजिनीअर्स सगळे पॅरामीटर्स, रीक्वायरमेंट्स आधीच तयार असलेली एक साधी सिरिंज बनवू शकत नाहीत. तर काय चुलीत घालायची सगळी इंग्रजीतली भौतिकी? इथे खरी गरज मूळ प्रेरणेची आहे. ती कुठल्या भाषेतून मिळेल याचाच विचार करतोय. (स्थलांतर करणार्या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेतून शिकावे हा एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती मोठा प्रश्न आहे याबद्दल माहिती नसल्याने काही टीप्पणी देऊ शकत नाही) समांतरः आपली संस्कृती, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अभिमान बाळगणार्या पाश्चात्त्यांबद्दल गौरवोद्गार काढणारे भारतीयांनी तसेच करायचे म्हटले की नाक का मुरडतात? काय नेमके बोचते? धन्यवाद!
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
दुसरी गोष्ट अशी की. इथे शालेय शिक्षण कुठल्या भाषेतून व्हावे असा मुद्दा आहे. अतिउच्च शिक्षण कुठल्या माध्यमातून व्हावे हा नाही.तुमच्या म्हणण्याचा रोख असा दिसत आहे की कॉलेजमधले शिक्षण इंग्रजीत घ्यायला हरकत नसावी पण शालेय शिक्षण मराठीतच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असले पाहिजे. ठिक आहे. पण...
बाकीच्या सामान्य बुद्धीच्या भारतीयांचे काय? १०% हुशार लोकांसाठी ९०% टक्के लोकांना वेठीस का धरावे, तेही अजाणत्या वयात? जे एवढे हुशार आहेत त्यांना २-३ वर्षात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे शक्य नाही का?हाच मुद्दा अगदी उलटाही चर्चेत आणता येऊ शकेल. म्हणजे कॉलेजात गेल्यावर एवीतेवी इंग्रजीतच शिकावे लागणार आहे हे नक्कीच.मिसळपाववर अनेकांचा (माझाही) असा अनुभव आहे की मराठी शा़ळेत असल्यामुळे कॉलेजात गेल्यावर कसलीच अडचण आली नाही. पण मिपासारख्या संकेतस्थळावरचे लोक हे त्या १०% मधले आहेत--म्हणजे सारासार विचार करून आपले मत बनविता येणे आणि मांडता येणे हे मिपावर चर्चेत भाग घेणार्यांना शक्य आहे यावरून असे सदस्य हे त्या १०% मधले आहेत असे म्हणता यायला हरकत नसावी.पण उरलेल्या ९०% चे काय? एक तर ११ वीत (निदान सायन्सला) अभ्यासक्रम १० वीत असतो त्यापेक्षा बराच जास्त असतो.म्हणजे एकीकडे अधिक क्लिष्ट संकल्पना शिकायच्या आणि त्याचवेळी इंग्रजी भाषेशीही झगडायचे या दोन्ही गोष्टी या ९०% मधले विद्यार्थी करू शकतील का? मग शाळेत असताना समाधानकारक कामगिरी करणारे विद्यार्थी कॉलेजात गेल्यावर मात्र मागे पडतात असे व्हायची शक्यता त्या ९०% विद्यार्थ्यांबरोबर होणारच (परत एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) नाही असे कोणी छातीठोक म्हणेल का?मराठी शाळांमधले विद्यार्थी सगळीकडे चमकतात वगैरे बोलले जाते पण जे चमकतात तेच दिसतात (आणि ते १०% मधले असतात) आणि जे मावळतात ते अर्थातच दिसत नाहीत (आणि अर्थातच हे मावळणारे ९०% मधले असायची शक्यता बरीच जास्त). तेव्हा या ९०% वाल्यांना पुढे कॉलेजात गेल्यानंतर निदान पुस्तकात काय लिहिले आहे ती भाषा तरी व्यवस्थित समजता आली तर ते त्यांना अधिक सोपे जाणार नाही का? (१०% आणि ९०% हे तुमचे शब्द आहेत. ही टक्केवारी अर्थातच १०% च किंवा ९०% च असेल असे नक्कीच नाही.तेव्हा हे आकड्यापेक्षा १०% म्हणजे ज्यांना झेपते ते आणि ९०% म्हणजे ज्यांना झेपत नाही ते असे म्हटलेले अधिक योग्य ठरेल). पूर्वी एस.एस.सी चा निकाल ६०% च्या आसपास लागायचा आणि सी.बी.एस.सी/आय.सी.एस.सी चा निकालही ६०% च्या आसपासच लागायचा. एस.एस.सी पेक्षा सी.बी.एस.सी/आय.सी.एस.सी चा अभ्यासक्रम अधिक व्यापक असतो हे त्या क्षेत्रातला कोणीही सांगू शकेल.याचा अर्थ काय?