मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्षितिज-कुंपण

Vimodak · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लाटा समुद्राच्या सखे पायात तू माळु नको, बेडयाच त्या पैंजण न्हवे, त्यावरी भाळु नको। चंद्र हा निघतो प्रवासा रोजच्याच भेटगाठी गोंदुनी भाळी तयाला, तू अशी मिरवू नको। मुक्त वारा या नभीचा नाद याचा मोकळा, जखडूनि केशी तयाला, तू अशी अडवू नको। वाहते हे जल-कलंदर, राख़ण्या मर्जी स्वत:ची, पाट बांधुनी तयाला, तू अशी फिरवू नको। लाभतो कधी का किनारा, या नभाला सखे, क्षितिज-कुम्पण तव नयनिचे, त्यावरी बांधू नको।

वाचन 1920 प्रतिक्रिया 10