क्षितिज-कुंपण
लेखनविषय:
लाटा समुद्राच्या सखे पायात तू माळु नको,
बेडयाच त्या पैंजण न्हवे, त्यावरी भाळु नको।
चंद्र हा निघतो प्रवासा रोजच्याच भेटगाठी
गोंदुनी भाळी तयाला, तू अशी मिरवू नको।
मुक्त वारा या नभीचा नाद याचा मोकळा,
जखडूनि केशी तयाला, तू अशी अडवू नको।
वाहते हे जल-कलंदर, राख़ण्या मर्जी स्वत:ची,
पाट बांधुनी तयाला, तू अशी फिरवू नको।
लाभतो कधी का किनारा, या नभाला सखे,
क्षितिज-कुम्पण तव नयनिचे, त्यावरी बांधू नको।
वाचने
1921
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
अहा!
आवडली छान आहे
या कवितेत
प्रत्येक शेवटाला जोरदार
In reply to प्रत्येक शेवटाला जोरदार by अत्रुप्त आत्मा
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार....
अप्रतिम .. एकदम जबरदस्त ..
मस्त!
मस्तं!
सुरेख.
फार सुरेख कविता लिहिता तुम्ही