की ज्या विद्यार्थ्यांची १० वी ची परिक्षा पास करायची क्षमता आहे ते ती पास करतीलच मग अभ्यासक्रम थोडा जास्त आव्हानात्मक असला तरी. त्यातील १०वी ची परिक्षा काठावर पास होणार्यांसाठी ११ वी मध्ये वाढलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच भाषा हे आणखी आव्हान असते त्यामुळे त्यांच्यावर इंग्रजी भाषा समजणार्यांपेक्षा आणि १० वी काठावर पास झालेल्यांपेक्षा नक्कीच जास्त परिणाम होतो म्हणून निदान त्यांच्यासाठी तरी शाळा इंग्रजीच असली तर ते अधिक उपयोगी पडेल. (सध्या एस.एस.सी चे निकाल बरेच जास्त लागतात--अगदी ८०%-८५% सुध्दा.मी सध्या शिक्षणक्षेत्रातच नोकरी करत आहे.तिकडे जे काही बघितले आहे त्यावरून हे का होत असावे याचा मी एक तर्क लढविला आहे. सध्या बर्याच इंजिनिअरींग आणि मॅनेजमेन्ट कॉलेजांमध्ये जागा रिकाम्या राहतात.आणि अशी कॉलेजे अगदी कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढली आहेत हे पण समोर दिसतच आहे.तेव्हा १० वी चे निकाल जास्त लावा यासाठी या स्वयंघोषित शिक्षणसम्राटांकडून १० वी च्या बोर्डावर दडपण येत असेल का? म्हणजे जास्त विद्यार्थी १० वी आणि १२ वी पास झाले की कुठल्यातरी कॉलेजातून का होईना इंजिनिअरींग करावे असे या विद्यार्थ्यांना वाटून या शिक्षणसम्राटांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. अर्थात हा माझा तर्क आहे). मी स्वतः मराठी (किंबहुना सेमी-इंग्लिश) शाळेमधला. ८ वी ते १० वी गणित आणि विज्ञान आम्हाला इंग्रजीतून होते आणि इतर सगळे विषय मराठीतून होते. ८वी-९वीत असल्यापासून मला इंग्रजी बोललेले नक्कीच समजायचे पण इंग्रजी बोलता येण्यासाठी त्या भाषेवर अधिक पकड येण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले होते आणि त्यासाठी मला इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष उजाडले.हे मी माझ्या हिंमतीवर करू शकलो का? नक्कीच.अभ्यासावर कुठलेही कष्ट घेण्यात मी कुणालाही हार जाणार नाही हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो.पण समजा मी इंग्रजी शाळेत असतो, शाळेत इंग्रजीतूनच बोलायची सक्ती असती, लेखन-वाचन इंग्रजीतूनच असते तर मला हा इंजिनिअरींगच्या दुसर्या वर्षापर्यंत वेळ घालवायला लागला तो जर्मन किंवा अन्य कुठची भाषा शिकायच्या सत्कारणी लावता आला नसता का?निदान या कारणासाठी तरी मी माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकायचा विचारच करू शकत नाही--मला अगदी आयुष्यभर महाराष्ट्रातच राहायचे असले तरी.
क्लिंटन, तुम्हाला असे म्हणायचे आहे का की इंग्रजी शाळेत विचार करायला शिकवला जातो? इंग्रजी शाळेतूनच विचारवंत मुले बाहेर पडतात?छे हो. असे कशावरून म्हणता? मूळ लेखात म्हटले आहे की इंग्रजी शाळांमध्ये 'असे का' हा प्रश्न विचारायची सवय लागत नाही त्याला उद्देशून मी म्हटले आहे की प्रत्येक गोष्टीला 'असे का' हा प्रश्न विचारायची सवय लावणारे शिक्षक भेटले नाहीत (किंवा घरी पालकांनी ती सवय लावली नाही) तर नक्कीच विचार करायची सवय लागणार नाही. हे कुठच्याही शाळेत होऊ शकते---मराठी किंवा इंग्रजी. त्यामुळे या गोष्टीचा संबंध इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी लावणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. मी ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतले आहे त्या संस्थेत मराठी भाषिक तीसेक विद्यार्थी होते. त्यापैकी पूर्ण मराठी माध्यमात शिकलेला विद्यार्थी होता एक आणि सेमीइंग्रजी शाळेत शिकलेला मी आणि अन्य एक. बाकी ९०% विद्यार्थी इंग्रजी शाळेतच शिकलेले होते.आणि त्यांना विचार करता येत नव्हता असे कोणीच म्हणू शकणार नाही.
समांतरः आपली संस्कृती, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अभिमान बाळगणार्या पाश्चात्त्यांबद्दल गौरवोद्गार काढणारे भारतीयांनी तसेच करायचे म्हटले की नाक का मुरडतात? काय नेमके बोचते?याविषयी पूर्णपणे पास.
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
जगभरातल्या आघाडीच्या कंपन्या जगातल्या सर्व मुख्य भाषांमधे आपली वेबसाईट बनवतात. जगात सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून आपली कुठलीही भाषा या संकेतस्थळांवर नसते. कारण त्यांना माहिती आहे, यांना इंग्रजीत दिले तरी चालून जाईल. इतरांबाबत ते हा दृष्टीकोन का ठेवत नसावेत?इतरांबाबत ते हा दृष्टीकोन ठेवत नसावेत याचे कारण ती भाषा बोलणार्यांकडे नुसते बाणे नाहीत तर त्यांनी फार मोठे भव्यदिव्य काहीतरी करून दाखविले आहे. जर्मनांनी आणि जपान्यांनी नक्की काय केले हे एका प्रतिसादात लिहिलेच आहे.नोबेल पारितोषिक मिळविणार्यांमध्ये जर्मन भाषिकांची संख्या बघितली की जर्मन लोकांनी नक्की काय केले आहे हे समजून येईलच. फ्रेंच लोकांचे योगदान जर्मनांइतके नसले आणि बर्याच अंशी फ्रेंच समाज सुखासीन असला तरी त्यांच्याकडे आफ्रिकेतले लुटून आणलेले का होईना पैसे आहेत. त्यामुळे फ्रान्स ही एक मोठी बाजारपेठ आहे. अरबांचे तर काही विचारूच नका.अगदी बत्थडातले बत्थड लोक असतील ते.पण त्यांच्याकडे तेल आहे.त्यामुळे पुढील पन्नासेक वर्षे तरी त्यांना मान मिळत राहणार (आणि नंतर कुत्रही विचारणार नाही). आपल्याकडे यापैकी नक्की काय आहे?ना पैसा ना मोठी बाजारपेठ ना सगळ्या जगाने आपल्या भाषांना मान झक मारत दिला पाहिजे असे कर्तुत्व.जर्मनीत जितके आय.फोन विकले जातील तितके महाराष्ट्रात विकले जाणार याची खात्री आणि शक्यता असेल तर अगदी अॅपलवाल्यांनाही मराठीतून त्यांची पत्रके छापायला हरकत असेल असे वाटत नाही. इतर गोष्टींची--उदाहरणार्थ वॉशिंग मशीन वगैरे भारत ही मोठी बाजारपेठ असली तरी विविध राज्ये आणि विविध बोलल्या जाणार्या भाषा यामुळे कुठल्याही भाषेत अशी पत्रके छापावीत असे वाटायला तो आकडा परत लहानच. भारतीय भाषांचे म्हणाल तर कन्नडमध्ये छापले आणि मराठीत छापले नाही तर आपल्या पोटात दुखणार आणि आपल्याला वाटणार की मराठीला डावलले जात आहे. हिंदीत छापले तर दाक्षिणात्य रूसून बसणार की आमची भाषा का नाही म्हणून. म्हणजे आम्ही आमचेच बाणे चोंबाळत बसणार आणि सगळ्या जगाने आमची पर्वा करावी ही अपेक्षा असेल तर ती कशी पूर्ण होणार आणि सगळ्या जगाने आपल्या बाण्यांना धूप घालावी अशी अपेक्षातरी का असावी? रच्याकाने मुंबईतील अमेरिकन काऊंसिलेटमध्ये गुजराती भाषिकांसाठी स्वतंत्र खिडक्या असतात आणि त्यांची मुलाखतही गुजरातीतून व्हावी अशी सोय असते.कारण काय तर अमेरिकेत जाऊ इच्छिणार्या गुजरात्यांची प्रचंड संख्या. टोरोंटो विमानतळावर पंजाबीतून पाट्या असतात असे ऐकिवात आहे.खरेखोटे माहित नाही.पण इंग्लंडमध्ये काही ठिकाणी नगरपालिकांची पत्रके इंग्रजीबरोबरच गुजराती आणि पंजाबीमध्ये निघतात असेही वाचल्याचे आठवते. मे २०१५ मध्ये होणार्या इंग्लंडमधील निवडणुकांसाठी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 'निला है आसमान' म्हणून भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करायला सी.डी आणली आहे अशी परवाच बातमी आली होती आणि त्या सी.डीचा काही भाग मराठी न्यूज चॅनेलवर दाखविलाही होता.त्यात पंतप्रधान कॅमेरन यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची छायाचित्रे परत परत दाखवली जात होती आणि सौ.कॅमेरन साडी ही भारतीय वेषभूषा परिधान करूनही त्यात आहेत. आपल्या अमूलचे बटर आखाती देशांमध्ये जाते त्या बटरवरील वेष्टनांवर अरबी भाषेत लिहिलेले असते. मायक्रोसॉफ्ट विंडोजची अरबीमधील जाहिरात मी स्वतः बाहरीनमध्ये बघितलेली आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा आपण निदान कुठल्यातरी बाबतीत-- संख्या, पैसा, योगदान, मोठी बाजारपेठ इत्यादी आपल्याकडे काहीतरी आहे हे दाखवून दिले तरच (परत एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) सगळ्या कंपन्या अगदी नाक घासत आपल्या भाषेत पत्रके छापतील आणि भारतीय ग्राहकाला आकर्षित करायला वाटेल ते करतील. पण असे काही करावे असे आपल्याला कधीच वाटत नाही.आपण या कंपन्यांना नाक घासत आपल्यापुढे यावे लागेल यासाठी काहीच करणार नाही.आणि सगळ्या जगाने आमचे बाणे सांभाळावेत अशी अपेक्षा मात्र करणार---हाती नाही आणा बाजीराव म्हणा!! असो.
In reply to समजले नाही by क्लिंटन
In reply to समजले नाही by क्लिंटन
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१०० by राही
In reply to एखाद्याचे इंग्रजी चांगले by क्लिंटन
In reply to या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ by संदीप डांगे
मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या डॉक्टर-मालकाशी याविषयावर बरेच बोलणे झाले. तो म्हणाला, 'एक जागतिक दर्जाचं सिरींज बनवणे भारतीय उत्पादकांना शक्य आहे. पण अजून पर्यंत मी अशा उत्पादकाच्या शोधात आहे.' सगळे इंग्रजी शिकलेले, इंग्रजीत भौतीकी, रसायन-फसायन, अप्लाईड-फफ्लाईड वैगेरे उच्च ज्ञान मिळवलेले तथाकथित उच्चशिक्षित महान भारतीय इंजिनीअर्स सगळे पॅरामीटर्स, रीक्वायरमेंट्स आधीच तयार असलेली एक साधी सिरिंज बनवू शकत नाहीत. तर काय चुलीत घालायची सगळी इंग्रजीतली भौतिकी?बिंगो! हे इंग्रजी शाळांचे स्तोम अलीकडच्या काळात वाढले आहे ना, म्हणजे आत्ताची पीढी? मग मागच्या पिढीत मराठी माध्यामात भौतिकी शिकलेले कुठे गेले? का नाही त्यांनी अशी सिरींज बनवली? शिक्षणाच्या माध्यमाचा आणि आंत्रेप्रॉनॉर होण्याचा काहीही संबंध नसतो. तुमच्या मुद्द्यांचा रोख हलूच माध्यम सोडून शिक्षण पद्धातीकडे झुकतोय. तेव्हा, आता खरच रजा घ्यायची वेळ झाली, राम राम! -(प्रेरणा भाषातीत असते असे मानणारा) सोकाजी
In reply to मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या by सोत्रि
मग मागच्या पिढीत मराठी माध्यामात भौतिकी शिकलेले कुठे गेले?अच्छा, म्हणजे तुमच्या मते मराठीत भौतिकी होती तर. मागे कोण म्हणाले ते की हे सगळं इंग्रजीतच असतं म्हणून? मराठीत नाहिच्चै तर शिकणार कसे म्हणून? मला वाटलं ब्वॉ आता सगळ्या पिढ्यांचे सगळे इंजिनीअर इंग्रजीतूनच शिकलेत, हुशार झालेत तर कुठं गेली हुशारी...? तुम्ही विसरलात म्हणून सांगतो, मागच्याच पिढीच्या इंजीनिअर्सनी जगातले सर्वात स्लिम घड्याळ बनवले. पण काय या इक्का दुक्का लोकांपासून सालं आपलं पब्लिक इन्स्पायरबी होत नाय. करने का क्या?
शिक्षणाच्या माध्यमाचा आणि आंत्रेप्रॉनॉर होण्याचा काहीही संबंध नसतो.तसे म्हटले तर कशाचाच कशाशी कसलाच संबंध नाहीयेहो. आमचा रोख नेहमी मीडीयम, कंटेंट आणि सिस्टीम यांच्या एकत्रित परिणामांवर असतो. एकाशिवाय दुसर्यास अर्थ नाही. दोहोंशिवाय तिसर्यास अर्थ नाही. बाकी आम्हाला काय चकाट्या पिटायला काहीतरी कारणं लागतात.. बास. येतो. राम राम.
In reply to मराठीचा आग्रह धरणार्यांकडे by संदीप डांगे
In reply to आताच एक जोक वाचला by hitesh
In reply to आताच एक जोक वाचला by hitesh
In reply to आजकाल कुठल्याही धाग्याचे by मृत्युन्जय
In reply to संस्क्रुत नको म्हटले की लगेच त्याला विकृत अस लेबल लावायचे ? by hitesh
In reply to ९०% वि.१०% by राही
या सर्वसाधारण लोकांना महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल ह्या विषयांमध्ये रुची नसते. कामधंदा कोणत्या गावात मिळतो, एव्हढा भूगोल माहित असलेला त्यांना पुरतो.इथे नक्की कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे?
In reply to या सर्वसाधारण लोकांना by असंका
In reply to संदर्भ by राही
सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना.ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?
In reply to सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे by असंका
ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?कुठल्याही प्रामाणिक मार्गाने पैसे कमावावेत असे वाटण्यात वाईट काय? सर्वांकडे भरपूर शिक्षण घ्यायला लागणारा अॅप्टिट्यूड आणि मुख्य म्हणजे चिकाटी नसते.ज्यांना शिक्षणात फार गती नाही, अंगात संगीत, नाट्य, चित्रकला इत्यादी कुठलीच कला नाही, स्वतःचा व्यवसाय करायला लागणारे गुण नाहीत, खेळांमध्ये गती नाही अशांना कॉल सेंटर मधून चांगले पैसे कमावता आले तर त्यात काय वाईट आहे? प्रश्न कधी येईल?शास्त्रज्ञ होऊन चांगले संशोधन करायची योग्यता असलेला माणूस कॉल सेंटरमध्ये जाऊन फोनवर उत्तरे द्यायला लागला तर. पण अशी योग्यता असलेला माणूस कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची महत्वाकांक्षा ठेवेल असे वाटत नाही.काही कारणाने शेवटी तिथे नोकरी करणे भाग पडले तर ती गोष्ट वेगळी पण कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची तशी महत्वाकांक्षा असा माणूस ठेवत असेल असे वाटत नाही.
In reply to चुकीचे काय? by क्लिंटन
In reply to इतका वेळ आपण असं म्हणत होतात by असंका
वाजली त वाजली नाय तं मोडून खाल्ली? भलताच लवचिक दृष्टीकोन झाला हा शिक्षणाबद्दल...मग त्यात चुकीचे काय आहे?
कसंतरी करून (प्रामाणिकपणे) चार पैसे मिळवायला शिकणे अशी वृत्ती असलेल्या माणसाला महत्त्वाकांक्षी माणूस म्हणणार का?पण माझा मुळातला प्रश्न आहे की किती लोक खरोखरचे महत्वाकांक्षी असतात? किती लोक आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी वाटेल तितके कष्ट करायची तयारी दाखवितात? किती लोक लागणारे कष्ट सातत्याने करत राहतात... ही यादी अजूनही वाढवता येईल. असे सगळे गुण असलेल्या लोकांना कॉल सेंटरमध्ये नोकरी करून समाधान मिळणार नाहीच हे उघडच आहे. तेव्हा कॉल सेंटर मधील नोकरी ही खरोखरच्या महत्वाकांक्षी लोकांकरता नाहीच हे काही मी सांगायला नको. पण ज्यांना कशातच गती नाही अशांना कॉल सेंटरमध्ये नोकरी करून का होईना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले तर त्यात चुकीचे काय? वर कॉल सेंटरचा उल्लेख आल्यावर 'अशी महत्वाकांक्षा आपल्या लोकांनी ठेवावी का' अशा स्वरूपाचा थोडासा हेटाळणीचा सूर असलेला प्रतिसाद तुम्ही दिला होतात त्यावर इतर गोष्टी लिहिल्या.
In reply to वाजली त वाजली नाय तं मोडून by क्लिंटन
शिर्षक बघुन प्रतिक्रिया देतोय.